Thursday, October 24, 2024
Homeब्लॅक अँड व्हाईटप. बंगाल, आसाम-मेघालयात...

प. बंगाल, आसाम-मेघालयात २ दिवस अतिवृष्टीचे!

येत्या दोन दिवसांत उपहिमालयीन पश्चिम बंगाल तसेच आसाम-मेघालय भागात तीव्र ते अतितीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या 24 तासांत उत्तर भारताच्या बऱ्याच भागांमध्ये उष्णतेची तीव्र किंवा अतितीव्र लाट राहील आणि त्यानंतरच्या काळात उष्णतेचा प्रभाव हळूहळू कमी होईल, असा अंदाजही सांगण्यात आला आहे.

येत्या 3-4 दिवसांमध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड, ओदिशा, आंध्र प्रदेशचा तटवर्ती भाग आणि बंगालच्या आखाताचा वायव्य भाग, पश्चिम बंगालमधील गंगेचा तटवर्ती भाग, उपहिमालयीन पश्चिम बंगालचा उर्वरित भाग तसेच बिहार आणि झारखंडमधील काही भाग या क्षेत्रांमध्ये नैऋत्य मोसमी पावसाच्या पुढच्या प्रगतीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे.

आसामच्या वायव्य भागावर चक्रीवादळ घोंघावते आहे. निम्न उष्णकटिबंधीय पातळीवर बंगालच्या आखातातून वायव्य भारताकडे आग्नेयेकडून/दक्षिणेकडून सोसाट्याचे वारे अधिक प्रमाणात दिसत आहेत. त्यांच्या प्रभावामुळे पुढील 5 दिवसांत अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, नागालँड, मणिपूर,

आसाम
Anemometer, wind speed and direction measuring device.

मिझोरम आणि त्रिपुरा तसेच उपहिमालयीन पश्चिम बंगालच्या क्षेत्रात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह (30 तर 40 किमी प्रती तास वेगाने) मोठ्या प्रमाणावर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाउस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे 21 तारखेपर्यंत उपहिमालयीन पश्चिम बंगाल, आसाम आणि मेघालय तसेच अरुणाचल प्रदेश या भागांत तुरळक ठिकाणी तीव्र ते अतितीव्र स्वरुपाचा पाउस पडण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्राचा सौराष्ट्राच्या लगत असलेल्या ईशान्येकडील भागावर निम्न आणि मध्यम स्तरावर हवेची चक्राकार स्थिती घोंघावते आहे तसेच बंगालच्या उपसागराच्या पश्चिम मध्य भागात तटवर्ती आंध्रप्रदेशला लागून असणाऱ्या भागात निम्न उष्णकटिबंधीय स्तरावर आणखी एक चक्राकार दिसून येत आहे. त्यांच्या प्रभावामुळे येत्या 5 दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, कोकण आणि गोवा तसेच गुजरात राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

21 जूनपर्यंत कोकण आणि गोवा तसेच मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात तर 20 ते 21 जून या काळात गुजरात परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. येत्या 5 दिवसांत मध्य प्रदेशाच्या पश्चिम भागात तुरळक ठिकाणी वादळ, विजेचा कडकडाट तसेच सोसाट्याच्या वाऱ्यांसह (40 ते 60 किमी प्रती तास वेगाने) हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. या काळात मध्य प्रदेशाचा पूर्वेकडील भाग, विदर्भ तसेच छत्तीसगड येथे काही ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Continue reading

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना सुवर्णपदक

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश पवार यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिममध्ये सराव...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. 'जय जय स्वामी...

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...
Skip to content