चालू 2024-25 या आर्थिक वर्षासाठी (17.06.2024 पर्यंत ) प्रत्यक्ष करसंकलनाचे तात्पुरते आकडे पाहिल्यास मागील आर्थिक वर्षाच्या (म्हणजे आर्थिक वर्ष 2023-24) संबंधित कालावधीतील 3,82,414 कोटी रुपयांच्या तुलनेत यावर्षी निव्वळ संकलन 4,62,664 कोटी रुपये झाले असून ही वाढ 20.99% आहे.
निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 4,62,664 कोटी रुपये (17.06.2024 रोजी) असून यात कॉर्पोरेशन कर (CIT) 1,80,949 कोटी रुपये, प्रतिभूती व्यवहार करासह वैयक्तिक प्राप्तिकर 2,81,013 कोटी रुपये (निव्वळ परतावा) समाविष्ट आहे. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी प्रत्यक्ष करांच्या एकूण संकलनाचे तात्पुरते आकडे (परताव्यासाठी समायोजित करण्यापूर्वी) 5,15,986 कोटी रुपये आहेत जो मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 4,22,295 कोटी रुपये होता आणि आर्थिक वर्ष 2023-24च्या संकलनाच्या तुलनेत यात 22.19% वाढ दिसून येते.
आर्थिक वर्ष 2024-25मध्ये 17.06.2024पर्यंत 53,322 कोटी रुपये परतावा रक्कम जारी करण्यात आली आहे जी मागील वर्षातील याच कालावधीत जारी केलेल्या परताव्यापेक्षा 33.70% अधिक आहे.