Homeचिट चॅटयेत्या शनिवारी मुंबईत...

येत्या शनिवारी मुंबईत भरड धान्य मेळावा!

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) च्या वतीने येत्या 21 ऑक्टोबर, 2023 रोजी मुंबईतल्या एम एम आर डी ए मैदानावर इट राईट भरड धान्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डाँ. भारती पवार यांच्या हस्ते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या भरड धान्य मेळाव्याचा प्रारंभ होणार आहे.

2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षे म्हणून जगभरात साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त भरड धान्याचा दैनंदिन आहारात उपयोग वाढावा यासाठी जनजागृती व्हावी याउद्देशाने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) च्या वतीने देशभरात आतापर्यंत 100 भरड धान्य मेळावे आयोजित करण्यात आले. तर पश्चिम विभागात 8 मेळावे घेण्यात आले.

मुंबईत येत्या 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पश्चिम विभागीय भरड धान्य मेळाव्यात सकाळी 6.30 वाजता अडीच किलोमीटर लांबीची वाँकथाँन होणार आहे. यात शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. सकाळी 10.00 वाजता श्री अन्न भरड धान्य मेळावा होणार आहे. यात भरड धान्यांपासून तयार करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचे प्रदर्शन भरवण्यात येईल. या प्रदर्शनात भरड धान्यांपासून तयार करण्यात आलेल्या विविध पौष्टिक खाद्य पदार्थांचे 80 स्टाँल असणार आहेत. मुंबईतील पंचतारांकित हाँटेल्सचे शेफही यात सहभागी होणार आहेत. भरड धान्यांपासून तयार केलेल्या खाद्य पदार्थांची प्रत्यक्ष पाककृती पाहण्याची आणि चव चाखण्याची संधी यावेळी मिळणार आहे.

यावेळी विविध स्पर्धा ही घेण्यात येणार आहे. शिवाय सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. त्यानंतर नवरात्री निमित्त रात्री गरबा दांडिया होणार आहे. सर्वांना प्रदर्शन स्थळी प्रवेश नि:शुल्क असणार आहे अशी माहिती भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या पश्चिम विभागाचे उपसंचालक डाँ. क्रुष्णा मेथेकर यांनी मुंबईत वांद्रे येथील मुंबई जिल्हा उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल, श्रीमती ज्योती हरणे सहाय्यक संचालक एफ एस एस ए आय, श्री अमोल जगताप सहाय्यक संचालक यांनीही विविध उपक्रमांची माहिती दिली.

महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने होणा-या या भरड धान्य मेळाव्यात सर्वांनी सहभागी व्हावे आणि निरोगी आरोग्यासाठी भरड धान्याचा आपल्या दैनंदिन आहारात वापर वाढवावा असे आवाहन मेथेकर यांनी केले आहे.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content