Homeटॉप स्टोरीदोन वर्षांत कोकणातील...

दोन वर्षांत कोकणातील 10 कृषी महाविद्यालये बंद!

बीएससी कृषी अभ्यासक्रम असलेल्या महाविद्यालयांपेक्षा, कृषी अभियांत्रिकी, जैवतंत्रज्ञान आणि अन्न तंत्रज्ञानातील तीन बीटेक कार्यक्रमांसह संलग्न कार्यक्रम चालवणाऱ्या महाविद्यालयांमध्ये रिक्त जागांचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांत कोकणातली किमान 10 कृषी महाविद्यालये बंद झाली आहेत, ज्यामध्ये 15 पैकी सहा कृषी अभियांत्रिकी संस्थांचा समावेश आहे, एक फलोत्पादन, एक बायोटेक, एक अन्न तंत्रज्ञान आणि एक एबीएम कॉलेज आहे.

अत्यंत धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी ही बातमी आहे. एकीकडे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट, शेतकरी सन्मान योजना राबविल्या जात असताना दुसरीकडे नव्या पिढीतील, नव्या दृष्टीने तरुण शेतकरी घडविणारी प्रक्रिया धोक्यात आली आहे. राज्यातील कृषी अभ्यासक्रमांमधील प्रवेश संकटात आले आहेत. 10 महाविद्यालये बंद पडली असून 44 संस्थांमध्ये अर्ध्याहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत.

खाजगी संस्थांमध्ये रिक्त जागांचे प्रमाण अधिक

सरकारी डेटावरून मागणी-पुरवठा विसंगती विविध महाविद्यालयांवर कसा परिणाम करते, यात स्पष्ट तफावत दिसून येते. चार राज्य कृषी विद्यापीठांमधील 198 पैकी 86 महाविद्यालयात या वर्षी त्यांच्या सर्व पदवीपूर्व जागा भरल्या गेल्या. 44 संस्थांमध्ये मात्र चिंताजनक स्थिती आहे. तिथे 50% किंवा त्याहून अधिक रिक्त जागांची नोंद झाली आहे. खाजगी संस्थांमध्ये रिक्त जागांचे प्रमाण अधिक आहे, त्यापैकी फक्त एक तृतीयांश, 151पैकी 54ने शंभर टक्के प्रवेश नोंदवले आहेत. तीन खाजगी कृषी अभियांत्रिकीसह सहा संस्था या वर्षी एकही विद्यार्थी मिळवू शकले नाहीत.

बीएससी अ‍ॅग्रीकल्चर, बीटेक: 50% जागा रिक्त

चालू शैक्षणिक वर्षासाठी नऊ पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची मुदत संपत आली, तेव्हा उपलब्ध 16,829 जागांपैकी पैकी 13,897 म्हणजे जवळजवळ 82% जागा भरल्याचे दिसून आले. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ही सुधारणा असली तरी, एकेकाळी 2017-18मध्ये, 15,000पैकी जवळजवळ सर्व जागांवर प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांनी दावा केला होता.

सरकारी संस्थांमध्ये रिक्त जागांचे प्रमाणही चिंताजनक

47 सरकारी संस्थांपैकी 15 संस्थांमध्येही सर्व जागा भरण्यात अपयश आले. ज्या सरकारी संस्थांमध्ये रिक्त जागांचे प्रमाण चिंताजनकपणे जास्त आहे, त्यातील बहुतांश मराठवाड्यातील आहेत. बीड जिल्ह्यातील कृषी व्यवसाय व्यवस्थापन (एबीएम) महाविद्यालयात 77% जागा रिक्त आहेत. परभणी येथील राज्यातील एकमेव सामुदायिक विज्ञान महाविद्यालय 58% जागा शिल्लक राहिल्या आहेत.

कोकण कृषी विद्यापीठात सर्वात कमी प्रवेश

राज्यभरात रिक्त पदे मोठ्या प्रमाणावर असताना, दापोली (रत्नागिरी) येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या (बीएसकेकेव्ही) घटक आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये सर्वात कमी प्रवेश नोंदवले गेले आहेत. विद्यापीठाच्या 25 महाविद्यालयांमधील 2,023 पदवीपूर्व जागांपैकी फक्त 57% जागा भरल्या गेल्या आहेत. बीएसकेकेव्हीचे प्रादेशिक अधिकारक्षेत्र राज्याच्या किनारपट्टीवरील सहा जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे.

Continue reading

काय आहे भवितव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे?

कोविड महामारी आणि त्यानंतर इतर मागासवर्गीय (OBC) आरक्षणावरील न्यायालयीन खटल्यांमुळे रखडलेली लोकशाहीची प्रक्रिया महाराष्ट्रात पुन्हा एकदा सुरू झाली आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असला तरी उत्साह आणि अपेक्षांच्या या वातावरणात...

2026मध्ये कोणत्या डिग्रींना असेल मागणी? MBA कालबाह्य ठरतंय का?

आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात, बारावीनंतर कोणती पदवी (डिग्री) निवडावी या गोंधळात अनेक विद्यार्थी अडकले आहेत. "सुरक्षित" करिअरबद्दलच्या पारंपरिक कल्पनांना आता आव्हान मिळत आहे आणि पूर्वी महत्त्वाच्या वाटणाऱ्या अनेक पदव्या आज तितक्या प्रभावी राहिलेल्या नाहीत. तुमच्या मनातील हीच भीती आणि...

बिबट्यांची नवी पिढी जंगल विसरलेले ‘शहरी शिकारी’!

भीती आणि वास्तवाच्या पलीकडे रात्रीच्या अंधारात घरामागे होणारी किर्रर्र... आणि दुसऱ्या दिवशी आढळणारे कुत्र्याचे अवशेष. महाराष्ट्रातील शहरांच्या वेशीवर बिबट्याचे अस्तित्त्व आता केवळ बातमी नाही, तर अनेकांसाठी ती एक जिवंत भीती बनली आहे. बिबट्या म्हणजे 'नरभक्षक', एक धोकादायक प्राणी, ही...
Skip to content