Details
विजय दिवसाचे भान!
01-Jul-2019
”
अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
भारताच्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन अनेकदा घडवूनही पाकिस्तानने भारताच्या खोड्या काढणे सुरूच ठेवले आहे. वीस वर्षांपूर्वीच्या विजयाची आठवण करत असताना त्यानंतर पाकड्यांनी कितीवेळा भारताचा विश्वासघात केला आहे हेही विसरता येत नाही. अगदी आजही अतिरेक्यांच्या नावाखाली भारतात विरोधात कुरबुरी करण्याचे पाकचे प्रयत्न संपलेले नाहीत. 2019 च्या फेब्रुवारीमध्ये भारतीय सुरक्षा दलांवर झालेला हल्ला व त्याचा बदला म्हणून भारताने केलेले हवाई हल्ले याच्या स्मृतीही अगदी ताज्या आहेत. पाकिस्तानी सैनिकांनी अतिरेक्यांचे वेश परिधान करून जम्मू काश्मीरमधील कारगिल विभागात अचानक हल्ले केले. काही उंच टेकड्या, पर्वतराजीतील अवघड कडे-कपाऱ्या पाक सैनिकांनी ताब्यात घेतल्या आणि तिथून भारतीय सैनिकी ठाण्यांवर गोळीबार सुरू केला. लडाख भारतापासून तोडून मग काश्मीरचा घास घेण्याचा पाकचा कट होता असे नंतर स्पष्ट झाले होते. भारतात तेव्हा अटल बिहारी वाजपेयींचे सरकार सत्तेत होते तर पाकमध्ये निवडणुकीत नवाज शरीफ यांनी विजय मिळवला होता. हे दोघे पंतप्रधान शांततेच्या चर्चा करत असताना पाक लष्कराचा तत्कालीन प्रमुख परवेज मुशर्रफ याने कारगिल घडवले. नंतर शरीफ यांची हकालपट्टी करून हाच मुशर्रफ पाकचा सर्व सत्ताधीशही बनला आणि आता परागंदा होऊन दुबईत लपून बसला आहे.
भारतीय सैन्याने प्राणाची बाजी लावून कारगिलचे कारस्थान उधळून लावले. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी कारगिल मुक्त झाल्याची व पाक संपूर्ण पराभूत झाल्याची घोषणा केली तो दिवस होता 26 जुलै 1999. तत्पूर्वी अडीच महिने आधी, 3 मे 1999 रोजी ही सीमा पेटली होती. त्यादिवशी काही मेंढपाळांनी पाक सैनिकांच्या हालचाली टिपल्या व भारतीय लष्कराला माहिती दिली. भारतीय सैन्य युद्धमान झाले. तिथून संघर्ष चढत्या क्रमाने धगधगू लागला. 4 जुलै हा या युद्धातील अत्यंत महत्त्वाचा दिवस होता. टायगर हिलची लढाई हे या युद्धातील एक महत्त्वाचे प्रकरण आहे यात शंकाच नाही. उणे ४० ते ५० अंश असे भयावह तापमान, तोंडातील वाफेचाही बर्फ व्हावा अशी अक्षरशः हाडे गोठवणारी थंडी. त्यामुळे होणारे तितकेच दाहक आजार या सगळ्यांशी धैर्याने लढल्यानंतर कारगिल विजय साकारला होता. म्हणून या विजयाला तोड नाही. मुळात त्या भागात झालेल्या भूस्खलनात बर्फाखाली 19 भारतीय जवन दबले गेले होते. त्याचा फायदा घेत टायगर हिल्स या नावाने प्रसिद्ध अशा सीमावर्ती भागातील टेकडीवर पाकने ताबा मिळवला होता. भारत-पाकिस्तानमध्ये कारगिल युद्ध सुरू झाल्यानंतर भारताचे सर्वात महत्त्वाचे लक्ष्य होते ते म्हणजे काहीही करून ही टायगर हिल परत मिळवणे. जम्मू-काश्मीरमध्ये द्रास-कारगिल सेक्टरमध्ये टायगर हिल आहे. टायगर हिल हे त्या भागातील सर्वोच्च शिखर आहे. घुसखोरांनी या हिलवर ताबा मिळवल्यामुळे भारताचा महत्त्वाचा भूप्रदेश थेट शत्रूच्या टप्प्यात येत होता. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत टायगर हिलची लढाई जिंकणे भारतासाठी आवश्यक बनले होते. टायगर हिलवरून पाकिस्तानी सैनिक सहजतेने राष्ट्रीय महामार्ग एकवर नजर ठेऊ शकत होते. या शिखरावरून श्रीनगर-लेह मार्ग तसेच ५६ ब्रिगेडचे लष्करी मुख्यालय टप्प्यात येत होते. कारगिल सेक्टरला जीवनावश्यक वस्तू आणि अन्य साहित्याचा पुरवठा याच मार्गावरून व्हायचा. पाकिस्तानी सैन्य राष्ट्रीय महामार्गाच्या २५ कि.मी.च्या टप्प्यातील भारतीय लष्कराच्या हालचालींना सहज लक्ष्य करत होते. त्यामुळे टायगर हिलची लढाई भारतासाठी अत्यंत महत्त्वाची बनली होती.
