Details
केएचएल न्यूज ब्युरो
hegdekiran17@gmail.com
“फ्लिपकार्ट होलसेलतर्फे १२ नवीन शहरांमध्ये विस्तारीकरण करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या माध्यमातून किरकोळ विक्रीस एकाच ठिकाणाहून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे लघुद्योगांना विविध प्रकारची उत्पादने वाजवी किंमतीमध्ये उपलब्ध होणार आहेत. या शहरांमध्ये फॅशन विभागासह विस्तारीकरण करण्यात येणार असून फ्लिपकार्ट होलसेल किराणा दुकाने आणि सूक्ष्म व लघु व मध्यम उद्योजक डिजिटल परिवर्तन घडवून त्यांना वेगाने प्रगती करण्यास, ग्राहकांना बांधून ठेवण्यास आणि त्यांची नफा मिळविण्याची क्षमता वाढविण्यास मदत करणार आहेत.”
“उत्सवी हंगाम उंबरठ्यावर येऊन ठेपलेला असताना फ्लिपकार्ट होलसेल आता गाझियाबाद, फरिदाबाद, म्हैसूर, चंदिगड ट्रायसिटी, मेरठ, आग्रा, जयपूर, ठाणे-भिवंडी-उल्हासनगर, बृहन्मुंबई, वसई-विरार-मिरा-भाइंदर, ठाणे (कल्याण डोंबिवली) आणि ठाणे (नवी मुंबई) येथे सेवा सुरू करणार आहे.”
“फ्लिपकार्ट होलसेलचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख आदर्श मेनन म्हणाले की, “उत्सवांचा हंगाम सुरू होत असताना आम्ही १२ शहरांमध्ये विस्तारीकरण करताना अत्यंत उत्साहात आहोत. एमएसएमई आणि किराणा दुकानांसाठी अधिक संधी तयार करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. ट्रेंडी जयपुरी कुर्तींपासून ते म्हैसूर सिल्क साड्यांपर्यंत, छोट्या उद्योगांनी डिजिटल परिवर्तन स्वीकारावे आणि अधिक भक्कम व्यवसायरूप घडवावे यासाठी त्यांची मदत करणे हा आमचा हेतू आहे. लाँचपासूनच आम्ही अनेक आघाडीच्या ब्रँड्सशी भागीदारी केली आहे आणि एसएमबींसाठी व किराणा दुकानांसाठी डिजिटल माध्यमातून व्यवसाय सुलभता आणली आहे. फ्लिपकार्ट इकोसिस्टिममधील मायक्रो-मार्केट पातळीवरील बीटूबी आणि बीटूसीमधील बारकाव्यांच्या मदतीने त्यांच्या क्षेत्राशी संबंधित ग्राहकांच्या मागण्या समजून घेण्यास त्यांना सक्षम केले आहे, जेणेकरून ते योग्य उत्पादनांची खरेदी व विक्री करू शकतील. आमच्या उपक्रमामुळे देण्यात येणाऱ्या योगदानामुळे होणारी एमएसएमई आणि किराणा दुकानांची भरभराट पाहण्यास आम्ही उत्सुक आहोत आणि या माध्यमातून भारतात लाखो नव्या व रोमांचक रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत.””
“या वर्षाच्या अखेरपर्यंत फ्लिपकार्ट होलसेलची गृह व किचन आणि किराणा विभागांमध्ये विस्तारीकरण करण्याची योजना आहे. फ्लिपकार्ट होलसेलच्या ग्राहकांसाठी आघाडीच्या बँका व एनबीएफसींशी भागीदारी करून सुलभ अर्थसहाय्य सुविधा उपलब्ध होतील, जेणेकरून ते रोखीच्या आवागमनाचे व्यवस्थापन होऊ शकेल. या माध्यमातून फ्लिपकार्ट अॅश्युअर्ड दर्जेदार उत्पादने, सुलभ व सोयिस्कर ऑर्डर रिटर्न्स आणि त्यांच्या दुकानापर्यंत उत्पादनाची वेगवान डिलिव्हरी होऊ शकेल. तसेच ऑर्डर ट्रॅकिंगची सुविधाही मिळणार आहे.”

