Homeएनसर्कललसींच्या चाचणीसाठी आणखी...

लसींच्या चाचणीसाठी आणखी २ केंद्रीय प्रयोगशाळा!

कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने, लसींच्या चाचण्यांना गती देण्यासाठी / लसी बाजारात आणण्यापूर्वी त्यांना प्रमाणपत्र देण्याच्या दृष्टीने आणखी दोन प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे आणि हैदराबाद येथे या प्रयोगशाळा उभारण्यात येत आहेत.

सध्या, देशात अशी एकच केंद्रीय औषध प्रयोगशाळा कसौली येथे आहे. भारतात मानवी शरीरासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधक औषधे/इंजेक्शन्सना (लस आणि अँटीसेरा) प्रमाणपत्र देणारी ही राष्ट्रीय नियंत्रक प्रयोगशाळा आहे. आता एनसीसीएस (National Centre for Cell Science) पुणे, या संस्थेलादेखील कोविड-१९ लसीची चाचणी करून त्याचा साठा जारी करण्यासाठीची केंद्रीय औषध प्रयोगशाळा म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे. या संदर्भातली राजपत्रित अधिसूचना केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने नुकतीच जारी केली. हैदराबादच्या एनआयएबी संस्थेलादेखील ही सुविधा देणारी अधिसूचना लवकरच जारी होण्याची शक्यता आहे.

पीएम केअर्स फंडमधून मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या आधारावर, या दोन्ही संस्थांनी अल्पावधीतच, अविरत प्रयत्न करून, या कामासाठी अत्याधुनिक सुविधा आपल्या प्रयोगशाळेत उभारल्या आहेत. या सुविधेअंतर्गत, दर महिन्याला लसींच्या ६० तुकड्यांची (बॅच) चाचणी करणे शक्य होऊ शकेल. या सुविधेमुळे, सध्या अस्तित्त्वात असलेल्या कोविड-१९ लसींच्या चाचण्यांना वेग मिळेल. यामुळे, लसींचे उत्पादन आणि पुरवठा तर वाढेलच, त्याशिवाय पुणे आणि हैदराबाद या दोन लसीकरण केंद्र असलेल्या शहरातच ही सुविधा उपलब्ध झाल्याने, चाचणीसाठीचा लॉजिस्टिक खर्च आणि वेळेचीही बचत होईल.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content