Saturday, July 13, 2024
Homeचिट चॅट'चिंतामणी'च्या स्पर्धेत ४००...

‘चिंतामणी’च्या स्पर्धेत ४०० विद्यार्थ्यांचा सहभाग

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुंबईच्या चिंतामणी कलामंच, या संस्थेने २६ आणि २७ फेब्रुवारीला शालेय मुलांसाठी आयोजित केलेल्या हस्ताक्षर आणि निबंध स्पर्धेत तब्बल ४००हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

चिंतामणी कलामंच, २०१७पासून गरीब मुलांसाठी कार्यरत असणारी संस्था आहे. मुलांमधील सुप्त गुणांना प्रोत्साहन देण्यावर तसेच त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास कसा होईल यावर त्यांचा भर दिला जातो. संस्थेमार्फत वर्षभरात अनेक उपक्रम, स्पर्धा राज्य पातळीवर राबवल्या जातात. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित केलेल्या शालांत हस्ताक्षर आणि निबंध स्पर्धेला पहिल्याच प्रयत्नात उदंड प्रतिसाद मिळाला. चिंतामणी कलामंचचे अध्यक्ष प्रथमेश पिंगळे आणि सचिव पूजा मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

सदर स्पर्धांमध्ये ४०७ मुलांनी सहभाग घेऊन मराठी भाषा दिवस अतिशय उत्साहात साजरा केला. या स्पर्धेसाठी प्रशासकीय अधिकारी, शिक्षण निरीक्षक किसन पावडे, प्रतीक्षानगर म.न.पा. उ. प्रा. शाळा क्र. १ – मुख्याध्यापिका वाजे, एल. के. वागजी केंब्रिज शाळेच्या मुख्याध्यापिका सपना यादव, प्रभादेवी म.न.पा. माध्यमिक शाळा – मुख्याध्यापक अरविंद खाडे, मुख्याध्यापिका पूजा पाटील, पूजा पवार (शिक्षिका), पद्मजा राऊळ (शिक्षिका) तसेच शाळेचे मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वर्ग, स्पर्धेत सहभागी विद्यार्थी आणि पालकवर्गा सहकार्य लाभले.

निबंध आणि सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतले विजेते पुढीलप्रमाणेः

प्रतीक्षा नगर मनपा शाळा क्र १ सायन (इ. ६ वी ते ८ वी) निबंध स्पर्धा:- प्रथम- वृषाली पवार, द्वितीय- काजल यादव, तृतीय- भूमी सावंत, उत्तेजनार्थ- निहारिका वाघ, नील पाटणकर

सुंदर हस्ताक्षर सर्धा :- प्रथम- वृषाली पवार, द्वितीय- दीपिका जाधव, तृतीय- नील पाटणकर, उत्तेजनार्थ- श्रेया कोदारे, रूपेश जगताप

एल. के. वागजी केंब्रिज शाळा, माटुंगा, निबंध स्पर्धा (इ.१):- प्रथम- महेक मारू, द्वितीय- आलिया शेख, तृतीय- विहान मस्के

सुंदर हस्ताक्षर स्पर्धा (इ.१):- प्रथम- देवांष वाघडीया, द्वितीय- आरुष मीना, तृतीय- हिमांश शिंदे

निबंध लेखन स्पर्धा (इ.२):- प्रथम- अर्णव वळंजू, द्वितीय- आराध्य वासकर, तृतीय- झियान मोमीन

सुंदर हस्ताक्षर स्पर्धा (इ.२):- प्रथम- नाव्या गेडिया, द्वितीय- शाईनी गौतम, तृतीय- दीर्घा कोकम

निबंध लेखन स्पर्धा (इ.३):- प्रथम- प्रक्षुज्ञा सावंत, द्वितीय- पार्थ गुरव, तृतीय- सनवी साखरे

सुंदर हस्ताक्षर स्पर्धा (इ.३):- प्रथम- सान्वी पेवेकर, द्वितीय- इरा पटवा, तृतीय- मलिष्का कोणार

प्रभादेवी माध्यमिक शाळा, निबंध लेखन स्पर्धा (इ. ५ वी ते ७ वी लहान गट):- प्रथम- दीक्षा गुरव, द्वितीय- गणेश साळुंखे, तृतीय- देवयानी शिर्के, उत्तेजनार्थ- स्वराज्य धनवडे, सूरज वरेकर

(८वी ते ९वी मोठा गट):- प्रथम- अंतरा वेदपाठक, द्वितीय (विभागून)- श्रावणी आईर, ऋतुजा कदम, तृतीय- श्रेयस माईल, उत्तेजनार्थ- विनायक धुमाळे

सुंदर हस्ताक्षर स्पर्धा (इ. ५ वी ते ७ वी लहान गट):- प्रथम (विभागून)- नेहा शिंदकर, करुणेश धवाळी. द्वितीय- विशाखा चौधरी, तृतीय- अदिती सकपाळ, उत्तेजनार्थ- विघ्नेश पवार, दीक्षा गुरव

(८वी ते ९वी मोठा गट):- प्रथम (विभागून)- श्रृती मेडी, सानिका कविटकर, द्वितीय- समीर मोरे, तृतीय- गायत्री सकपाळ, उत्तेजनार्थ- श्रावणी शिर्के

Continue reading

महाराष्ट्रातल्या आमदारांचे उपराष्ट्रपतींनी टोचले कान!

उच्च लोकशाही परंपरा, नैतिक मूल्य याबद्दल खूप काही बोलले जाते. त्याचे पालन करण्याची जबाबदारी संसदीय लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाची आहे. सभागृहातील वागण्याबोलण्यातून ती दिसली पाहिजे. सभागृहाबाहेर असणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष येथील घडामोडींवर असते. त्यामुळे प्रत्येक सदस्याने आणि राजकीय पक्षानेही नैतिकता पाळली...

डेंग्यूला रोखण्यासाठी घाला शरीर पूर्णपणे झाकणारी वस्त्रे

डेंग्यू पसरवणाऱ्या सामान्यपणे  दिवसा चावणाऱ्या एडीस डासांबाबत समाजाला जागरूक करण्यासाठी, शाळेत जाणाऱ्या मुले आणि इतरांसाठी शरीर पूर्णपणे झाकून ठेवणारे कपडे घालण्याबाबत जनजागृती मोहीम राबवली जाईल तसेच पाणी साठवण्याची विविध भांडी आणि इतर भांड्यांमध्ये साठून राहणाऱ्या अस्वच्छ पाण्यापासून मुक्त ठेवण्याचे...

मुंबई कोस्टल रोडचा आणखी एक टप्पा सुरू

मुंबई कोस्टल रोड म्हणजेच धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंत प्रवासाला उपयुक्त ठरणारा टप्पा आज सकाळी ७ वाजल्यापासून तात्पुरत्या स्वरुपात खुला झाला आहे. किनारी रस्ता प्रकल्पातील हाजी...
error: Content is protected !!