HomeArchiveलोकसभा ही विधानसभेची...

लोकसभा ही विधानसभेची रंगीत तालीम!

Details
लोकसभा ही विधानसभेची रंगीत तालीम!

    08-May-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विजय भोसले, मुख्य वार्ताहर, केसरी
bhosale.vijay53@ gmail.com
देशात लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे पार पडले. उर्वरित दोन टप्पे बाकी आहेत. 23 मेला लोकसभेचा निकाल असून देशातील राजकीय चित्र बदलणार की पुन्हा भाजप सत्तेवर येणार याची उत्सुकता देशातील जनतेला लागली आहे. लोकसभेचा निकाल काही लागो मात्र, महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक येत्या ऑक्टोबरमध्ये होणार असून लोकसभा निवडणूक ही इच्छुकांसाठी रंगीत तालीमच म्हणावी लागेल. देशात भाजपची सत्ता येणार की काँग्रेस आघाडीची सत्ता येणार यावरही राज्यातील मोठे राजकीय गणित असून निकालावरून बर्‍याच राजकीय घडामोडी होतील हे निश्चितच. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीमुळे विद्यमान व प्रस्थापित आमदार आणि नव्याने इच्छुक असलेले उमेदवार यांना मात्र लोकांमध्ये जाण्याची यानिमित्ताने संधी मिळाली आहे.

या संधीचे सोने कसे करावयाचे तो प्रत्येकाचा भाग आहे. मात्र, चिंचवड, पिंपरी आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील इच्छुकांची संख्या मात्र मोठी वाढणार आहे. एंकदरीत या लोकसभा निवडणुकीमुळे मात्र इच्छुकांना आप-आपल्या पक्षाचे जातीने आणि प्रामाणिकपणे काम करावे लागले आहे. चिंचवड विधानसभा हा आमदार लक्ष्मण जगताप यांचा बालेकिल्ला आहे. ते भाजपचे शहराध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्त्वाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाची त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चारशे बुथ प्रमुखाव्दारे प्रामाणिकपणे काम करून शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना मताधिक्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. निकालात बारणे यांचा विजय होवो अथवा पराभव याचा जगताप यांचा संबंध नाही. कारण, चिंचवड विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळवून देणे, एवढाच त्यांचा संबंध आहे आणि ते त्यांनी काम केले आहे.

प्रश्न एवढाच या विधानसभा मतदारसंघात जगताप यांना आव्हान देणारा इतर पक्षात उमेदवार नसल्यामुळे मोठी अडचण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नाना काटे, भाऊसाहेब भोईर, प्रशांत शितोळे, राजेंद्र जगताप हे इच्छुक आहेत. मात्र, लोकसभेच्या निकालावर अनेक गोष्टी अंवलबून आहेत. जगताप यांची उमेदवारी निश्चित असली तरी लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅवड. सचिन पटवर्धनदेखील चिंचवडमधून इच्छुक आहेत. चिंचवडमध्ये आमदार जगताप यांनी पक्षबांधणीबरोबर कार्यकर्त्यांचे मोठे जाळे तयार केले आहे. शिवाय राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची फळी त्यांच्यामागे आहे. त्यामुळे त्यांना टक्कर देणारा उमेदवार आजतरी कोणत्याही पक्षात नाही. त्यामुळे जगताप यांना येणार्यां विधानसभेचा मार्ग सुकर आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

गेल्या विधानसभा निवडणुकीत चिंचवडमधून राष्ट्रवादीतर्फे नाना काटे, काँग्रेसतर्फे कैलास कदम, शिवसेनेतर्फे राहुल कलाटे यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी एकतर्फी निवडणूक जगताप यांनी जिंकली होती. यावेळेस युती झाली तर भाजपला मतदारसंघ जाईल. काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली तर हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याठिकाणी शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे, पृथ्वीराज साठे हे उमेदवारी मागू शकतात. युती झाली तर अडचण भासणार नाही आणि युती न झाल्यास चित्र वेगळे असेल. या जर-तरच्या गोष्टी आहेत. मात्र, जगताप हा आपला किल्ला अभेद्य राखतील यात मात्र शंका नाही.

पिंपरी विधानसभा सध्या शिवसेनेकडे असून अॅ ड. गौतम चाबुकस्वार आमदार आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक लढवली. यावेळेस त्यांना काँग्रेससह अन्य पक्षाची मदत झाल्याने ते थोडक्या मताधिक्याने विजयी झाले. भाजपने ही जागा रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांना सोडल्यामुळे गेल्या वेळेस चंद्रकांता सोनकांबळे यांना थोडक्या मतांनी पराभवास सामोरे जावे लागले. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप, सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुक लढवली होती. त्यावेळेस राष्ट्रवादीतर्फे माजी आमदार अण्णा बनसोडे, काँग्रेसतर्फे मनोज कांबळे यांनी निवडणूक लढवली होती. बनसोडे यांना फाजील आत्मविश्वासामुळे पराभवास सामोरे जावे लागले तर कांबळे यांनी प्रचारही न करता सुमारे 11 हजारापेक्षा अधिक मते मिळाली. या लोकसभा निवडणुकीमुळे बनसोडे यांनी जातीने राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारात लक्ष घातल्याचे जाणवले तर आमदार चाबुकस्वार यांच्यादृष्टीने विधानसभेची ही चाचणी परीक्षा होती. त्यांनी स्वतः आपले तन-मन-धन वापरून प्रामाणिकपणे बारणे यांचे काम केले. जेणेकरून यानिमित्ताने आपल्या मतदारसंघात मतदारांशी संपर्क साधता आला तर पुन्हा आपल्याला उमेदवारी मिळेल.

