Friday, October 18, 2024
HomeArchiveमराठी चेम्बर्सचे उद्या...

मराठी चेम्बर्सचे उद्या उद्योगरत्न पुरस्कार!

Details

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“जागतिक मराठी चेम्बर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त चेंबरतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही उद्योग क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत असलेल्या उद्योजकांना उद्योगरत्न पुरस्कार देण्यात येणार आहेत. हा उद्योगरत्न पुरस्कार सोहळा बुधवार दिनांक ८ जानेवारी २०२० सायंकाळी ६ वाजता स्वातंत्रवीर सावरकर सभागृह, वीर सावरकर मार्ग, शिवाजी पार्क, दादर पश्चिम, मुंबई – २८ येथे होणार आहे.”
 

“या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच या पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित असणार आहेत. माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी, कार्याध्यक्ष शिवाजी अढळराव पाटील, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते महेश कोठारे, जागतिक मराठी चेम्बर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजचे संचालक प्रकाश चिखलीकर, रवींद्र आवटी, प्रवीण शेट्ये, सुधीर सामंत, सरचिटणीस तुषार देशमुख, चिटणीस परशुराम पाटील, कोष्याध्यक्ष मनोहर साळवी, सुरेश महाजन तसेच सी. ए. प्रसन्न रेगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.”
 
 
“यावर्षी उद्योगरत्न पुरस्कार बडवे ग्रुप ऑफ कंपनीजचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बडवे, संस्थापक व उत्पादक – श्रीनिवास इंजि. ऑटो कॉम्पोनेटसचे प्रा. लि., जी. एस. काळे, संस्थापक आणि संचालक, अब्दुला अँड असोसिएटेट, दुबई, यू.ए.ई. – अशोक वर्तक, अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते सुबोध भावे तसेच प्रो. अनंत एन्टरप्रायझेस शीला धारिया यांना जाहीर केला असून विजेत्यांना सन्मान चिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची सुरूवात सुरमयी सानिया पाटणकर यांच्या ठुमरी, गज़ल, आणि नाट्यसंगीताने होणार आहे.”

Continue reading

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे सत्र सुरूच!

उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली. त्यात सर्फराज आणि तालीब, हे दोन आरोपी जखमी झाल्याचे समजते. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशात...

प्रेम, नुकसान आणि उपचार म्हणजेच जिंदगीनामा!

जिंदगीनामा, सोनी लिव्हवरील सहा भागांचा काव्यसंग्रह, शक्तिशाली कथनातून मानसिक आरोग्याच्या गुंतागुंतीचा शोध घेतो, ज्यातील प्रत्येक अद्वितीय आव्हाने हाताळते. मालिका सहानुभूती वाढवण्याचा आणि अनेकदा न बोललेल्या विषयांबद्दल संभाषण वाढवण्याचा प्रयत्न करते. प्रिया बापटसाठी, हा प्रकल्प फक्त दुसऱ्या भूमिकेपेक्षा अधिक होता–...

20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान! 23ला निकाल!!

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार असून त्याचकरीता येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होईल. मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार असून त्याचदिवशी निकाल जाहीर केले जातील. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या...
Skip to content