HomeArchiveसाने गुरूजींची शाळा!

साने गुरूजींची शाळा!

Details
साने गुरूजींची शाळा!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

देवेंद्र भुजबळ, माध्यमकर्मी
“श्यामची आई” हे पुस्तक शाळेत असताना मी वाचलं होतं. त्यानंतर ते कितीदा वाचलं, याची गणतीच नाही. तेव्हापासून ” श्यामची आई” आणि या पुस्तकाचे लेखक पूज्य सानेगुरुजी यांनी माझ्या मनात कायमचं घर केलं आहे. कदाचित “श्यामची आई” वाचलेल्या प्रत्येकाला हा अनुभव आला असेल. सानेगुरुजी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रताप हायस्कूलमध्ये काही वर्षे शिक्षक होते. तिथे शिकवत असतानाच त्यांनी आपल्या देशाच्या, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली होती, हे वाचून माहिती होतं, त्यामुळे या शाळेला भेट देण्याची माझी फार वर्षांपासून इच्छा होती. ती नुकतीच फलद्रूप झाली.

या शतकोत्तर शाळेचा इतिहास अत्यन्त दैदिप्यमान आहे. पारतंत्र्यात असलेल्या आपल्या देशातील तरूणांमध्ये स्वातंत्र्यप्रियता, निर्भयता, निर्माण व्हावी, त्यांना राष्ट्रीय शिक्षण मिळावे म्हणून विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर, या तिघांनी आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी पुण्यात १८८४ साली डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्या संस्थेच्या पावलावर पाऊल टाकत खांदेशातील पहिलीच असलेली, खांदेश एज्युकेशन सोसायटीची अमळनेर येथे स्थापना करण्यात आली. अण्णासाहेब म्हसकर, बाळूकाका भागवत, भिडे वकील यांच्या सहकार्याने १७ जुलै १९०८ रोजी माळ्याच्या मढीत शाळा सुरू झाली. अमळनेर पूर्व आणि पश्चिम खांदेशाच्या मध्यावर असल्याने दोन्ही बाजूचे विद्यार्थी शाळेत दाखल होऊ लागले. त्याचसुमारास राष्ट्रीय विचारांनी भारलेले वासुदेव महादेव भावेगुरूजी नोकरीच्या शोधात धुळ्यात आले होते. तेथे अमळनेर येथील द. वा. ब्रह्मे यांच्याशी त्यांची भेट झाली. अमळनेरला शिक्षणाची फारशी सोय नाही, तिथे तुम्ही याल का, अशी विचारणा ब्रह्मे यांनी भावेगुरूजींना केली. भावेगुरूजींनी होकार दिला आणि ते अमळनेरला आले. पुढे ज. ग. गुणे, जांभेकर, नवाथे, ह. कृ. मोहनी, सानेगुरूजी, वाड, जठार आदी धेयनिष्ठ शिक्षकांची मांदियाळी शाळेस लाभली. श्रीमंत प्रतापशेठ यांचा वरदहस्त लाभल्याने शाळेच्या स्वतंत्र इमारती उभ्या राहिल्या.

पांडुरंग सदाशिव साने उर्फ सानेगुरूजी १९२४ साली या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. ते मराठी आणि इतिहास हे विषय शिकवत. ते शाळेच्या छात्रालयातच राहत. अल्पावधीतच ते विद्यार्थीप्रिय झाले. उनाड, बेशिस्त विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याची त्यांची अनोखी पध्दत असे. ती म्हणजे त्या विद्यार्थ्यांना शिक्षा न करता ते स्वतःलाच शिक्षा करून घेत. त्यांच्या वर्गात एक उनाड, श्रीमंत विद्यार्थी होता. तो वर्गात सर्वांना त्रास देत असे. थुंकत असे. गुरूजींनी त्याला प्रेमाने नीट वागण्याविषयी अनेकदा सांगितले. तरीही तो ऐकेना. मग एकेदिवशी गुरूजींनी वर्गाच्या मॉनिटरला शाळेच्या कार्यालयातून छडी आणण्यास सांगितले. हे पाहून विद्यार्थ्यांना खूप आश्चर्य वाटलं. कारण कुणालाही शिक्षा करणं हे गुरूजींच्या स्वभावात नव्हतं. छडी आणण्यात आली. गुरूजी आता त्या विद्यार्थ्यास बेदम मारतील की काय म्हणून सर्व विद्यार्थी बघू लागले, तर काय आश्चर्य! त्या विद्यार्थ्यास छडी मारण्याऐवजी गुरू आपल्याच हातावर सपासप छड्या मारू लागले. हे पाहून तो उनाड विद्यार्थी रडू लागला. त्याने गुरूजींचे पाय धरले, त्यांची क्षमा मागितली आणि पुढे कधीच चुकीचे न वागण्याचे वचन दिले.

