HomeArchiveमोदींना कुणी समजूनच...

मोदींना कुणी समजूनच घेत नाही!

Details
मोदींना कुणी समजूनच घेत नाही!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
जे करतील दिनदुबळ्यांची सेवा, त्यांना मिळेल आशीर्वादांचा मेवा.. असा सुविचार याआधी तयार झाला नव्हता, पण तो आता झाला आहे. तसे तर साठ वर्षांपासून या देशात काहीच तयार झाले नव्हते, काहीच चांगले घडले नव्हते. जे काही भव्यदिव्य, उदात्त, महन्मंगल, जनकल्याणाचे अचाट आणि अफाट काम घडले ते २०१४ पासून घडायला सुरूवात झाली हे आपण सारेच जाणून आहोत. कितीही लपवले तरी अशी जनसेवेची आणि प्रचंड कर्तृत्त्वशक्तीची क्षितिजापार जाणारी कमान लपवून ठेवता येत नाही. अंतरीचा उमाळा, वंचितांसाठी काही तरी करण्याची जी आच असते ती लपवणार तरी किती? लोकांच्या नजरेसमोर सारे घडत असते. कुणी कितीही निंदा अथवा वंदा, श्रेष्ठोत्तम तोच जो आपल्या मार्गाने चालत राहतो, कर्म करत राहतो. मार्गात फोटोग्राफर आले तरी बिचकत नाही, अडखळत नाही.

कुंभमेळ्यात स्नान करून समस्त भारतीयांसाठी कल्याण आणि सुखसमृद्धीचे गाऱ्हाणे घातल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पाय धुतले, अगदी चोळून चोळून धुतले. छायाचित्रकारांच्या कॅमेऱ्यांनी लखलखाट केला. पण मोदी संकोचले नाहीत, थांबले नाहीत. छायाचित्रकार त्यांचे काम करत होते. त्यांना न अडवता मोदींनी त्यांचे काम सुरू ठेवले. या पाद्यसेवेची छायाचित्रे सोमवारी बहुतेक प्रसारमाध्यमांतून ठळकपणे झळकली आहेत. अपेक्षेप्रमाणे त्यावर विरोधी पक्षांनी यथेच्छ टीकाही केली. मोदींचे हे नवे नाटक, सत्तेच्या मेव्यासाठी आता ही पाद्यसेवा.. असे कितीतरी टीकेचे बाण त्यांना विद्ध करून गेले असतील. पण मोदींनी ते मनावर घेतलेले नाही. गेल्या चार वर्षांत मोदींना अशी प्रछन्न टीका अनेकदा सहन करावी लागली आहे. पण त्यांचा तोल, संयम ढळलेला नाही. अत्यंत धीरोदात्तपणे ते टीकेला, विरोधी पक्षांना सामोरे गेले आहेत. त्यांच्या कृतिशीलपणात खंड पडलेला नाही. ते निर्णय घेत गेले, कृती करत गेले आणि विरोधी पक्ष टीका करत गेले असेच मोदी आणि सत्ताधारी भाजपाच्या गेल्या चार वर्षांतील चमकदार कामगिरीचे वर्णन करावे लागेल.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतरही ते कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात फिरत राहिले म्हणून केवढी टीका झाली. पण त्यांनी ४४ जवानांच्या हौतात्म्याचे दु:ख मनात लपवून डिस्कव्हरी चॅनेलच्या शूटींगसाठी दिलेली वेळ पाळली, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे पंतप्रधान आणि पर्यायाने भारतीय दिलेला शब्द पाळत नाहीत, वक्तशीर नाहीत अशी भारताची नालस्ती होऊ दिली नाही हे कुणाच्याच लक्षात आलेले नाही. छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांनी नेहमीच पंतप्रधानपदाचा आब राखला आहे, भारताची प्रतिमा उजळवली आहे. पुलवामातील शहीद जवानांची पार्थिवे जेव्हा दिल्लीत आली तेव्हा त्यांना मोदींसह सर्व प्रमुख नेत्यांनी आदरांजली अर्पण केली, पुष्पचक्र वाहिले. एकटे मोदी असे होते की त्यांनी कॅमेऱ्यांकडे लक्ष न देता, प्रसंगाचे गांभीर्य पाळत जराही विचलित न होता या शवपेट्यांना प्रदक्षिणा घातली. हा फरक आहे मोदी आणि इतरांमध्ये.

पुलवामामधील हत्त्यांबद्दल प्रचंड संताप, दु:ख मनात असतानाही या धीरोदात्त नेत्याने धुळे आणि इतरत्र जनकल्याणपर योजनांचा आरंभ केला, दोन शब्द बोलून लोकांना आश्वस्त केले. त्यांची ती भाषणेही विरोधी पक्षांना प्रचारकी थाटाची वाटावीत हे दुर्दैव आहे. त्यानंतर त्यांनी सौदीच्या राजपुत्राचे स्वागत केले, कोरियाचा शांतता पुरस्कार स्वीकारला. प्रसंगानुरूप पोशाख परिधान केले. तरीही काहींच्या पोटात दुखले. मोदी बघा कसे कपडे घालून मिरवताहेत, हे त्यांचे शोकप्रदर्शन म्हणावे की फॅशन प्रदर्शन, अशी टेलिग्राफच्या कोलकाता आवृत्तीने सचित्र हेडलाईन केली. ती ममतादींचीच सूचना असणार हे जाणूनच बहुदा मोदींनी संयम सोडला नाही. त्यानंतर आता प्रयागवर जाऊन त्यांनी संगमावर कुंभस्नान केले व नंतर पाच सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुवून आणि स्वच्छ शुभ्र नॅपकिनने पुसले तरी विरोधी पक्षांना ते नाटक वाटले. सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुणारे मोदी पहिले पंतप्रधान आहेत याचाही मोदींनी अजिबात गवगवा केला नाही. पत्रकारांनी ते छापलं पण विरोधकांच्या टीकेचे धनी मात्र मोदी झाले. मायावतींपासून ते अखिलेश यादव आणि उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रमुख राज बब्बर यांनी मोदींची ही निवडणुकीसाठीची चाल असल्याचा आरोप केला आहे. सफाई कर्मचाऱ्यांचे खरेच भले करायचे असेल तर त्यांना आरक्षण द्या, कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्या, असेही काहींनी म्हटले आहे. म्हणजे मोदींनी काहीही केले तरी टीका ही ठरलेलीच आहे. कुणाला तर, महात्मा गांधी, संत गाडगे महाराज, मदर टेरेसा, हेलन केलर, साने गुरूजी, बाबा आमटे आदी लोकोत्तर व्यक्तिमत्वांनी संपूर्ण आयुष्य दीन-दुबळे, रोगी, स्वच्छता यासाठी झिजवले, आयुष्यभर त्यांनी रुग्णांची, पीडितांची सेवा केली, पण त्याची जाहिरात केली नाही की श्रेय घेतले नाही, असाही उमाळा आला आहे. अमित शाह यांनीही मोदींची तुलना गांधीजींशी केली आहे. बोलणारे काहीही बोलोत पण, सफाई कर्मचाऱ्यांची अशी पाद्यसेवा करणारे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठे अशी जाहिरात केलीय?”
 
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content