HomeArchiveयेऊन येऊन येणार...

येऊन येऊन येणार कोण?

Details
येऊन येऊन येणार कोण?

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
जिकडे तिकडे मोदी, मोदी.. असा गजर सुरू झालाय. सभाच सुरू होत नाही असे म्हणतात त्यांच्याशिवाय. पण लोक काय काहीही बोलतात. मोदी, मोदी.. घोषणा द्यायची गरजच नाही. नरेंद्रभाई मोदींना प्रचारसभेत सुरू व्हायला काय अशा स्टार्टरची गरज लागत नाही. त्यांच्याकडे बरेच मुद्दे आहेत देशहिताचे. राष्ट्रीय सुरक्षेचे. जवानांच्या बलिदानाचे, सर्जिकल स्ट्राईकचे. रोजीरोटी, महागाई, बेरोजगारी रोजमर्रा जिंदगीचे प्रश्न तर रोजचेच असतात. पण राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांकडे मोदींसारखे लक्ष कुणीच वेधत नाही. विरोधी पक्ष काय तेच तेच मुद्दे उगाळत बसतात. महागाई, बेरोजगारी, सर्वसामान्यांचे प्रश्न, नोटबंदी, जीएसटी, भाजपा सरकारने पाच वर्षांत देशाची वाट लावली, लोकांसाठी काहीच केले नाही, खोटी आश्वासने दिली, फसवणूक केली.. एक ना दोन त्याच त्याच गोष्टी सांगत बसतात.

लोक कंटाळले आहेत या मुद्द्यांना. मोदींना त्याची नेमकी जाणीव आहे. त्यामुळे ते मुत्सद्दीपणे या मुद्द्यांकडे फिरकतच नाहीत. ते यापेक्षाही महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलतात. प्रचार करत नाहीत, थेट काळजाला हात घालतात. जवानांसाठी मतदान करण्याचे आवाहन करतात, राष्ट्रीय सुरक्षेसारख्या प्रश्नांकडे लक्ष वेधतात. आपण खालच्या जातीतले आहोत म्हणून आपल्यावर टीका होत असते, ही मनातील भळभळती जखम उघड करतात. किती वेदना होत असतील या माणसाला. जातीवरून विरोधी पक्ष छळत असताना. लोक मात्र उगाचच मोदींना या ना त्या कारणाने कोर्टात उभे केल्यागत सुनावत असतात. असा छळला जाणारा माणूस किती दुखावत असेल मनातून. पण तरीही मोदी धीरोदात्तपणे देशाचा कारभार हाकतात, खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर होणाऱ्या टीकेकडे, दोषारोपांकडे लक्ष देत नाहीत. वारंवार अशी अवहेलना होत असूनही हा राष्ट्रपुरूष देश प्रथम, बाकी सर्व नंतर, या न्यायाने वागतो.

अंबानी, अदानींपासून सर्वांना समान वागणूक देतो. देशभक्तीला वाकुल्या दाखवणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवून देतो. सिंहासारखा सर्वांसमोर निर्भयपणे उभा ठाकतो. जवानांच्या शौर्याला सॅल्यूट करतो, एक मत शहीद जवानांसाठी द्या, असे सांगतो. तो भाजपासाठी मत मागत नाही, स्वत:साठी मत मागत नाही, जवानांसाठी मागतो, देशासाठी मागतो आहे. खंबीरपणे ते विरोधकांशी लढत आहेत. वारंवार दुखावल्या गेलेल्या या माणसाने एका मुलाखतीत हाच खंबीरपणा, आत्मविश्वास दाखवला आहे. देशाचा गाडा हाकताना, रात्रीचा दिवस करताना या प्रधानसेवकाने पत्रकारांशी बोलण्यातही वेळ वाया घालवला नव्हता. एकही पत्रकार परिषद न घेता केवळ कामात व्यग्र राहाणारा हा नेता, पंतप्रधान वेगळाच आहे. केलेले कामही त्यांनी कोट्यवधी खर्ची घालून जाहिरातींमधून दाखवून दिले, लोकांच्या लक्षात आणून दिले. नाहीतर होते काय की लोकांची स्मरणशक्ती तितकीशी चांगली नसते. तुम्ही चांगले काम करता पण, लोक विसरतात. तुमची पाठ फिरली की कोण मोदी आणि कोण भाजपा? म्हणूनच त्यांनी जाहिरातींमधून सरकारच्या कामांची जाणीव करून दिली. कामे कुणी केली ते कळावे म्हणून छायाचित्र टाकले.

आता ही कामे लोकांच्या पक्की स्मरणात राहिली आहेत. लोकांना सरकारची कामगिरी कळल्यावर आता मोदी देशाचे लक्ष राष्ट्रीय सुरक्षा, सीमेपलिकडील धोका, जवानांचे बलिदान अशा अत्यंत महत्त्वाच्या बाबींकडे वेधत आहेत. निवडणूक आयोगाने काहीही म्हटले तरी हे मुद्दे महत्त्वाचे आहेत आणि मोदींसारखा देशभक्त या मुद्द्यांवरच बोलणार. मग ती प्रचार सभा असो वा मन की बात वा चाय पे चर्चा. एवढ्या धामधुमीतून मोदींनी निदान एका तरी वृत्तपत्रासाठी वेळ काढला, मुलाखत दिली. देशभक्तीची थट्टा करणाऱ्यांवर ते या मुलाखतीत तुटून पडले आहेत. आमच्या राष्ट्रवादाला हसणारे देशभक्तीची खिल्ली उडवत आहेत. पण दहशतवाद, आपल्या जवानांचे बळी हे प्रश्न महत्त्वाचे नाहीत का? मी विकासावर पण बोलतो आणि या महत्त्वाच्या मुद्द्यांवरही बोलतो. देशभक्ती हा काही आजार नाही. तरीही देशभक्तीला हीन लेखले जात आहे, असे जेव्हा मोदी म्हणतात ते १०१ टक्के पटते. दहशतवाद आजही संपलेला नाही, गेल्या पाच वर्षांत शहीद झालेले, मारले गेलेल्या जवानांचा आकडा आजवरचा सर्वाधिक आहे. हिंसक गोरक्षकांनाही त्यांनी या मुलाखतीतून पुन्हा दटावले. कुणीच कायदा हातात घेऊ नये, जे हिंसाचार करतील त्यांना शिक्षा ही होणारच.. असा सज्जड दम त्यांनी दिला. लोकांना सर्व कळतं, त्यांच्या बुद्धिमत्तेला कमी लेखून चालणार नाही. महाआघाडी अर्थात महामिलावट आघाडीचा हेतू काय आहे, सत्तेसाठीची आकडेमोड काय आहे, सारं काही लोकांना माहिती आहे, असे सांगणाऱ्या मोदींनी प्रचंड मताधिक्याने निवडून येण्याचा आत्मविश्वास या मुलाखतीत व्यक्त केला आहे. या सगळ्याचा विचार मतदारांनीही करायला हवा. नाही का?”
 
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content