HomeArchiveमहाराष्ट्रात मतदारांच्या संख्येत...

महाराष्ट्रात मतदारांच्या संख्येत तब्बल ३५ लाखांची वाढ !

Details
महाराष्ट्रात मतदारांच्या संख्येत तब्बल ३५ लाखांची वाढ !

    30-Jun-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

रेनी अब्राहम

महाराष्ट्राच्या मतदारांमध्ये गेल्या 15 दिवसांत तब्बल 35 लाख मतदार वाढले असून मुंबईत यातील सुमारे दोन लाख युवा मतदारांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने एक नोव्हेंबरपासून मतदारयादीचे पुनर्निरीक्षण करण्यास सुरूवात केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत ही वाढ झाली. राज्यात यापूर्वी एकूण 8.44 कोटी मतदार होते.यामध्ये 4.43 कोटी पुरूष तर 4.01 कोटी महिला मतदारांचा समावेश होता. त्यात आता 35 लाख मतदरांची भर पडली असून पुढे हा आकडाही वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या मतदारांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. सध्या देशातली निम्मी लोकसंख्या 25 वर्षांखालील तरूणांची आहे, असा अंदाज वर्तवला जात आहे.

मतदारयादीतल्या या भरमसाठ वाढीला मंत्रालयातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही दुजोरा दिला आहे. महाराष्ट्रात नजीकच्या काळात 12.6 कोटी लोकसंख्या असेल असा अंदाज आहे. अशा वेळी मतदारांच्या संख्येत 35 लाखांची वाढ होणे चांगले आहे. यात बहुसंख्य नवे मतदार आहेत. चार जानेवारीपर्यंत म्हणजे मतदारयाद्यांचे पुनर्निरीक्षण संपेपर्यंत ही संख्या आणखी वाढेल, असे त्याने सांगितले.

एक नोव्हेंबर 2018 च्या आकडेवारीनुसार, नव्याने दाखल झालेल्या मतदारांमध्ये मुंबई शहरात 1349692 पुरूष तर 1109410 महिला मतदारांचा समावेश आहे. मुंबई उपनगरात नव्याने दाखल झालेल्या मतदारांमध्ये 3725323 पुरूष आणि 3092946 महिला मतदारांचा समावेश आहे. मुंबईप्रमाणे ठाण्यातही मतदारांच्या संख्येत मोठी वाढ अपेक्षित आहे. महाराष्ट्रात जास्त मतदार असलेल्या भागांमध्ये सध्या पुणे (7189265 मतदार), नाशिक (4260393), जळगाव (3293157), अमरावती (2334854), नागपूर (3873959), यवतमाळ (2038514), नांदेड (2406859), औरंगाबाद (2649641), अहमदनगर (3318555), सोलापूर (3226683), सातारा (2387877), कोल्हापूर (2965314), रायगड (2161614) आणि सांगली (2233831) यांचा समावेश आहे.”
 
“रेनी अब्राहम

Continue reading

‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षा १७ मे रोजी; २३ एप्रिलपासून नोंदणी!

देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतली जाणारी 'जेईई ॲडव्हान्स्ड २०२६' ही परीक्षा यंदा रविवार, १७ मे २०२६ रोजी होणार आहे. यावर्षी या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी रुरकीकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत वेळापत्रक आणि माहितीपुस्तिका प्रसिद्ध करण्यात...

येत्या शनिवार/रविवारी पायात बेड्या घालून फिरवा कौलू!

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अंदमानच्या कारागृहात स्वा. सावरकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी म्हणून मुंबईच्या स्वा. सावरकर स्मारकाने येत्या शनिवार आणि रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वसामान्यांना पायात बेड्या घालून कौलू फिरवण्याची संधी उपलब्ध करून दिली...

आज हनुमान जयंती! जाणून घ्या मारुतीच्या उपासनेमागील शास्त्र!! 

आज हनुमान (मारुती) जयंती! मनोजवम् मारुततुल्यवेगञ्, जितेन्द्रियम् बुद्धिमतां वरिष्ठम्।। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणम् प्रपद्ये।। अर्थात् मनोवेगाने जाणारा, वाऱ्याप्रमाणे वेगवान, जितेंद्रिय, बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ, वायुपुत्र, वानरसमुदायाचा अधिपती आणि श्रीरामाचा दूत, अशा मारुतीला मी शरण आलो आहे. मारुतीच्या अतुलनीय गुणवैशिष्ट्यांची ओळख या एका श्लोकावरून होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच जवळचा वाटणारा...
Skip to content