HomeArchiveराणाबाई चालणार का?

राणाबाई चालणार का?

Details
राणाबाई चालणार का?

    18-Apr-2019

| 1

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार
atulm2001@gmail.com
अमरावती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात महाआघाडीकडून नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून ही लढत लक्षवेधी लढतींपैकी एक झाली आहे. शिवसेना आणि महाआघाडीच्या या चुरशीच्या लढतीत दिल्ली कोण गाठेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. विकास आणि लोकाभिमुख उमेदवार अशा दोन मुद्द्यांवर ही लढत होईल. चित्रपट अभिनेत्री नवनीत राणा आणि माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री खासदार आनंदराव अडसूळ यांच्यात थेट लढत होणार आहे. अडसूळ येथे काही अनेक वर्षे खासदार आहेत. राणा या पुन्हा एकदा खासदारकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. पण यावेळी युवा स्वाभिमानी पक्षाकडून त्या आघाडीच्या पाठिंब्यावर लढत आहेत.

या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी धामणगाव रेल्वे आणि मोर्शी, हे दोन विधानसभा मतदारसंघ वर्धा जिल्ह्याशी जोडले गेले आहेत. तर बडनेरा, अमरावती, दर्यापूर, मेळघाट, अचलपूर, तिवसा या मतदारसंघांचा समावेश अमरावती लोकसभा मतदारसंघात आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. राखीव मतदारसंघ होऊन 10 वर्ष पूर्ण झालीत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत अमरावती राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडण्यात आलंय.

2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नवनीत राणा राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढल्या होत्या. त्यांना 3 लाख 29 हजार 280 मते मिळाली होती. 1 लाख 36 हजाराच्या फरकाने नवनीत राणा यांचा पराभव करत आनंदराव अडसूळ लोकसभेत पोहोचले. आनंदराव अडसूळ यांना 4 लाख 67 हजार 212 मते मिळाली होती. अमरावती लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. स्वातंत्र्यानंतर तब्बल 7 टर्म अमरावती लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता. मात्र 25 वर्षांपासून या मतदारसंघात शिवसेनेने आपले पाय बऱ्यापैकी रोवले आहेत. गेली दोन टर्म शिवसेनेचे आनंदराव अडसूळ लोकसभा खासदार आहेत.

अमरावती मतदारसंघाचा इतिहास पाहता 1957 मध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुख खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 1980 च्या लोकसभा निवडणुकीत उषा चौधरी काँग्रेसच्या खासदार म्हणून निवडून आल्या. काँग्रेसला मात देत 1989 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सुदाम देशमुख यांनी विजय मिळवला. मात्र 1991 मध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी पुन्हा विजय मिळवला. त्यानंतर 1998 मध्ये तत्कालीन भारतीय रिपब्लिकन पक्षाचे रा. सु. गवई यांनी विजय मिळवला. गेल्या 20 वर्षांपासून हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत खासदार आनंदराव अडसूळ यांचा विजय झाला. तरी त्यातही नवनीत राणा यांनी निकराची झुंज देत 3,29,280 एवढी मते मिळवली. या लोकसभा निवडणूक नवनीत राणा घडयाळ चिन्हावर निवडणूक लढल्या होत्या. यावेळी मात्र नवनीत राणा या त्यांच्या युवा स्वाभिमानी या पक्षाकडून निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे पक्षाचं ओळखीचं चिन्ह नसल्याचा फटका राणा यांना बसू शकतो. निवडणुकीत पराभूत झाल्यावर नवनीत राणा पाच वर्षे स्वस्थ बसलेल्या नाहीत. त्यांनी जनतेशी कायम संपर्क सुरू ठेवला. मात्र विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ हे जनसंपर्क राखण्यात कमी पडल्याचे मत अनेक व्यक्त करतात.

गेल्या 10 वर्षांपासून हा मतदारसंघ राखीव झालाय. त्यामुळे इथले मतदार संभ्रमात होते. मात्र यावेळी वातावरण बदलल्याचं चित्र आहे. कारण मतदारांमधील संभ्रम दूर झालाय. यावेळी मतदार स्थानिक आणि जवळचा उमेदवार शोधतील अशी परिस्थिती आहे. हा मतदारसंघ कुणबीबहुल मतदारसंघ असल्याने त्यांची भूमिका निर्णायक असते. शेतमालाचा भाव आणि स्वामिनाथन आयोगाकडे झालेलं दुर्लक्ष आणि सत्ताधारी पक्षावर असलेल्या नाराजीचा फटका उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर निवडणुकीमध्ये स्थानिक आमदारांचा प्रभाव लोकांवर आणि कार्यकर्त्यांवर जास्त असतो. तो यावेळी कसा आहे हे कळायला मार्ग नाही. कारण प्रत्येक जण स्वतंत्र काहीतरी घेऊन समोर येत आहे.

पाच वर्षांत स्थानिक राजकारणात अडसूळांचा हस्तक्षेप राहत नाही. त्यामुळं नेते कार्यकर्त्यांपर्यंत आणि कार्यकर्ते मतदारांपर्यंत ते कसे पोहोचतात यावरच सगळ्यांचं भवितव्य असणार आहे. नवनीत राणा आणि अडसूळ यांच्यामध्ये टक्कर होईल. वंचित बहुजन आघाडी, बसपा आणि मुस्लिम मतदारांमधील मत विभागणी यावर राणांच गणित अवलंबून आहे. शेतकऱ्यांसोबत मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणाचाही प्रभाव मतदारांवर होण्याची शक्यता आहे.”
 

Continue reading

नाशिकमध्ये झाला ग्लॅमर आणि सांस्कृतिक वारशाचा मिलाफ!

महाराष्ट्राच्या सुवर्ण परंपरेचा वारसा जपणाऱ्या पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स (पीएनजीजेएल)ने आपल्या विस्ताराचा अश्वमेध सुरूच ठेवला असून, मुंबईसह आता नाशिकमध्ये आपले नवीन भव्य दालन सुरू केले आहे. नाशिकच्या वाढत्या बाजारपेठेची गरज आणि ग्राहकांचा वाढता ओढा लक्षात घेऊन कंपनीने हे पाऊल...

तीन-चार महिन्यांनंतर वाढणार साखरेची ‘गोडी’!

जागतिक बाजारात सध्या साखरेच्या दराबाबत मोठी खळबळ उडाली आहे. 2026च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत (एप्रिल ते सप्टेंबर) साखरेचे भाव तेजीत राहतील, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. याला केवळ मागणी कारणीभूत नसून, त्यामागे पॅसिफिक महासागरातील हवामान बदल, ऊर्जेची भूक आणि...

सुटीच्या रविवारी दिवशी २०७ शासननिर्णयांची आतषबाजी!

काल रविवार, २९ मार्चचा सुटीचा दिवस असला तरी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रालयातील संगणक टायपिंग मात्र थांबले नाही. आर्थिक वर्षाचा शेवट (३१ मार्च) जवळ येत असताना, महायुती सरकारने रविवारी (२९ मार्च २०२६) एकाच दिवसात तब्बल २०७ शासननिर्णय (जीआर) निर्गमित करून प्रशासकीय...
Skip to content