HomeArchiveही आहेत पंच...

ही आहेत पंच केदार म्हणून विख्यात!

Details
ही आहेत पंच केदार म्हणून विख्यात!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
भगवान शंकर म्हणजे भोळा सांब सदाशिव! हा एकमात्र देव जो सज्जनांमध्येही प्रिय नि असुरांचाही आवडता. मागचापुढचा विचार न करता वरदान देणारा तस्साच कोणी डोईजड झाल्यास त्यावर मार्ग काढून त्याला ठेचणारादेखील! स्मशानात राहून वैराग्याचा संदेश देत संसार सुखाकडे महादेव दुर्लक्ष करीत असले तरी काही अपवाद वगळता भक्त यात रममाण असतात.

आपण जाणून घेणार आहोत ते पंच केदार या शंकाराच्या तीर्थस्थानांविषयी. देवभूमी उत्तराखंडमध्ये शिवाची पंच केदारस्थाने आहेत. त्यांच्या विविध स्वरूप वैशिष्टयाची येथे पूजा होते. स्कंद पुराणात केदारखंड भागात पंच केदारचं वर्णन आढळतं. यात प्रथम केदार भगवान केदारनाथ आहे ज्यांना बारावे ज्योतिर्लिंग म्हणूनही ओळखले जाते. द्वितीय केदार मदमाहेश्वर आहे. तृतीय केदार तुंगनाथ, चतुर्थ केदार भगवान रूद्रनाथ,पंचम केदार कलेश्वर आहे. पंच केदारची कथा अशी की, महाभारत युद्धात विजयी झाल्यावर पांडव, भावाच्या हत्त्येच्या पापातून मुक्त होऊ पाहत होते. त्यासाठी आवश्यक असलेला भगवान शंकराचा आशीर्वाद घेण्यास शोध घेत घेत ते हिमालयात पोहचले. मात्र शिवजीच्या मनात त्यांना दर्शन द्यायचे नव्हते, म्हणून ते अदृश्य होऊन केदारात गेले. पांडव तिथेही पोहोचले. तेव्हा ओळख लपविण्यासाठी शंकरांनी बैलरूप धारण केले नि इतर पशूंमध्ये मिसळले. याची शंका पांडवाना येताच भीमाने विशाल रूप धारण करीत दोन पर्वतावर आपले पाय पसरले. त्याखालून अन्य गाई बैलं निघाले पण भगवान शंकर रूपातील बैल जाण्यास तयार होई ना! त्या बैलाकडे भीम धावताच तो बैल भूमीत अंतर्ध्यान पावू लागला. हे लक्षात येताच भीमाने चपळाईने बैलाचा पाठीचा त्रिकोणात्मक भाग पकडला. अखेर पांडवांची भक्ती नि दृढ संकल्प पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांना पापमुक्त केलं. तेव्हापासून शंकराच्या बैल पाठीच्या आकाराची पिंडी स्वरूपात केदारनाथमध्ये पूजा केली जाते तर अशी मान्यता आहे की अंतर्धान होत असता धडाच्या वरील भाग काठमांडूत प्रकट झाला. तिथे आता प्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिर आहे. शिवजींची भुजा-बाहू तुंगनाथमध्ये, मुख रुद्रनाथ येथे, नाभी मदमहेश्वर येथे आणि जटा कल्पेश्वर येथे प्रकट झाली. त्यामुळे या चारी स्थानांना मिळून केदारनाथ धामसह पंच केदार संबोधले जाते.

केदारनाथ धाम

समुद्रसपाटीपासून सुमारे साडे बारा हजार फूट उंचीवरील केदारनाथ मंदिर उत्तराखंडमध्ये रुद्रप्रयाग जिल्ह्यात आहे. केदारचा अर्थ दलदल असा आहे. दगडांनी बनलेल्या कातयुरी शैलीतील मंदिराची निर्मिती पांडवानी केल्याचे तर आदी शंकराचार्यांनी त्याचा जीर्णोद्धार केल्याचे सांगितले जाते. मंदिराची खासियत आपण २०१३ च्या प्रलयात पाहिली. त्यात काहीही न होता मंदिर जसेच्या तसे आहे. मंदिर (दरवाजे) उघडण्याचा काळ हा साधारण एप्रिल-नोव्हेंबर हा असतो. श्रद्धेवर विश्वास ठेवावा का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण, तब्बल १२०० वर्षे आपली संस्कृती, मजबुती टिकवून ठेवणारं मंदिर उभारण्यामागे अगदी जागेची निवड करण्यापासून ते त्याची दिशा, त्याच बांधकामाचं मटेरियल आणि अगदी निसर्गाचा पुरेपूर विचार केला गेला ह्यात शंका नाही.
टायट्निक बुडाल्यावर पाश्चिमात्य देशांना एन.डी.टी. टेस्टिंग आणि तपमान कसं सगळ्यावर पाणी फिरवू शकते हे समजलं. पण, आमच्याकडे तर त्याचा विचार १२०० वर्षापूर्वी केला गेला होता. केदारनाथ त्याच ज्वलंत उदहरण नाही का? काही महिने पावसात, काही बर्फात, तर काही वर्ष बर्फाच्या आतमध्ये राहून उन, वारा, पाऊस ह्यांना पुरून उरत समुद्रसपाटीपासून ३९६९ मीटर वर ८५ फूट उंच, १८७ फूट लांबीचं, ८० मीटर लांबीचं मंदिर उभारताना त्याला तब्बल १२ फुटांची जाड भिंत आणि ६ फुटांच्या उंच प्लॅटफॉर्मची मजबुती देताना किती प्रचंड विज्ञान वापरलं असेल याचा विचार केला तरी आपण स्तिमित होऊ. आज सगळ्या प्रलयानंतर पुन्हा एकदा त्याच भव्यतेने १२ ज्योतिर्लिंगांपेकी सगळ्यात उंचीवरचं असा मान मिळवणाऱ्या केदारनाथच्या वैज्ञानिक बांधणीपुढे मी नतमस्तक.