टायगर हिलच्या लढाईत १८ ग्रेनेडियन्स, २ नागा आणि आठ शीख रेजिमेंट सहभागी झाल्या होत्या. एकूण २०० जवान या मोहिमेवर होते. १८ ग्रेनेडियन्सने अल्फा, चार्ली आणि घातक अशा तीन तुकडयांमध्ये आपल्या सैनिकांची विभागणी केली. या सर्वात खडतर मिशनला तीन जुलैच्या संध्याकाळी सात वाजता सुरूवात झाली. शिखराकडे कूच करणाऱ्या सैनिकांच्या मदतीसाठी लष्कराच्या तोफखान्याने जोरदार मारा सुरू केला. रॉकेट लाँचर्सद्वारे शत्रूला टार्गेट केले. आठ शीख रेजिमेंटने शत्रूने गृहित धरलेल्या मार्गावरून चाल केली. शत्रूला गोंधळात टाकण्याची त्यामागे रणनिती होती. त्याचवेळी घातक तुकडीकडे अत्यंत धोकादायक मार्गावरून शिखरावर पोहोचण्याचे आव्हान होते. शत्रू कल्पनाही करू शकणार नाही अशा पद्धतीने धक्का देण्याचा त्यामागे उद्द्येश होता. दोरीच्या सहाय्याने भारताचे जवान पहाटे चारच्या सुमारास हिलवर पोहोचले. योगेंद्र सिंह यादव या मोहिमेचे नेतृत्त्व करत होते. त्यांच्याकडे शिखरावर पोहोचून दोरी बांधण्याची जबाबदारी होती. योगेंद्र शिखराजवळ असताना शत्रूचे त्याच्याकडे लक्ष गेले व त्यांनी गोळीबार सुरू केला. यामध्ये कंपनी कमांडरसह तीन जवान शहीद झाले. योगेंद्रच्या खांद्यामध्ये गोळी घुसली. पण त्याने चढाई सुरूच ठेवली व शिखरापर्यंत पोहोचला. जखमी अवस्थेतही त्याने इतर सहकाऱ्यांची दोरखंडाच्या सहाय्याने कडयावर पोहोचण्याची व्यवस्था केली. शिखरावर उतरताच त्याने पाकिस्तानी पोस्टवर हल्लाबोल करत त्यांनी चार पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातले. या घनघोर रणसंग्रामात पाच भारतीय जवान शहीद झाले तर दहा पाकिस्तानी सैनिक ठार झाले. या शौर्यासाठी योगेंद्र सिंह यादव यांना परमवीर चक्र या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.
टायगर हिल जिंकणे म्हणजे भारतासाठी मोठा विजय तर पाकिस्तानसाठी जबर मानसिक धक्का होता. कारगील विजय दिवस साजरा करताना आपण या साऱ्या कथा केवळ युद्धस्य रम्य कथा म्हणून एकून घेऊन सोडून देणे योग्य नाही. ज्याप्रकारे आपण सैन्याला तयारीसाठी सरावासाठी व साधनसामग्रीसाठी संधी दिली पाहिजे, निधीची व्यवस्था केली पाहिजे, तितके आपण करतो का, हा सवाल आहे. अमेरिकेचे जनरल पॅटन म्हणाले होते की युद्धात एक सैनिक दुसऱ्या सैनिकाला ठार करतो तेव्हाच पहिला देश युद्ध जिंकत असतो. ती अंतिम कुर्बानी देण्याची तयारी असणारे वीरच देशाच्या रक्षणासाठी उभे असतात. पण सैनिकाचे मरण स्वस्त असता कामा नये. सैन्याला सुविधा, साधने देण्यामध्ये काचकूच करण्याचे धोरण असेल तर सैनिकंना मरण अटळ ठरते. तसे होऊ नये यासाठी विद्यमान सरकार प्रयत्नशील आहे. 2014 मध्ये पंतप्रधानपदावर आल्यानंतर नरेंद्र मोदींनी तीन्ही सैन्यदलासाठी नव्याने अनेक सुविधा निर्माण केल्या. मोठ्या शस्त्रास्त्रांची खरेदी सुरू केली. त्याचवेळी सैन्य दलाच्या जवानांच्या विविध प्रकारच्या प्रशिक्षणाचीही सोय करायला हवी. उदाहरणार्थ, कारगिल युद्धावेळी लक्षात असे आले की, आपल्या वायुदलाला अति उंचावरील युद्धाचा सरावच आपण कधी दिलेला नाही आणि तेमके तेच तिथे करणे भाग होते. आपल्या वायुदलाने आलेल्या स्थितीला तोंड देत युद्धाचे पारडे फिरवले. पण त्यात वायुदलाची हानीही मोठ्या प्रमाणात झाली. तरीही त्यांनी पाकला जेरीला आणले. वायुदलाचे मोठे नुकसान योग्य पूर्वप्रशिक्षणामुळे टाळता आले असते. ती चूक या विजय दिवसाच्या निमित्ताने ध्यानी घेऊन भविष्यात तसे घडू नये याची तयारी सुरू ठेवली पाहिजे.”
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी