Homeकल्चर +योग दिनानिमित्त आजपासून...

योग दिनानिमित्त आजपासून दोघा माहितीपटांचे प्रसारण!

सातव्या आंतराष्ट्रीय योग दिन 2021 निमित्त आयोजित कार्यक्रमांचा एक भाग म्हणून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) आजपासून (२१ जून 2021) एनएफएआयच्या यूट्यूब वाहिनीवर ‘योग फॉर हेल्थ’ आणि ‘समाधी’ हे दोन प्रथितयश माहितीपट प्रसारित  करेल. हे दोन्ही चित्रपट एनएफएआयने डिजिटल केले आहेत.

ए. भास्कर राव दिग्दर्शित ‘योग फॉर हेल्थ’ हा माहितीपट 1950मध्ये तयार करण्यात आला आहे. योगाभ्यासाचे महत्त्व अधोरेखित करणार्‍या त्यांच्या सुरुवातीच्या कामांपैकी हा माहितीपट आहे. 11 मिनिटांच्या या माहितीपटात योगाच्या पुरातन विज्ञानाची आपल्याला ओळख करुन देण्यात आली असून सामर्थ्य, तग धरण्याची क्षमता आणि मानसिक दक्षता वाढविण्यात साहाय्यकारी काही विशिष्ट ‘आसने’ यात दाखविली आहेत.

मुंबईतील सांताक्रूझ येथे असलेल्या योग संस्थेच्या देखरेखीखाली हा चित्रपट फिल्म्स डिव्हिजन / डॉक्युमेंटरी फिल्म्स ऑफ इंडियाने सादर केला होता. छायाचित्रणकार दारा मिस्त्री यांनी या माहितीपटाचे छायांकन केले आहे. बार्कले हिल यांनी समालोचन केले असून व्ही. शिराली यांनी संगीत दिले आहे. माहितीपटाचे संकलन प्रताप परमार यांनी केले आहे तर पी. के. विश्वनाथ या चित्रपटाचे ध्वनी प्रभारी होते.

1977चा चित्रपट ‘समाधी’ हा फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय)चे माजी संचालक जॉन शंकरमंगलम यांनी तयार केला आहे. 22 मिनिटांचा हा चित्रपट प्रख्यात योग तज्ज्ञ बीकेएस अय्यंगार यांच्या जीवनाचा इतिहास दर्शवितो. या माहितीपटाच्या माध्यमातून, 59 वर्षीय अयंगार आपल्या विद्यार्थ्यांना योगासने शिकवत असल्याचे आणि पार्श्वसंगीतात संस्कृत सुभाषिते वाजत असल्याचे दाखविण्यात आले आहे.

सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि सतारवादक भास्कर चंदावरकर यांनी या चित्रपटाला संगीत दिले होते. शांत चिंतन, संगीताची जोड आणि पवित्र ग्रंथांमधील पठण या वातावरणात  व्यायामाच्या प्रात्यक्षिकांच्या विस्तृत माहितीसह योग भावना आणि तत्त्वज्ञानाचा मधुर संगम साधल्याबद्दल या चित्रपटाने  25व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट प्रयोगशील चित्रपटासाठी रजत कमळ पटकावले होते.

हे दोन्ही डॉक्यु-फिल्म्स आजपासून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या युट्यूब चॅनेलवर म्हणजेच (https://www.youtube.com/channel/UCIRA_1135D2YBUI1S2C8SIg) येथे पाहता येतील.

Continue reading

१ ऑगस्टला रूपेरी पडद्यावर झळकणार ‘मुंबई लोकल’!

मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता 'मुंबई लोकल' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर यांची जोडी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून येत्या १ ऑगस्टला हा...

57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला पहिल्यांदा भेट देणार भारतीय पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात तब्बल 57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला तसेच गेल्या 60 वर्षांत ब्राझिलला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असतील. 2 ते 9 जुलै 2025 असा पंतप्रधानांचा हा दौरा आहे. या कालावधीत ते घाना,...

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...
Skip to content