HomeArchiveयुद्ध की बुद्ध?

युद्ध की बुद्ध?

Details
युद्ध की बुद्ध?

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
एखादा चित्तथरारक थरारपट जसा पूर्वलिखित पटकथेनुसार उलगडत जावा तसे काश्मीर आणि भारत व पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाशी निगडीत घडामोडी सध्या घडत आहेत. आधी पुलवामा येथे झालेला आत्मघातकी दहशतवादी हल्ला, त्यानंतर देशभर उसळलेली संतापाची लाट, बदले की आग, प्रतिशोधाची भावना, देशभर दिसून आलेले ऐक्य, सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही देणारे विरोधी पक्ष असे दुर्मिळ दृश्य, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अजित डोवल यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने बघणारी जनता, करारा जबाब देंगे, सैन्याला आम्ही प्रत्युत्तर कसे द्यायचे ते ठरवण्याची पूर्ण मुभा दिली आहे म्हणणारे मोदी, क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवत उलटणाऱ्या दिवसरात्री आणि अखेर मंगळवारी पहाटेच्या अंधारात भारतीय हवाई दलाने अचूक बॉम्बहल्ल्यांत उद्ध्वस्त केलेला जैशचा सर्वात मोठा तळ.. सर्वसामान्य भारतीयांना जे हवे होते, अपेक्षित होते तेच घडून आले. सरकारची वाहवा झाली, मोदींची वाहवा झाली, नमोस्तुतीला पूर आला. भारताने १९७१ च्या युद्धानंतर प्रथमच एलओसी ओलांडली, खंबीर जबाब दिला, याचेही ढोल पिटले गेले. आपल्या हवाई दलाचे सामर्थ्य पुन्हा अधोरेखित झाले.

देशाभिमान शिगेला पोहोचला असताना, उन्माद वाढत असतानाच सावध राहयची गरज आहे हे याच स्तंभात लिहिले होते. कारण पाकिस्तानचे नाक असे कापले गेल्यावर पाकिस्तान दिखावा म्हणून तरी काही प्रकारचे प्रत्युत्तर लगेचच देणार हे अपेक्षितच होते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, संरक्षण मंत्री, तिथले लष्करशहा यांनी भारताला तसे इशारेही दिले. उरलीसुरली अब्रू वाचवण्यासाठी त्यांना तसे करणे भागही होते. पण काहीतरी करून दाखवणेही भाग होते. बुधवारीच पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी तो अविचार केला. आपल्या हवाई हद्दीचा भंग केला, सीमेजवळच्या काही भागात बॉम्बही टाकले. त्यांना अडवण्यासाठी झेपावलेल्या आपल्या लढाऊ विमानांनी त्यांचे एक विमान पाडले. काही पाकिस्तानी एफ-१६ विमानांना परत पिटाळले खरे पण झालेल्या चकमकीत आपले एक विमान कोसळले आणि आपला वैमानिक अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने केला आहे. हा सगळा घटनाक्रम पुलवामा हल्ल्यापासून सुरू झाला आहे. या हल्ल्याची जबाबदारी जैशने घेतली. आपण जैशचे कंबरडे मोडण्यासाठी बालकोटचा त्यांचा मोठा अड्डा बेचिराख केला. या हल्ल्यात सुमारे साडेतीनशे दहशतवादी मारले गेल्याचा दावा आपण केला आहे. पण त्यामुळे पाकिस्तानने आपल्याला उत्तर दिल्यासारखे दाखवण्यासाठी बुधवारी विमाने पाठवली, बॉम्ब टाकले. ही युद्धाची सुरुवात असूही शकते किंवा मोठ्या संघर्षाची झलकही असू शकते.

भारत आणि पाकिस्तान दोन्ही अण्वस्त्रधारी राष्ट्रे आहेत. दोन्ही देशांमध्ये पुलवामा हल्ल्यानंतर तणाव कळसाला पोहोचला आहे. या क्षणाला दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत असे म्हटले जात आहे. सीमेवर सैन्य उभे ठाकले आहे, काश्मीरमध्ये रुग्णालयांच्या छपरांवर रेड क्रॉसची खूण रंगवली जात आहे. जेणेकरून हवाई हल्ल्यांत रुग्णालयांना ओळखून तिथे बॉम्ब टाकले जाणार नाहीत. याचवेळी भारत सार्वत्रिक निवडणुकांना सामोरा जाणार आहे. भारतीय हवाई हल्ल्यांचा राजकीय फायदा मोदी आणि भाजपा प्रतिमासंवर्धनासाठी प्रचारात घेणार हे उघड आहे. मोदींनी मंगळवारीच राजस्थानात त्याची सुरुवातही केली हे सर्वांनी पाहिलेच. अशावेळी युद्ध पेटले किंवा अगदी छोटासा, मर्यादित भूभागापुरता जरी संघर्ष झाला तरी निवडणुका पुढे जाऊ शकतात. निवडणुका पुढे ढकलण्यासाठी सीमेवरील संघर्ष पुरेसा आहे. पुलवामा हल्ला, आपले प्रत्युत्तर, पाकिस्तानने बुधवारी पाठवलेली एफ-१६ विमाने या घडामोडी अशा संघर्षाकडे दोन्ही देशांना ढकलण्याची दाट शक्यता आहे.

अशावेळी नेतृत्त्वाकडून संयम आणि परिपक्वतेची अपेक्षा असते. भारतीय हवाई हद्दीत विमाने पाठवून आणि भारतीय वैमानिक ताब्यात आल्यामुळे इम्रान खान यांनी भारताला जशास तसे उत्तर दिल्याचे पाकिस्तानी जनतेला भासवले आहे. यामुळेच मंगळवारी, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जायला पाकिस्तानने तयार राहवे, प्रत्युत्तराची जागा आणि वेळ आम्ही निवडू, असे टाळीबाज संवाद बोलणाऱ्या इम्रान खान यांनी बुधवारी सामोपचाराची भाषा सुरू केली आहे. आपली एक चूक दोन्ही देशांना महागात पडू शकते, दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज आहेत. युद्ध झालेच तर रोखणे मग माझ्याही हातात नसेल आणि मोदींच्याही. पाकिस्तान बोलणी करायला तयार आहे, अशी भूमिका आता इम्रान खान यांनी घेतली आहे. अर्थात बोलणारा इम्रान खान आहे, पाकिस्तानचा पंतप्रधान आहे आणि पाकिस्तानातील सत्ताधारी हे नेहमीच लष्करशहांच्या हातातील बाहुले राहिले आहेत हा इतिहास विसरता येणार नाही. भारतीय वैमानिक हातात सापडल्यामुळे पाकिस्तानची अब्रू काही प्रमाणात राखली गेली आहे. जिनेव्हा करारानुसार या वैमानिकाला पाकिस्तानने योग्य वागणूक दिल्यास दोन्ही देशांमधील तणाव निवळण्यासाठी पाकिस्तानने घेतलेली भूमिका खरोखरीच नेक आणि सकारात्मक आहे असे म्हणता येईल. मोदींसारखा मुत्सद्दी नेता पाकिस्तानला कसा प्रतिसाद देतो यावरच युद्ध की बुद्ध हे ठरणार आहे.”
 
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान

Continue reading

आशाताईंवर आज संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भारतीय संगीतसृष्टीतील एका युगाचा रविवारी अंत झाला. दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण सन्मानाने गौरवलेल्या, जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे मुंबईत निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, बहुअवयव निकामी (मल्टी-ऑर्गन फेल्युअर) होऊन त्यांचे...

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...
Skip to content