Homeन्यूज अँड व्ह्यूजउद्या लाल किल्ल्यावर...

उद्या लाल किल्ल्यावर 1800 विशेष निमंत्रित!

नवी दिल्ली इथल्या लाल किल्ल्यावर यंदा स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला देशभरातून विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवलेले जवळपास 1800 विशेष निमंत्रित उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी भारत सरकारने त्यांना निमंत्रण दिले आहे. ऐतिहासिक लाल किल्ल्यावर 76व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने शालेय शिक्षकांना मान्यवर ‘विशेष अतिथी’ म्हणून आमंत्रित केले आहे. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने देशातील 50 खादी कारागीर आणि 18 विविध क्षेत्रांमधील 65 कारागिरांना (विश्वकर्मांना) त्यांच्या सहचरी/सहचारिणीसह स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे.

स्वातंत्र्यदिनी, 15 ऑगस्ट 2023 रोजी लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण कार्यक्रमात सहभाग नोंदवल्यानंतर ही मंडळी केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानी आयोजित समारंभात सहभागी होतील.

युवा मनांना आकार देण्यासाठी आणि त्यांची जोपासना करण्यासाठी आपापल्या क्षेत्रांमध्ये असामान्य समर्पण आणि वचनबद्धतेचे दर्शन घडवणाऱ्या 50 शालेय शिक्षकांच्या विशेष निवड केलेल्या एका गटाला शालेय शिक्षण विभागाने आमंत्रित केले आहे. हे शिक्षक देशभरातील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ(सीबीएसई) आणि केंद्रीय विद्यालय संगठन शाळांमधील शिक्षक आहेत. 14 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023 दरम्यान होणाऱ्या दोन दिवसीय कार्यक्रमात हे विशेष अतिथी सहभागी होणार आहेत आणि देशाचा वारसा आणि प्रगतीचा अनुभव घडवणाऱ्या विविध उपक्रमांचा त्यांच्या या दोन दिवसीय भेटीच्या वेळापत्रकात समावेश आहे.

ऑगस्ट 14, 2023: इंडिया गेट, युद्ध स्मारक आणि प्रधानमंत्री संग्रहालयाला भेट. ज्यांनी देशाच्या सार्वभौमत्वाचे  रक्षण केले त्या शूर जवानांना ते कर्तव्य पथावर आदरांजली वाहतील. या वीरांचे धैर्य आणि बलिदान या स्थानाला भेट देणाऱ्यांच्या मनामध्ये कायमचे कोरले जाईल. नवी दिल्लीत तीन मूर्ती मार्गावरील प्रधानमंत्री संग्रहालयाला भेट देण्यामुळे त्यांची आपल्या देशाच्या भविष्याला आकार देणाऱ्या दूरदर्शी नेत्यांच्या दृष्टीकोनाशी ओळख होईल. त्यानंतर शालेय शिक्षक आणि केंद्रीय राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह यांच्याशी संवाद सत्राचे आयोजन करण्यात येईल.

15 ऑगस्ट 2023: ऐतिहासिक लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभाग, जिथे देशप्रेमाची भावना जागवणाऱ्या राष्ट्रगीताच्या सुरांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.

स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या निमित्ताने या सन्मानाच्या माध्यमातून शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, आपल्या असामान्य वचनबद्धतेने देशाच्या भविष्याची जोपासना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करत आहे. युवा पिढीमध्ये  ज्ञान, मूल्ये आणि कौशल्य रुजवणारी त्यांची भूमिका अनमोल आहे आणि या गौरवाच्या माध्यमातून त्यांच्याविषयी देशाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content