Homeहेल्थ इज वेल्थमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत दीड वर्षात १५६ कोटींचे अर्थसहाय्य

आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने अवघ्या १७ महिन्यांत १९ हजारांपेक्षा अधिक गोरगरीब-गरजू रुग्णांना एकूण १५६ कोटी ६० लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे. त्यामुळे १९ हजारांहून अधिक रुग्णांचे प्राण वाचले आहेत.

या कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरायम आरोग्याचा प्रकाश आणला आहे. या योजनेमुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळत असल्याने ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. गोरगरीब-गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. या योजनेमुळे रुग्णांचे प्राण वाचत असल्याने मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण हा मदतीविना वंचित राहता कामा नये याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारताच महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तत्काळ सुरू केला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मूळ संकल्पना मांडणाऱ्या मंगेश चिवटे यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करून मुख्यमंत्र्यांनी या कक्षाची जबाबदारी दिली होती.

वैद्यकीय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली मागील जुलै महिन्यात १७८ रुग्णांना ७६ लाखांची मदत देण्यात आली.ऑगस्ट महिन्यात २४४ रुग्णांना १ कोटी १ लाख, सप्टेंबर महिन्यात ३१९ रुग्णांना १ कोटी ८६ लाख, ऑक्टोबर महिन्यात २७६ रुग्णांना २ कोटी ३५ लाख, नोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाख, डिसेंबर महिन्यात १०३१ रुग्णांना ८ कोटी ५२ लाख, जानेवारी २०२३ मध्ये १०३२ रुग्णांना ८ कोटी ९० लाख तर फेब्रुवारी २०२३मध्ये १२७४ रुग्णांना १० कोटी ५९ लाख, मार्च २०२३ मध्ये १४६९ रुग्णांना ११ कोटी ९३ लाख, एप्रिलमध्ये ११९० रुग्णांना ९ कोटी ९१ लाख, मे मध्ये १३२९ रुग्णांना ११ कोटी २५ लाख, तर जूनमध्ये १७२८ रुग्णांना १४ कोटी ६२ लाख, जुलै १४८८ रुग्णांना १२ कोटी ७२ लाख, ऑगस्ट मध्ये १५६७ रुग्णांना १३ कोटी १४ लाख, तर सप्टेंबरमध्ये विक्रमी १४०८ रुग्णांना ११ कोटी ७७ लक्ष रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी आता मंत्रालयात जाण्याचीही गरज नाही. पूर्णपणे ऑनलाईन प्रोसेस करून वैद्यकीय मदत मिळणार असल्याचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले. यासाठी 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळविता येईल.

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी,  कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया,सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण,जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.

Continue reading

वसुबारस आणि भाऊबीज नाहीत दीपावलीचे भाग!

दीपावली हा प्रकाशाचा उत्सव! अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी! दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला...

डोनाल्ड ट्रम्पच्या मनमानीला लागणार लगाम?

मनात आले, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना उचलून आणलं, इराणवर हल्ला केला, भारताच्या रशियाकडून होणाऱ्या तेलखरेदीवर निर्बंध लादले, आयातकर (टॅरिफ) दुप्पट-तिप्पट केला, अमेरिकेतल्या भारतीयांच्या व्हिसावर निर्बंध लादले, अशी मनमानी करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकारांना लगाम लागणार की, हे अधिकार अधिक...

पंतप्रधान मोदी करणार आज पुण्याच्या ‘पिंक लाईन’ मेट्रोचे उद्घाटन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, सुमारे 21,800 रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी तसेच ‘पिंक लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका 3चे उद्घाटन करणार आहेत. 8,300 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात...
Skip to content