Details
मलेशियातील `शब्द’चे चौथे मराठी विश्व साहित्य संमेलन केवळ अविस्मरणीय!
01-Jul-2019
”
हिंदी लेख: अलका पांडे, अनुवाद: देवेंद्र भुजबळ
१० जानेवारी २०१९ रोजी रात्रीच्या मलेशियन विमानसेवेच्या विमानाने आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी कुआलालमपुर येथे सुखरूप पोहोचलो. विमानतळावरून आम्ही पुत्रजया या २००४ साली वसविण्यात आलेल्या शहराला भेट दिली. मलेशियाचे हे प्रशासकीय शहर आहे. म्हणजे येथे पंतप्रधान, सर्व केंद्रीय मंत्री, उच्च प्रशासकीय अधिकारी यांच्या कार्यालयांच्या भव्य, अत्याधुनिक इमारती उभ्या आहेत. पुढे सायबरजया या शहरात सर्व प्रकारच्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची कार्यालये आहेत. ही दोन्ही शहरे आधुनिक मलेशियाची प्रगती दर्शवितात. त्याचप्रमाणे त्यांच्या नावावरून तेथील संस्कृतीवर अजूनही असलेला हिंदू संस्कृतीचा प्रभावही दाखवितात.
दुपारनंतर आम्ही कुआलालमपुर येथील अंकासा हॉटेलमध्ये पोहोचलो. तिथे गेल्यावर ताजेतवाने होऊन दुपारी तीन वाजता होणाऱ्या संमेलनाच्या उद्घाटन समारंभात सहभागी झालो. आपल्या उद्घाटनाच्या भाषणात महाराष्ट्र शासनाचे निवृत्त माहिती संचालक तथा लेखक देवेंद्र भुजबळ यांनी अकराव्या शतकात महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी आपल्या निरुपणासाठी मराठी भाषेचा वापर केला असे सांगितले. “लीळाचरित्र” या मराठीतील पहिल्या ग्रंथाची निर्मिती झाली. मराठीतील पहिली कविता (ढवळे) म्हहदाईसा यांनी रचली तर बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरीद्वारे “हे विश्वची माझे घर” हा वैश्विकरणाचा आद्य संदेश दिला, असे ते म्हणाले. नंतर त्यांनी मराठीची थोरवी सांगितली. आपल्या मातृभाषेचा सार्थ अभिमान असलाच पाहिजे असे सांगून त्यांनी झपाट्याने होत असलेल्या वैश्विकरणामुळे बहुभाषी असणेदेखील अत्यंत आवश्यक आहे, असे आग्रही प्रतिपादन केले.
यावेळी मलेशिया महाराष्ट्र मंडळातर्फे शिल्पा टंकसाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थितांचे स्वागत करून सर्वांना आपलेसे केले. सम्मेलनाचे अध्यक्षस्थान दिव्य मराठीचे संपादक, लेखक संजय आवटे यांनी भूषविले.
दुसऱ्या सत्रात प्रा. डॉ. लक्ष्मण औचरमल यांच्या अध्यक्षतेखाली “प्राध्यापकांचे विश्व” हा परिसंवाद झाला. यात प्रा. डॉ. अनिल काळबांडे, गणेश टाले, प्रल्हाद वावरे यांनी विविध पैलूंवर विचार मांडले. “यंगिस्तान: नव्या पिढीची भाषा” हा एक परिसंवाद तरूणाईच्या सहभागाने चांगलाच गाजला. गीता कोकंबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात ईशान राजपूत, सौरभ जाधव, लोकेश चव्हाण, यश सिंगलवार, आरती मुंढे, ऐश्वर्या भगत, साक्षी डंभारे, यांनी हिरीरीने आपली मते मांडली.
महिला आणि पुरूष अशी दोन स्वतंत्र कवी संमेलने झाली. या सर्व संमेलनांना भरघोस प्रतिसाद मिळाला. गझल मुशायरामध्ये कविता राजपूत, ज्योस्ना राजपूत, संतोष घुले, रमेश यादव, प्रदीप पवार यांनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थान रेखा किंगर यांनी भूषविले. डॉ. प्रफुलता सुखटणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विविध मान्यवरांनी कार्यक्रम सादर केले. सूत्रसंचालन नेहा धारूळकर, रवींद्र खैरे यांनी केले.
प्रबोधकुमार जाडाजी यांनी प्रेरणादायी कार्यक्रम सादर केला. डॉ. सोनियांनी जीवनात ध्यानधारणेचे महत्त्व पटवून दिले. प्रसिध्द कोळी गीतकार, गायक प्रदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संगीत रजनीत विविध कार्यक्रम सादर झाले. अशोक जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सांगता समारोह झाला.
एरवी एकतर साहित्य संमेलन असते किंवा पर्यटनच असते. पण साहित्य संमेलन आणि पर्यटन यांचा सुरेख मिलाफ यावेळी पाहावयास मिळाला. संमेलनादरम्यान सनवे लगून वॉटर पार्क, जेंटिंग आयलंड, टू वे केबल कार राईड, बाटू केव्ह भेट, शहर भेट, खरेदीसाठी मॉल भेटी, चॉकलेट कारखाना भेट, स्विस घड्याळ शोरूम भेट असा भरगच्च दौरा झाला. या उत्कृष्ट आयोजनाबद्दल शब्द परिवाराचे संजय सिंगलवार आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मनःपूर्वक धन्यवाद. आता वाट पुढच्या विश्व सम्मेलनाची!”
“हिंदी लेख: अलका पांडे, अनुवाद: देवेंद्र भुजबळ