HomeArchiveमोदींचे हस्तक!

मोदींचे हस्तक!

Details
मोदींचे हस्तक!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]

आगामी लोकसभा निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. गेल्या साडेचार वर्षांत पीडली गेलेली जनता सत्तांतर पाहण्यास आतूर आहे. काँग्रेसचे तरूण अध्यक्ष राहुल गांधी विरोधकांना एकत्र आणण्यासाठी झटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निर्भीडपणे हल्ला चढवीत आहेत. त्यांच्या भगिनी प्रियांका गांधीदेखील त्यांना मदत करण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत. देशातील 22 छोटे-मोठे विरोधी पक्ष देश मोदीमुक्त करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. पण मोदीविरोधकांचा मुखवटा धारण करून काही मोदीहस्तक त्यांच्या मार्गात खोडा घालत आहेत.

2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 31 टक्के तर विरोधकांना 69 टक्के मते मिळाली. विरोधकांच्या मतांचे असे विभाजन झाले नसते तर भाजपा सत्तेच्या जवळपासदेखील पोहोचली नसती. मोदी पंतप्रधान झाले नसते. पण इंग्रजांप्रमाणे विरोधकांमध्ये फाटाफूट करून सत्ता काबीज करण्याचे कसब भाजपाला चांगलेच जमले आहे.

दक्षिणेत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे मोदींचे प्रमुख हस्तक आहेत. मोदी विरोधकांमध्ये फूट पाडण्याची त्यांनी सुपारीच घेतली आहे. एकीकडे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू विरोधकांच्या ऐक्यासाठी झटत असताना दुसरीकडे के. चंद्रशेखर राव तिसरी आघाडी निर्माण करण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत आहेत. अलिकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राव यांच्या पक्षाला घवघवीत यश मिळाल्यामुळे हे यश त्यांच्या डोक्यात शिरले आहे. ते स्वत:ला राष्ट्रीय नेते समजू लागले आहेत. राव यांना भाजपाने विरोधकांमध्ये फूट पाडण्याची सुपारी दिली, हे खुले गुपित आहे. आपले काम राव इमानेइतबारे करीत आहेत. दक्षिणेतील मोदींचे ते प्रमुख हस्तक आहेत.

उत्तर प्रदेशात मोदी विजयाचा मार्ग सुकर करण्याची सुपारी एका नव्हे तर दोन विरोधी पक्षांनी घेतली आहे. अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी आणि मायावती यांचा बहुजन समाज पक्ष हे ते दोन पक्ष होय. काही दिवसांपूर्वी या दोन पक्षांचे मनोमीलन झाले. पण आपल्या आघाडीत त्यांनी काँग्रेसला स्थान दिले नाही. त्यानंतर प्रियांका गांधी यांनी राजकारणात प्रवेश केला. उत्तर प्रदेशात त्यांना तुफानी प्रतिसाद मिळू लागला. प्रियांका यांच्या राजकारण प्रवेशानंतर तरी अखिलेश-मायावती काँग्रेसला आपल्याबरोबर घेतील, असे वाटत होते. पण तसे घडले नाही. गुरूवारी या दोन पक्षांनी आपले जागावाटप जाहीर केले. राज्यातील लोकसभेच्या 80 जागांपैकी 75 जागा या दोन पक्षांनी आपसात वाटून घेतल्या आहेत. त्यापैकी बहुजन समाज पार्टीच्या वाट्याला 38 जागा आल्या आहेत, तर समाजवादी पार्टीला 37 जागा मिळाल्या आहेत. तीन जागा त्यांनी राष्ट्रीय लोकदलचे अजित सिंह यांच्यासाठी सोडल्या आहेत. गांधी परिवाराचा गड असलेल्या अमेठी आणि रायबरेली या जागांना त्यांनी स्पर्श केलेला नाही. या दोन्ही जागा त्यांनी काँग्रेससाठी सोडल्या आहेत. उत्तर प्रदेशात काँग्रेसचा प्रभाव कमी झाला आहे, यात वाद नाही. पण प्रियांका गांधी यांच्या राजकारण प्रवेशानंतर तेथील राजकीय समीकरणे बदलतील, यात शंका नाही. अशा परिस्थितीत काँग्रेसला सन्मानाने बरोबर घेण्याऐवजी अखिलेश आणि मायावती यांनी काँग्रेसला दूर लोटणे म्हणजे सरळसरळ भाजपाला मदत करणे होय.

लोकसभेत भाजपाला अशाप्रकारे मैत्रीचा हात दिल्यानंतर पुढील विधानसभा निवडणुकीत या दोन पक्षांना एकमेकांच्या सहाय्याने आणि भाजपाच्या वरदहस्ताने सत्ता मिळविता येईल, यात शंका नाही. भाजपाला विरोध करण्याचा आव आणीत धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी करायची आणि भाजपाला मदत करायची, ही मोदी हस्तकांची किळसवाणी रणनीती आहे. या संधीसाधू राजकारणाचा करावा तितका निषेध थोडाच आहे.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर

Continue reading

‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षा १७ मे रोजी; २३ एप्रिलपासून नोंदणी!

देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतली जाणारी 'जेईई ॲडव्हान्स्ड २०२६' ही परीक्षा यंदा रविवार, १७ मे २०२६ रोजी होणार आहे. यावर्षी या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी रुरकीकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत वेळापत्रक आणि माहितीपुस्तिका प्रसिद्ध करण्यात...

येत्या शनिवार/रविवारी पायात बेड्या घालून फिरवा कौलू!

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अंदमानच्या कारागृहात स्वा. सावरकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी म्हणून मुंबईच्या स्वा. सावरकर स्मारकाने येत्या शनिवार आणि रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वसामान्यांना पायात बेड्या घालून कौलू फिरवण्याची संधी उपलब्ध करून दिली...

आज हनुमान जयंती! जाणून घ्या मारुतीच्या उपासनेमागील शास्त्र!! 

आज हनुमान (मारुती) जयंती! मनोजवम् मारुततुल्यवेगञ्, जितेन्द्रियम् बुद्धिमतां वरिष्ठम्।। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणम् प्रपद्ये।। अर्थात् मनोवेगाने जाणारा, वाऱ्याप्रमाणे वेगवान, जितेंद्रिय, बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ, वायुपुत्र, वानरसमुदायाचा अधिपती आणि श्रीरामाचा दूत, अशा मारुतीला मी शरण आलो आहे. मारुतीच्या अतुलनीय गुणवैशिष्ट्यांची ओळख या एका श्लोकावरून होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच जवळचा वाटणारा...
Skip to content