या हेतूने सोनकांबळे यादेखील प्रचारात सक्रीय होत्या. राष्ट्रवादीचे राहुल भोसले, डॉ. वैशाली घोडेकर, समीर मासूळकर यांनी लोकसभा उमेदवार पार्थ पवार यांचे प्रामाणिकपणे काम केले. या मतदारसंघात भाजपकडून सीमा सावळे, अमित गोरखे, खासदार अमर साबळे यांची कन्या रेणू साबळे तर माजी नगरसेवक विनायक गायकवाड हेदेखील इच्छुक आहेत. शिवसेनेकडून चाबुकस्वार यांच्यासह जीतेंद्र ननावरे त्याचबरोबर भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास सीमा सावळे या शिवसेनेकडूनदेखील उमेदवारी मागू शकतात. त्यादृष्टीने त्यांची तयारी असल्याचे समजते. काँग्रेसकडून मनोज कांबळे, श्यामला सोनवणे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, सुंदर कांबळे हेदेखील उमेदवारी मागू शकतात. वंचित आघाडी यावेळेस पिंपरी मतदारसंघातून उमेदवार उभा करू शकेल. यासाठी भारिपचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे तर दलित पँथरचे रामचंद्र माने उमेदवारी मागू शकतात.

भोसरी विधानसभा मतदारसंघात अपक्ष व भाजप संलग्न आमदार महेश लांडगे यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांचे प्रामाणिकपणे काम केले. मात्र, हे निकालानंतर स्पष्ट होईल. हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. मात्र, लांडगे यांनी हा मतदारसंघ भाजपला सोडावा, अशी अट प्रचार सुरू करण्यापूर्वी आढळराव-पाटलांकडे घातली आणि ती त्यांनी मान्य केली. मात्र, या निकालापूर्वीच्या जर-तरच्या गोष्टी आहेत. लांडगे यांनी पुन्हा निवडून येण्यासाठी मतदारसंघावर आपली पकड ठेवण्यासाठी व्हिजन 20-20, इंद्रायणी थ्रिडी कार्यक्रमातून आपल्या पत्नीला प्रथमच समाजकार्यात आणले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता आवर्जून उपस्थित होत्या. शिवाय लांडगे यांनी स्वतःचा वाढदिवसदेखील धुमधडाक्यात साजरा केला. एकंदरीत त्यांची ही तयारी म्हणजे येणारी विधानसभेची पूर्वतयारीच म्हणावी लागेल. विशेष म्हणजे मंगळवारी लांडगे यांनी आपल्या निवडणुकीसाठी ’वॉर रूम’चे उद्घाटन भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांच्या हस्ते करून घेतले. याचाच अर्थ भाजपची उमेदवारी मिळावी, हाच हेतू यामागचा आहे.

दुसर्या् बाजूला राष्ट्रवादीचे विलास लांडे लोकसभेसाठी इच्छुक होते. त्यांनी कामही सुरू केले होते. मात्र, ऐनवेळेस डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे लांडे यांची समजूत अजित पवार यांनी काढून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. लांडे हेदेखील कोणत्याही परिस्थितीत विधानसभेची निवडणूक लढविणार. मग पक्षातर्फे असो अथवा अपक्ष. कारण, राजकारणात एकदा ब्रेक लागला कि तो ब्रेक काढणे अवघड असते. त्यामुळे लांडे गप्प बसतील याची शाश्वती नाही. त्यांनी आपल्या मतदारसंघात मतदार व आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी गेल्या सहा महिन्यांपासून सुरू ठेवल्या आहेत. दुसर्यां बाजूला महापालिकेतील राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आपल्या कारर्किदीत महापालिकेतील अनेक गैरकारभाराची प्रकरणे उघडकीस आणून सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाला धारेवर धरले आहे. झोपलेल्या राष्ट्रवादीला त्यांनी जागे करून पक्षामध्ये पक्ष जिवंत असल्याचे वातावरण तयार केले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी डॉ. कोल्हे यांचे प्रामाणिकपणे काम केले. तेदेखील भोसरीमधून विधानसभेसाठी इच्छुक आहेत.