मदमहेश्वर मंदिर

हे पण बारा हजार फूट उंचीवर चार खांबाच्या शिखराखाली स्थापित आहे. हे द्वितीय केदार म्हणून प्रसिद्ध आहे. येथे भगवान शंकराच्या मध्य भागाचे दर्शन होते. दक्षिण भारतातील शैव पुजारी इथेही पूजा करतात. नैसर्गिक सुंदरतेमुळे शिव-पार्वतीने आपला मधुचंद्र इथेच केल्याचं पौराणिक कथेतून कळते. येथील पाणी पवित्र असून काही थेंबच मोक्ष प्राप्तीसाठी पुरेसे आहेत अशी श्रद्धा आहे. शीतकाळात सहा महिने मंदिर बंद असते. त्यानंतर पूजाअर्चा होते.

तुंगनाथ मंदिर

तृतीय केदार म्हणून नि भारताचे सर्वात उंचीवरील म्हणून ख्यात असलेले हे मंदिर ३६८०मीटर उंचीवर स्थापित आहे. इथे शंकराच्या हाताची-बाहूची पूजा होते. चंद्राशील पर्वताखाली काळ्या दगडाचे हे मंदिर रमणीय ठिकाण आहे. एक हजार वर्षांहून अधिक जुन्या या मंदिराची निर्मिती शिव आराधना प्रसन्नतेसाठी पांडवानी केल्याचे सांगितले जाते. मक्कुमठचे मक्काणी ब्राह्मण येथील पुजारी आहेत. शीतकाळात मंदिर बंद असले तरी मक्कूमठात भगवान तुंगनाथाची पूजा होते.

रुद्रनाथ मंदिर

हे मंदिर समुद्र सपाटीपासून २२८६ मीटर उंचीवर एक गुंफेत आहे. त्यात पिंडीच्या उभट भागात भगवान शिवाच्या मुखाचे दर्शन होते. देशात हे एकमेव स्थान आहे जिथे शंकरच्यां चेहऱ्याची पूजा होते. एकानन रूपात रुद्रनाथ, चतुरानन रूपात पशुपतीनाथ-नेपाळ,पंचनान स्वरूपात इंडोनेशिया त शिवाच दर्शन होतं. रुद्रनाथ दर्शनासाठी एक रस्ता उर्गम घाटातून दमूक गावकडून जातो. पण ती दुर्गम असल्याने पोहोचण्यास दोन दिवस लागतात. त्यामुळे गोपेश्वरच्या सगर गावाकडून भक्त यात्रा सुरू करतात. थंडीच्या दिवसात मंदिर बंद असल्याने गोपेश्वरात शिवाची पूजा होते.

कल्पेश्वर मंदिर

पंचम केदार असलेल्या या मंदिरास कल्पनाथ असेही ओळखले जाते. महेश्वराच्या जटेचं दर्शन घेता येते, बाराही महिने ते घेऊ शकतो. दुर्वास ऋषींनी कल्पवृक्षाखाली घोर तपस्या केल्यानं या स्थानाला हे नाव मिळाले. अन्य कथेनुसार राक्षसांच्या अत्याचारांनी त्रस्त झालेल्या देवांनी इथे नारायणस्तुती केली नि अभय वरदान मिळवले. २१३४ मीटर उंचीवरील मंदिरात पोहोचण्यासाठी दहा किमी चालावे लागते. श्रद्धाळू जटेसारख्या दिसणाऱ्या खडकाकडे पोहोचतात. गर्भगृहाचा रस्ता एका गुंफेतून जातो. बघा कधी पुण्ययोग येतो तो. आलाच तर माझाही नमस्कार सांगा!”
 
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत...

भारत-पाक-अफगाणिस्तानच्या डोक्यावर हजार किमीचा असामान्य पाऊसपट्टा!

भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर सध्या एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली हवामानप्रणाली सक्रिय झाली आहे. तब्बल एक हजार किलोमीटर लांबीचा एक सलग पाऊसपट्टा या तीन देशांवर पसरला असून हवामानतज्ज्ञांनी याला अत्यंत असामान्य घटना म्हणून संबोधले आहे. साधारणपणे अशा हवामानप्रणाली वक्राकार...
Skip to content