HomeArchiveसरासरीनंतरही ‘सीबीएसई’च्या 400...

सरासरीनंतरही ‘सीबीएसई’च्या 400 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव!

Details

 
 
“केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
मूल्यांकनाचे विविध निकष लावून सीबीएसईच्या १२वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला असला तरी या निकषांचा आधार घेऊन 400 विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात सीबीएसई बोर्ड अपयशी ठरले आहे. इतर विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करताना मंडळाने या विद्यार्थ्यांचे निकाल मात्र राखून ठेवले आहेत.
 
त्याचबरोबर विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन त्यांच्या मानसिक समाधानासाठी यापुढे नापास किंवा अनुत्तीर्ण, असा शब्दप्रयोग न करता त्याऐवजी ‘‘पुन:प्रयत्नाची आवश्यकता’’ असा शब्दप्रयोग करण्याचा निर्णय सीबीएसईने घेतला आहे. या निकालापासूनच त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे मुलांच्या निकालपत्रामध्ये ‘अनुत्तीर्ण किंवा अयशस्वी’ अशी संज्ञा वापरण्यात येणार नाही. संकेतस्थळावर दिलेल्या निकालातही अयशस्वी ही संज्ञा असणार नाही.
 
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईने सोमवारी इयत्ता बारावीचा निकाल घोषित केला. या परीक्षेत त्रिवेंद्रम विभागातल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांाची टक्केवारी सर्वाधिक आहे. या विभागातले 97.67 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याखालोखाल बेंगळुरू विभागाचा निकाल 97.05 टक्के आहे. तर चेन्नई तिसऱ्या स्थानावर असून या विभागाचा निकाल 96.17 टक्के आहे. या परीक्षेला एकूण 11,92,961 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 10,59,080 मुले उत्तीर्ण झाली आहेत. एकूण उत्तीर्ण मुलांचे प्रमाण 88.78 टक्के आहे. हे प्रमाण याआधीच्या वर्षीपेक्षा 5.38 टक्क्यांनी जास्त आहे.
 
सीबीएसई बारावी परीक्षा मंडळाने 15 फेब्रुवारी ते 30 मार्च 2020 या काळामध्ये इयत्ता बारावीची परीक्षा आयोजित केली होती. मात्र देशभरामध्ये कोविड-19 महामारीचा प्रसार झाल्यामुळे 19 मार्च 2020 ते 30 मार्च 2020 या काळात होणाऱ्या 12 विषयांची तसेच उत्तर-पूर्व दिल्ली विभागातल्या 11 विषयांची परीक्षा रद्द करणे भाग पडले होते. या विषयांची परीक्षा नवीन वेळापत्रकाप्रमाणे 1 ते 15 जुलै 2020 या काळात घेण्यात येणार होती. परंतु कोविड महामारीमुळे निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने 26 जून 2020 रोजी मूल्यांकनाचे विशिष्ट निकष लावण्याच्या योजनेला आणि निकाल जाहीर करण्यास मान्यता दिली. त्यानुसार मूल्यांकनासाठी खालील निकष लावण्यात आले.
 

 
 
अशी होती मूल्यांकन योजना
 
1. इयत्ता दहावी आणि बारावी या दोन्ही वर्गाच्या विद्यार्थ्यांखकरिता, ज्यांनी सर्व परीक्षा पूर्ण केली आहे, त्यांचे त्यांनी परीक्षेमध्ये ज्याप्रमाणे कामगिरी केली आहे, त्याआधारे त्यांचे निकाल जाहीर करण्यात यावेत.
 
2. ज्या विद्यार्थ्यांयनी तीनपेक्षा जास्त विषयांची परीक्षा दिली आहे. त्या विद्यार्थ्यांूनी ज्या तीन विषयात जास्त गुण मिळवले आहेत, त्यांची सरासरी घेऊन त्या गुणांकनानुसार ज्या विषयाची परीक्षा त्यांनी दिलेली नाही, त्या विषयांना तितके गुण गृहित धरण्यात यावेत.
 
3. ज्या मुलांनी फक्त तीनच विषयांची परीक्षा दिली आहे, त्यांना ज्या दोन विषयात जास्त गुण मिळाले आहेत, त्या गुणांची सरासरी इतर अनुपस्थित राहिलेल्या विषयांना गुण देताना ग्राह्य धरावी.
 
4. एक किंवा दोन विषयांची परीक्षा देणारे इयत्ता बारावीचे अतिशय कमी विद्यार्थी आहेत. यामध्ये प्रामुख्याने दिल्लीची मुले आहेत. त्यांचे निकाल जाहीर करताना त्या मुलांचे विषयातले गुण आणि अंतर्गत, प्रॅक्टिकलचे गुण तसेच त्यांनी केलेले प्रकल्प यांचा आधार घेण्यात आला आहे. या मुलांना जर पुन्हा परीक्षा देण्याची इच्छा असेल तर त्यांची कार्यक्षमता सुधारण्याची संधी म्हणून सीबीएसईने वैकल्पिक परीक्षेमध्ये भाग घेण्याची अनुमती दिली आहे. तसेच इतर मुलांबरोबर त्यांचाही निकाल जाहीर करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
 

 
 
वैकल्पिक परीक्षेची संधी
 
ज्या विषयांच्या परीक्षा 1 जुलै ते 15 जुलै 2020 या कालावधीत घेण्यात येणार होत्या, त्यांच्या वैकल्पिक परीक्षा कधी घेता येईल, याविषयी केंद्र सरकारशी चर्चा करून सीबीएसई निर्णय घेणार आहे. ज्या उमेदवारांचे निकाल मूल्यांकन योजनेचा आधार घेऊन जाहीर करण्यात आले आहेत, त्या विद्यार्थ्यांिना आपल्या निकालामध्ये सुधारणा करण्यासाठी वैकल्पिक परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात येणार आहे. या परीक्षेत उमेदवाराने मिळवलेले गुण हेच अंतिम गुण मानण्यात येतील.
 
डिजीलॉकरमध्ये प्रमाणपत्र
 
विद्यार्थ्यां ना डिजिटल गुणपत्रिका मिळणार आहे. त्याचबरोबर या डिजीलॉकरमध्ये उत्तीर्ण आणि स्थलांतर प्रमाणपत्र, कौशल्य प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. या डिजीलॉकर खात्याचे अधिकारपत्र उमेदवारांना सीबीएसईकडे नोंदवलेल्या त्यांच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसमार्फत पाठवण्यात आले आहे. मुलांना आपले प्रमाणपत्र या डिजीलॉकर मोबाईल अॅपवरून डाउनलोड करून घेता येणार आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. (https://play.google.com/store/apps/details?id=com.digilocker.android) तसेच अॅपल अॅप स्टोअर (https://apps.apple.com/in/app/digilocker/id1320618078) प्रमाणपत्र घेता येणार आहे. लॉगइन करण्यासाठी सीबीएसईकडे नोंदवलेला मोबाईल क्रमांक, ओटीपी वापरावा आणि आपल्या रोल नंबरचे शेवटचे सहा अंक सुरक्षा पिन म्हणून नोंदवण्यात यावा. पुनरावलोकन आणि मूल्यमापन यासाठी सीबीएसई लवकरच विस्तृत कार्यप्रणाली जाहीर करणार आहे.
 “

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content