ही लोकसभेची निवडणूक त्यांच्यादृष्टीने निवडणूक पुर्वतयारी आहे. ते कोणत्याही परिस्थितीत विधानसभेची निवडणूक लढणार आहेत. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे हे विधानसभेसाठी इच्छुक नाहीत. मात्र, भोसरीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे गव्हाणे यांनी निवडणूक लढवावी. त्याचबरोबर माजी नगरसेवक पंडित गवळीदेखील इच्छुक आहेत. शिवसेनेतर्फे गेल्या वेळेस सुलभा उबाळे यांनी निवडणूक लढवली होती तर भाजपतर्फे एकनाथ पवार यांनी निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादीतर्फे विलास लांडे यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी भोसरीकरांनी महेश लांडगे यांना साथ देऊन लांडे यांना पराभूत केले. विशेष म्हणजे भाजपचे एकनाथ पवार यांनी विधानसभेला तिसर्याा क्रमाकांची मते घेऊन चांगली लढत दिली होती. भोसरीतून भाजपतर्फे महेश लांडगे, एकनाथ पवार, विलास मडिगेरी, शिवसेनेकडून सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट, विजय फुगे हे उमेदवारी मागू शकतात. काँग्रेसकडे उमेदवारच नसल्यामुळे त्यांचा प्रश्नच येत नाही.

लोकसभेच्या निकालावर सर्वच पक्षाची राजकीय समीकरणे अवंलबून आहेत. या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला तर राजकीय चित्र वेगळे असेल. कारण, पुन्हा एकदा पक्षातील अनेक मातब्बर पक्षांतर करून ज्या बाजूला जनतेचा कौल आहे त्या पक्षाकडे पुन्हा रांगा लावून उभे राहतील. शिवाय मावळ, शिरूर या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला दगाफटका झाला तर विधानसभेला युती होईल की नाही सांगता येत नाही. 2009 ची पुनरावृत्ती होऊ शकते. कारण, काँग्रेस-राष्ट्रवादीला जागा चांगल्या मिळाल्या होत्या. यावेळेस जर लोकसभेला जास्त जागा मिळाल्या तर काँग्रेस-राष्ट्रवादीने 2014 मध्ये जी चूक केली, ती चूक करणार नाही. त्या चुकीची 5 वर्षे किंमत मोजावी लागल्यामुळे दोन्ही पक्षाचे नेते आता जमिनीवर आले आहेत. शिवसेनेला लोकसभेला दगाफटका झाला तर शिवसेना भाजपपासून फारकत घेऊन स्वतंत्र जागा लढविण्याचा निर्णय घेईल. त्यामुळे एकंदरीत येणारी विधानसभेची निवडणूक म्हणजे झालेल्या लोकसभेच्या रंगती तालमीवरच भाजप-शिवसेनेचे भवितव्य अवंलबून आहे. गेल्या साडेचार वर्षांत शिवसेनेने सत्तेत राहून भाजपला वारंवार खिंडीत पकडले आहे. अशा परिस्थितीतही भाजपने एक पाऊल मागे घेऊन शिवसेनेच्या गळ्यात गळा घातला आणि लोकसभेची निवडणूक पार पाडली. कदाचित लोकसभेच्या निकालावरून भाजप-सेनेत कटुता येऊ शकते आणि त्याचा परिणाम येणार्याऊ विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो. या जर-तरच्या गोष्टी असल्यातरी येणार्या‍ विधानसभा निवडणुकीत मात्र, महाराष्ट्रातील राजकीय चित्र निश्चित वेगळे असेल!”
 

Continue reading

नाशिकमध्ये झाला ग्लॅमर आणि सांस्कृतिक वारशाचा मिलाफ!

महाराष्ट्राच्या सुवर्ण परंपरेचा वारसा जपणाऱ्या पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स (पीएनजीजेएल)ने आपल्या विस्ताराचा अश्वमेध सुरूच ठेवला असून, मुंबईसह आता नाशिकमध्ये आपले नवीन भव्य दालन सुरू केले आहे. नाशिकच्या वाढत्या बाजारपेठेची गरज आणि ग्राहकांचा वाढता ओढा लक्षात घेऊन कंपनीने हे पाऊल...

तीन-चार महिन्यांनंतर वाढणार साखरेची ‘गोडी’!

जागतिक बाजारात सध्या साखरेच्या दराबाबत मोठी खळबळ उडाली आहे. 2026च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत (एप्रिल ते सप्टेंबर) साखरेचे भाव तेजीत राहतील, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. याला केवळ मागणी कारणीभूत नसून, त्यामागे पॅसिफिक महासागरातील हवामान बदल, ऊर्जेची भूक आणि...

सुटीच्या रविवारी दिवशी २०७ शासननिर्णयांची आतषबाजी!

काल रविवार, २९ मार्चचा सुटीचा दिवस असला तरी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रालयातील संगणक टायपिंग मात्र थांबले नाही. आर्थिक वर्षाचा शेवट (३१ मार्च) जवळ येत असताना, महायुती सरकारने रविवारी (२९ मार्च २०२६) एकाच दिवसात तब्बल २०७ शासननिर्णय (जीआर) निर्गमित करून प्रशासकीय...
Skip to content