HomeArchiveमुंबईच्या यशवंतराव चव्हाण...

मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय युवा पुरस्कार जाहीर!

Details

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्यरो
वेदांगी कुलकर्णी विशेष युवा क्रीडा पुरस्काराची तर किसन तडवी, साक्षी चितलांगे क्रीडा पुरस्काराचे आणि अभिजीत दिघावकर व स्नेहल चौधरी सामाजिक पुरस्काराचे मानकरी.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई – नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने मागील एकवीस वर्षांपासून सामाजिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या युवक युवतींना राज्यस्तरीय युवा पुरस्कार दिले जातात. यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय विशेष युवा क्रीडा पुरस्काराकरीता डोंबिवलीतील वेदांगी विवेक कुलकर्णी या २९ वर्षीय सायकलपटूची निवड करण्यात आली आहे. वेदांगीने आपल्या सायकलस्वारीने संपूर्ण जगभरात भारताचे नाव उंचावले असून 159 दिवसात सायकलवरून 29 हजार किलोमिटरचे अंतर पूर्ण करत तिने जगाला प्रदक्षिणा घातली आहे. गिनीजच्या नियमानुसार सायकलवरून जगप्रदक्षिणा करताना 29 हजार किलोमीटर (विषववृत्तावरील भूभागाएवढे) अंतर पूर्ण करावे लागते. वेदांगीने ऑस्ट्रेलियातून सायकलींग सुरू केल्यानंतर न्यूझीलंड, कॅनडा, ग्रीनलॅण्ड, स्पेन, फिनलॅण्ड, रशिया आणि भारत अशा चौदा देशांमध्ये तिने सायकल चालविली.

स्पेनमध्ये तिच्यावर चाकू हल्ला झाला. पैसे लुटले गेले. आईसलॅण्डमध्ये ती हिमवादळातही सापडली. पण तिने जिद्द सोडली नाही. विशेष म्हणजे तिची ही जगप्रदक्षिणा शिक्षण सुरू असतानाच झाली आहे. करीअरच्या मानसिकतेतून बाहेर जाऊन केलेली वेदांगीची ही धडपड उल्लेखनीय व प्रेरणादायी आहे. या कारणास्तव प्रतिष्ठानच्या कार्यकारी समितीने वेदांगीची यंदाच्या विशेष युवा क्रीडा पुरस्कारासाठी निवड केली आहे. 51 हजार रूपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार (युवक) या पुरस्काराकरीता अक्कलकुवा, जि. नंदुरबार येथील धावपटू किसन नरशी तडवी याची निवड करण्यात आली आहे. २२ वर्षीय किसनने अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून येऊन जगभरात भारताचे नाव उंचावले आहे. किसनने 52 व्या नॅशनल क्रॉसकंट्री स्पर्धेत विजेतेपद मिळविले असून तैपई, चीन येथे झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेममध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्याचबरोबर 33व्या नॅशनल ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स चॅम्पीयनशिपमध्ये पाच हजार मीटर व दहा हजार मीटर स्पर्धेत किसनने विजेतेपद पटकावले आहे. किसन सध्या 2020 सालच्या ऑलिम्पिक गेमची तयारी करीत असून भारताला किसनकडून त्याच्या खेळ प्रकारात मोठ्या अपेक्षा आहेत. 21 हजार रूपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे किसनला मिळालेल्या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यशवंतराव चव्हाण युवा क्रीडा पुरस्कार (युवती) 2019 ची मानकरी औरंगाबाद येथील युवा बुद्धीबळपटू साक्षी दिनेश चितलांगे ही ठरली असून अवघ्या 15व्या वर्षी शिवछत्रपती पुरस्कार मिळविणारी सर्वांत युवा खेळाडू साक्षी ठरली आहे. आठ आंतरराष्ट्रीय, अकरा राष्ट्रीय व अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पदके जिंकून साक्षीने महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. 2015 साली जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून (एफआयडीई) वुमन इंटरनॅशनल मास्टर हा किताब तसेच याच संघटनेकडून 2014 साली वुमन फिडे मास्टर हा किताब साक्षीने पटकाविला आहे. 2017 साली एअरपोर्ट अ‍ॅथोरिटी ऑफ इंडियाकडून त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कारदेखील साक्षीने पटकाविला आहे. 21 हजार रूपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे साक्षीला मिळालेल्या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार (युवक) 2019 करीता नाशिक येथील युवा कार्यकर्ता अभिजीत सदानंद दिघावकर याची निवड करण्यात आली असून अभिजीतने पर्यावरणविषयक व वृक्षतोडीच्या विरोधात उल्लेखनीय कार्य केले आहे. तळागाळातील गरजूंना आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून आरोग्य क्षेत्रातील विविध संस्थांना सोबत घेऊन महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करून अभिजीतने गरजूंना आरोग्यविषयक लाभ मिळवून दिले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय युवक समितीने आयोजित केलेल्या परिषदेमध्ये अभिजीतने भारताचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. 21 हजार रूपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे अभिजितला मिळालेल्या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार (युवती) 2019 करीता मंगरूळपीर, जि. वाशिम येथील स्नेहल चौधरी कदम या युवतीची निवड करण्यात आली आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण झालेल्या स्नेहलने आपल्या नोकरीचा त्याग करून ग्रामीण भागातील आपल्या भगिनींकरीता क्षितीज संस्थेच्या माध्यमातून युवती व महिलांच्या मासिक पाळीसंदर्भात मागील पाच वर्षांपासून ‘ब्लिड द सायलेन्स’ या अभियानाअंतर्गत स्वच्छता नियोजनाचे अनेक उपक्रम राबविले आहे. आजवर विविध शाळा, कॉलेज, ग्रामीण भागात, आदिवासी भागात, शहरी भागातील वस्त्या यामध्ये दहा हजार युवती व महिलांसमवेत संवाद साधून त्यांना मासिक पाळीत घ्यावयाची काळजी याबाबत महत्त्व पटवून दिले आहे. 21 हजार रूपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे स्नेहलला मिळालेल्या पुरस्काराचे स्वरूप आहे.

निवड झालेल्या सर्व पुरस्कारार्थींना फेब्रुवारी महिन्यात पुणे येथे प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार असल्याचे नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने कळविण्यात आले आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्यरो

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content