Details
२८ सप्टेंबरला `छोटीसी बात’
26-Sep-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा रंगस्वर विभाग आणि प्रभात चित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २८ सप्टेंबर २०१९ यादिवशी बासू चटर्जी दिग्दर्शित `छोटीसी बात’ या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी साडेसहा वाजता चौथा मजला, रंगस्वर सभागृह, य़शवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरीमन पॉईंट येथे त्याचे सादरीकरण होणार असून रंगस्वर आणि प्रभात चित्र मंडळाच्या सदस्यांना प्राधान्याने प्रवेश दिला जाईल.
एक हलकाफुलका आणि सगळे ताण विसरायला लावणारा हा सिनेमा ४३ वर्षांचा झाला आहे. चाळीशीच्या अनुभवाचं गाठोडं उलगडून दाखवावं तसा हा सिनेमा आहे. सिनेमातले छोटे छोटे प्रसंग अगदी त्या-त्या जागी चपखल बसले आहेत. आजही हा सिनेमा पाहिला की आपण रिफ्रेश होतो हे हा सिनेमा चिरतरूण राहण्यामागचं कारण आहे. बासू चटर्जी या दिग्दर्शकाने सिनेसृष्टीला दिलेलं योगदान कधीही न विसरता येण्यासारखं आहे. छोटीसी बात, यासारखे वेगळ्या धाटणीचे सिनेमे आणि विषय त्यांनी सिनेसृष्टीला दिले.”
केएचएल न्यूज ब्युरो
“मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा रंगस्वर विभाग आणि प्रभात चित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २८ सप्टेंबर २०१९ यादिवशी बासू चटर्जी दिग्दर्शित `छोटीसी बात’ या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी साडेसहा वाजता चौथा मजला, रंगस्वर सभागृह, य़शवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरीमन पॉईंट येथे त्याचे सादरीकरण होणार असून रंगस्वर आणि प्रभात चित्र मंडळाच्या सदस्यांना प्राधान्याने प्रवेश दिला जाईल.”
“एक हलकाफुलका आणि सगळे ताण विसरायला लावणारा हा सिनेमा ४३ वर्षांचा झाला आहे. चाळीशीच्या अनुभवाचं गाठोडं उलगडून दाखवावं तसा हा सिनेमा आहे. सिनेमातले छोटे छोटे प्रसंग अगदी त्या-त्या जागी चपखल बसले आहेत. आजही हा सिनेमा पाहिला की आपण रिफ्रेश होतो हे हा सिनेमा चिरतरूण राहण्यामागचं कारण आहे. बासू चटर्जी या दिग्दर्शकाने सिनेसृष्टीला दिलेलं योगदान कधीही न विसरता येण्यासारखं आहे. छोटीसी बात, यासारखे वेगळ्या धाटणीचे सिनेमे आणि विषय त्यांनी सिनेसृष्टीला दिले.”
मुंबईयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानरंगस्वर विभागप्रभात चित्र मंडळबासू चटर्जीछोटीसी बात