Details
योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रयोगशाळांचे शानदार उद्घाटन
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
सुविद्या प्रसारक संघाच्या मुंबईतील योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र विभागाच्या भव्य प्रयोगशाळेचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष म. गो. रानडे, जनसेवा केंद्र, बोरिवली पश्चिमचे अध्यक्ष राधेश्याम सिंघानिया, प्रा. भगवान चक्रदेव आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात बोलताना डॉ. वसंत खटाव यांनी या प्रयोगशाळेचा उपयोग शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना जास्तीतजास्त करून द्यावा तसेच विद्यार्थ्यांनीही आपली शैक्षणिक कामगिरी उंचावण्यासाठी फायदा करून घ्यावा, असे आवाहन केले. याप्रसंगी संस्थेचे सर्व आजी-माजी सदस्य, संस्थेच्या सर्व शाळांमधील मुख्याध्यापक तसेच मान्यवर व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.”
“केएचएल न्यूज ब्युरो