HomeArchiveशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज जोगेश्‍वरीत ‘महाआरोग्य चिकित्सा शिबीर’

Details

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो

राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन
जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील जनतेचे आरोग्य सदैव सृदृढ राहवे, येथील झोपडपट्टी बहुलवस्ती व इतर भागातील रहिवाशांचे विविध प्रकारच्या रोगांचे वेळीच निदान व्हावे या उद्देशाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातर्फे मोफत ‘महाआरोग्य चिकित्सा शिबीरा’चे मंगळवार (२२ जानेवारी) रोजी आयोजन करण्यात आले आहे. जोगेश्‍वरी विधानसभेचे आमदार व राज्याचे गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

या चिकित्सा शिबीरात नेत्रचिकित्सा, मोतीबिंदू, नाक, कान व घासा, बालरोग चिकित्सा, आयुर्वेदिक चिकित्सा, स्त्रीरोग चिकित्सा, हृदयरोग, रक्तदाब, त्वचारोग, दंत चिकित्सा, होमीओपॅथिक, रेंडम, रक्तातील शुगर तपासणी आदींवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिरात ट्रॉमा रुग्णालय, सायन रुग्णालय, नायर, केईएम रुग्णालय, स्वप्नपूर्ती तसेच इच्छापूर्ती डायग्नोस्टिक सेंटर आदी रुग्णालयांतील डॉक्टर सहभागी होणार आहेत. या शिबिरात रोटरी क्लब ऑफ मुंबई नॉर्थ एन्डतर्फे डोळ्यांची तसेच डायबेटिस चेकअप करण्यात येणार आहे. सत्य साईबाबा ट्रस्टतर्फे रुग्णांना मोफत औषधांचे वाटप तसेच मोतीबिंदूवर शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यात येणार आहे. विनामूल्य चष्मे वाटप, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिव्यागांना व्हिलचेअरचे वाटप करण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे रक्तपेढीतर्फे रक्तदान कॅम्प, त्याचबरोबर ऑर्गन डोनेशन कॅम्पचेही आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी वृद्धांना मोफत आधारकाठीचेही वाटप करण्यात येणार आहे.

२२ जानेवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत इच्छापूर्ती गणेश मंदिर परिसर, लोकमान्य टिळक गणेश विसर्जन तलाव, शामनगर, जोगेश्‍वरी (पूर्व) येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविंद्र वायकर यांच्या हस्ते या महाआरोग्य चिकित्सा शिबीराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. जोगेश्‍वरीतील रहिवाशांनी या महाआरोग्य चिकित्सा शिबिराचे लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजनकांतर्फे करण्यात आले आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content