Homeपब्लिक फिगरउत्तर मुंबईतून महायुतीचे...

उत्तर मुंबईतून महायुतीचे ४० नगरसेवक महापालिकेवर!

आम्ही ‘उत्तर मुंबईला उत्तम मुंबई’ बनविण्याचा संकल्प हाती घेतला आहे. उत्तर मुंबईमध्ये आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, प्रदूषण, पायाभूत सुविधा इत्यादी समस्या कशा पद्धतीने सोडविल्या जातील यासंबंधी अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली. आता महापालिकेच्या निवडणुका सुरू होतील. त्यावेळी महायुतीचे ४० नगरसेवक जिंकून येतील, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री तसेच उत्तर मुंबईतले भारतीय जनता पार्टीचे खासदार पियूष गोयल यांनी काल एका पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

‘उत्तर मुंबईला उत्तम मुंबई’ बनवण्यासाठी पियूष गोयल गेली सात महिने प्रयत्नशील आहेत. उत्तर मुंबईत विकासकामांचा झपाट्याने विस्तार होत असून अनेक नवीन योजना राबवल्या जात आहेत. लाखो नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे. उत्तर मुंबईतील विकासात्मक प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्रीय मंत्री गोयल यांनी शनिवारी महापालिका, म्हाडा, एसआरए, एमएमआरडीए, क्रीडा अधिकारी आणि जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनासह विविध संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नागरी सेवासुविधाविषयी महापालिकेच्या मुख्यालयात आढावा बैठक घेतली. बैठकीत ६० हजार कोटी रुपयांहून अधिक प्रकल्पांची चर्चा झाली. सध्या प्रगतीपथावर असलेले प्रकल्प आणि नव्याने सुरू होणारे प्रकल्प तातडीने सुरू करावे, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

‘उत्तर मुंबईला उत्तम मुंबई’ बनविण्यासाठी कोस्टल रोड, लोखंडवाला डीपी रोड, मालाड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, डेव्हलपमेंट प्लेग्राऊंड, स्वच्छता मोहीम, पर्यटनस्थळांची ओळख आणि विकासासाठी नियोजन, १०० स्वयंसहायता गटांना प्रशिक्षण देण्यासाठी उपक्रम, कोळी समाजासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन, सांस्कृतिक केंद्र उभारणी, बोरीवली (पूर्व) येथे पार्किंग जागेची उपलब्धता निर्माण करणे, आरोग्यसेवा सुधारण्यासाठी उपाययोजना, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बुद्ध पुतळ्याबाबत अभ्यासिका योजना, पोईसर नदीचे रुंदीकरण, पुनर्वसन, इत्यादी विषयांवर यावेळी विस्तृत चर्चा करण्यात आल्याचे गोयल यांनी सांगितले.

उत्तर मुंबईतील विकासयोजनांमध्ये पुनर्विकास, पायाभूत सुविधांची वाढ, नागरी सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, सार्वजनिक सेवा, टोल प्लाझा, शहर सुशोभिकरण आणि प्रदूषण नियंत्रण यासह विविध समस्यांचा समावेश आहे. यासंबंधी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यात, मालाड बसस्थानक बांधणे, गोराई व चारकोप येथील पाण्याची समस्या, मालाड (पू) येथे इनडोअर स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, चारकोपमध्ये नाट्यगृह व समाजमंदिर उभारणे, मालवणी येथील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महाकाली रोड ते शहीद अब्दुल हमीद रोडचे काम, कांदिवली (प) येथील झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन व परशुराम थीम पार्क इत्यादी विषयांवरही प्रकाश टाकण्यात आला. एसआरए प्रकल्पाअंतर्गत चारकोप व बोरीवली येथील पुनर्वसनाचा मुद्दा आणि कांदिवलीमध्ये १५ हजार रहिवाशांना सांडपाण्याचा प्रश्न याविषयी सकारात्मक चर्चा झाली. याप्रसंगी, आमदार अतुल भातखळकर, मनीषा चौधरी, नगरसेवक गणेश खणकर आदी लोकप्रतिनिधीही उपस्थित होते.

भगवती रुग्णालय मे महिन्यात रुग्णांच्या सेवेत

भगवती, शताब्दी व सावित्रीबाई या रुग्णालयातील अपुरी साधनसामुग्री व मनुष्यबळ वाढविण्यावर भर दिला जात आहे. तसेच भगवती रुग्णालय मे महिन्यापर्यंत रुग्णांच्या सेवेत दाखल होईल. प्रत्येक रुग्णालयात आयुष्यमान योजनेतून रुग्णांना सेवा पुरवली जाईल, असेही केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी स्पष्ट केले.

या बैठकीची काही ठळक वैशिष्ट्यं-

60,000 कोटी रुपयांहून अधिक प्रकल्पांवर चर्चा.

पाच महिन्यांत ही तिसरी बैठक.

कोळी समुदायासाठी महत्त्वपूर्ण उपक्रमांचे नियोजन.

उत्तर मुंबईत 15 ऑगस्टपर्यंत एक आधुनिक, मल्टीस्पेशलिटी रुग्णालय.

भगवती आणि शताब्दी रुग्णालयांचा पुनर्विकास आणि 1,000 बेड्स असलेले सुपर स्पेशलिटी रुग्णालय.

वाहतूककोंडी, वर्सोवा ते भाईंदरपर्यंत कोस्टल रोड, मढ-वर्सोवा पूल बांधकाम, नवीन पाणी पाईपलाइन, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमणांवर लक्ष ठेवणे आणि ‘एक पेड माँ के नाम’ अभियान, लखपती दिदीमार्फत महिलांना लाभ, मच्छीमारांना मासेमारीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सोय आणि कार्यशाळेचे आयोजन इत्यादी.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content