Thursday, October 24, 2024
Homeब्लॅक अँड व्हाईट31 हजार गाव-खेड्यांना...

31 हजार गाव-खेड्यांना मिळणार 4 जी इंटरनेट सेवा

आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत 4 जी सॅच्युरेशन प्रोजेक्ट मिशन 500च्या माध्यमातून मोबाईल नेटवर्क नसणाऱ्या देशातल्या 31 हजार गाव-खेड्यांना 4 जी सेवा देण्याचे काम (बीएसएनएल) BSNLवर सोपविले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत जलद इंटरनेट सेवा पुरवून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा जनतेला लाभ मिळावा यासाठी BSNL प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती BSNL महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाचे मुख्य महाव्यवस्थापक रोहित शर्मा यांनी काल नागपूरमध्ये एका पत्रकार परिषदेत दिली.

केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाच्या अधीन सार्वजनिक उपक्रम असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड-बीएसएनएलच्या नागपूर कार्यालयाद्वारे कालपासून 15 फेब्रुवारीदरम्यान 20व्या अखिल भारतीय बीएसएनएल कॅरम आणि कल्चरल टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले असून याचे उद्घाटन आमदार निवास परिसरात रोहित शर्मा यांच्या हस्ते झाल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी कोअर नेटवर्क पश्चिम क्षेत्राचे मुख्य महाव्यवस्थापक प्रशांत पाटील, बीएसएनएल नागपूरचे प्रधान महाव्यवस्थापक यश पान्हेकर उपस्थित होते.

महाराष्ट्रातील 5200 नेटवर्क नसलेली खेडी 2751 नवीन टॉवर उभारून 4जी मोबाईल नेटवर्कयुक्त बनविणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले. सी डॉट, टिसीएस, तेजस या संस्थाच्या साहाय्याने स्वदेशी 4जी तंत्रज्ञान विकसित केले असून स्वतःचे मोबाईल नेटवर्क तंत्रज्ञान असणारा भारत हा जगातील 5वा देश ठरला आहे. स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ही 4जी सेवाही 5जीपर्यंत सुद्धा विकसित करता येत असल्याचे त्यांनी सांगितले. येणाऱ्या काळात BSNLचे सर्व टॉवर हे 4जीमध्ये रुपांतरीत करणार असून महाराष्ट्रात याची सुरुवात झाली आहे. भारतनेट फेज 2मार्फत देशातील ग्राम पंचायत आणि ग्रामीण संस्था यांना BSNLमार्फत निरंतर इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क पुरवून यांना अजून मजबूत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

VSAT उपग्रहाच्या माध्यमातून अजून उत्कृष्ट आणि दर्जेदार सुविधा देण्यावर  BSNLचा भर असून पर्वतीय आणि ग्रामीण प्रदेशात सोलर पॅनल वापरून 4जी सेवा देणार असल्याचे शर्मा यांनी यावेळी स्पष्ट केले. व्यावसायिक ग्राहकांकरिता असलेल्या कॉपर केबलचे पूर्णपणे फायबर ऑप्टिकमध्ये रूपांतर केले जात असून त्याद्वारे बँडविथ आणि अद्यावत नेटवर्क ग्राहकांना मिळत असल्याचेदेखील शर्मा यांनी सांगितले.

Continue reading

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना सुवर्णपदक

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश पवार यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिममध्ये सराव...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. 'जय जय स्वामी...

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...
Skip to content