छात्रालयात एकदा बोलण्याच्या ओघात एका विद्यार्थ्यांने गुरूजींना अमुक एक विद्यार्थी सिगारेट ओढतो असे सांगितले. हे ऐकून गुरूजी अतिशय खिन्न झाले. त्यानंतर गुरूजी दोन दिवस गप्पच होते. गुरूजी त्यावेळी स्वतः पहाटे चार ते पाच या वेळेत विद्यार्थ्यांसाठी हस्तलिखित वार्तापत्र तयार करून ते वार्ताफलकावर लावत. तीन दिवसांनंतरच्या हस्तलिखितात त्या विद्यार्थ्याच्या व्यसनाबद्दल दुःख व्यक्त करून माझा विद्यार्थी व्यसनी झाला, हा माझा अपराध आहे, म्हणून मला कोणी तरी शिक्षा करा रे! असे आर्त शब्द त्यांनी लिहिले. याचा व्हायचा तोच योग्य परिणाम झाला. त्या व्यसनी विद्यार्थ्यांने गुरूजींची माफी मागितली आणि तो व्यसनापासून दूर झाला. भारतीय संस्कृतीतील आत्मक्लेश या उच्च तत्त्वाचे ते विद्यार्थ्यांना असे दर्शन घडवत.

साने गुरूजींचे शाळेतील आणि छात्रालयातील विद्यार्थ्यांवर बारीक लक्ष असे. विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा जोपासना करू नये म्हणून ते दक्ष असत. छात्रालयातील काही विद्यार्थी अंधश्रद्धाळू आहेत, हे त्यांना कळले. परीक्षेत चांगले गुण मिळावे म्हणून हे विद्यार्थी दर शनिवारी एका मंदिरात जात असत. एकदा या विद्यार्थ्यांना त्यांनी वाटेत अडवून सांगितले, अरे, देवाला साकडे घातल्याने देव प्रसन्न तर होत नाहीच उलट, आपण आपला मौल्यवान वेळ व्यर्थ घालवतो. आपण आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडल्यास देवाचे आशीर्वाद मिळतील, असे सांगून तो वेळ अभ्यासात घालवावा, असे त्यांना समजावून सांगितले.

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याच्या महात्मा गांधी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत साने गुरूजींनी २९ एप्रिल १९३० रोजी शाळा सोडली आणि ते पूर्णपणे स्वातंत्र्यलढ्यात उतरले. छात्रालयातील ज्या खोलीत गुरूजी राहत तिथे संस्थेने साने गुरूजी स्मृतीकक्ष उभारला आहे. या कक्षात त्यांची दैनंदिनी, अन्य साहित्य, त्यांचं जीवनदर्शन घडविणारं प्रदर्शन आहे. या शाळेला १० जुलै १९३४ रोजी रौप्यमहोत्सव तर तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत २१ मार्च १९५९ रोजी सुवर्णमहोत्सव साजरा करता आला. १९८३मध्ये झालेल्या अमृतमहोत्सवाला तत्कालीन मंत्री सुधाकर नाईक, अमळनेर येथील विप्रो कम्पनीचे उद्योगपती अझीम प्रेमजी उपस्थित होते. अझीम प्रेमजी यांनी उदारपणे दिलेल्या देणगीतून तांत्रिक कक्ष निर्माण झाला. १९९५ च्या सुमारास शाळेत संगणक शिक्षण सुरू झाले. १७ औगस्ट २००८ रोजी संस्थेचा शतकमहोत्सव खूप उस्ताहात साजरा झाला. आता या शाळेला पूर्ण डिजिटल शाळा करण्याचा आणि यावर्षी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्याचा मानस विद्यमान मुख्याध्यापक प्रमोदिनी पाटील यांनी व्यक्त केला. त्या स्वतः सानेगुरूजीप्रेमी असल्याने जळगाव येथील नोकरी सोडून या शाळेत दाखल झाल्या आहेत.

अत्यन्त तळमळीने विद्यार्थी घडविण्याची येथील गौरवशाली परंपरा त्या व इतर शिक्षक मनोभावे पार पाडत आहेत. खरं म्हणजे, मी, माझी पत्नी अलका, माझी भावजय स्मिता, माझा पुतण्या स्वप्नील, त्याची वागदत्त वधू शिबानी, तिचे वडील, या शाळेचेच माजी विद्यार्थी संजय अंधारे असे सर्व न कळवता शाळेत गेलो होतो. पण याविषयी जराही नाराजी न दाखवता, उलट अत्यंत आनंदाने पाटील मॅडमनी आम्हाला सर्व परिसर, शाळा, स्मृतिकक्ष दाखवला, गुरूजींच्या हस्ताक्षरातील कविता, शतक महोत्सवानिमित्ताने प्रकाशित करण्यात आलेली समरणिका भेट दिली. या लेखनासाठी या समरणिकेचा आणि पाटील मॅडम यांनी अत्यन्त अगत्याने दिलेल्या माहितीचा खूप उपयोग झाला, हे येथे नमूद केले पाहिजे. आमची ही भेट सन्समरणीय ठरवली याबद्दल पाटील मॅडम आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार!”
 
“देवेंद्र भुजबळ, माध्यमकर्मी

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content