HomeArchiveप्रचाराचे नगारे..

प्रचाराचे नगारे..

Details
प्रचाराचे नगारे..

    11-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
अनिकेत जोशी..
 संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com 
 
 
रशियाचा धावपळीचा दोन दिवसांचा दौरा आटोपून रात्रभर प्रवास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी पहाटे थेट बेंगलुरूला गेले. तिथे त्यांनी दिवसभराचे कार्यक्रम आटोपले आणि रात्री इस्रोच्या शास्त्रज्ञांसमवेत ते चांद्रयान -२चा अंतिम प्रवास पाहण्यासाठी बसले. इस्त्रोच्या मिशन कमांड सेंटरमध्ये कायकाय झाले याचे तपशील आपण पाहिलेच आहेत. तिथे अक्षरशः रात्र जागवून पुन्हा सकाळीच पंतप्रधान तिथे पुन्हा गेले. शास्त्रज्ञांच्या ढासळत्या मनोधैर्याला त्यांनी भक्कम आधार दिला आणि नंतर ते थेट मुंबईत दाखल झाले. म्हणजे दोन रात्री न झोपता मोदी मुंबईत व पुढे औरंगाबादेत कार्यक्रम करत होते हे महत्त्वाचे. प्रचंड पावासाने महाराष्ट्राच्या विविध भागात कहर चालवलेला आहे. अरे बाबा पावसा.. आता बस कर, अशी विनवणी जनता करू लागलेली आहे. मुंबई शहरही पावसाला अपवाद नव्हते. इथले दोन-तीन तासांचे सर्व कार्यक्रम पार पाडून पंतप्रधान दुपारी औरंगाबादेत गेले. तिथून पुढे ते नागपूरला जाणार होते. पण नागपुरात शुक्रवारीच तुफानी पाऊस पडला होता आणि शनिवारीही मोठ्या पावसाचे अंदाज आले होते. त्यामुळे तो दौरा पंतप्रधानांनी रद्द केला. मुंबई औरंगाबाद आणि नागपूर असे तीन तीन कार्यक्रम मोदींनी घेतले होते.
 
 
अर्थातच महाराष्ट्राच्या निवडणुका समोर येत आहेत हेच इतक्या भरगच्च दौऱ्याचे कारण होते हे उघड आहे. निवडणुका लक्षात घेऊनच अनेक प्रकल्पांची धडाधड उद्घाटने त्यांनी केली. अनेक प्रकल्पांची पायाभरणीही केली. ज्या मेट्रोचे काम पूर्ण झालेले नाही आणि जे मेट्रोचे डबे प्रत्यक्षात आलेले नाहीत अशा डब्यांचे उद्घाटन, मेट्रोच्या स्टेशनाचे उद्घाटनही त्यांनी उरकून घेतले. हे सारे निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकण्यासाठीच होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे नगारे वाजू लागलेले आहेत. पुढच्या सप्ताहात कधीही निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील. सरत्या सप्ताहात केंद्रीय निवडणूक आयोगाचे अतिवरिष्ठ अधिकारी मुंबईत थडकले होते. त्यांनी सर्व तयारीचा आढावा घेतला. निवडणुका कशा व्हाव्यात कायकाय गोष्टींवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी, संबंधित जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष ठेवले पाहिजे याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या. प्रशासकीय यंत्रणेची अशी सज्जता होत असताना राजकीय आघाडीवरही रणशिंग फुंकणे, तुतारीभेरी वाजवणे, नगारे धडधडू लागणे हे होणार हे अपेक्षितच होते.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी हा भाजपाला सापडलेला सर्वात हुकमी एक्का आहे, यात शंकाच नाही. तसाही भजापाचा आलेख देशभरात जसा चढता आहे तसाच तो महाराष्ट्रातही चांगलाच चढता राहिलेला आहे. गेल्या पाच वर्षांत ग्राम पंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगर पालिका, महानगरपालिका अशा सर्व स्तरावरील निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष हाच राज्यातील क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंची प्रतिमा अतिशय झगझगित आहे. त्यामुळेच अन्य राजकीय पक्षांमधील बड्या, छोट्या, मध्यम सर्वच स्तरातील नेत्यांचा ओघ भाजपाकडे काही दिवसांत चांगलाच वाढला आहे. कृष्णा पंचगंगेला जसे पूर आले तसेच भाजपात बाहेरून येणाऱ्यांचा पूर लोटलेला आहे. पण हा पूर म्हणजे नुसताच सुजवटा ठरू नये, अशी इच्छा पक्षाचे जुनेजाणते कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. निवडणुका जिंकण्याची क्षमता हा एकमेव निकष सध्या भाजपाच्या नेत्यांना दिसत आहे. येणारा नेता किती धुतल्या तांदळासारखा आहे, कुणाच्या पूर्वचरित्रात काही काळेबेरे दडले आहे का, याची फारशी फिकीर भाजपाला सध्या दिसतच नाही. त्यामुळे त्यांनी धडाक्यात प्रवेश देणे सुरूच ठेवले आहे.
 
 
मोदींच्या मुंबई भेटीआधी चार दिवस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह सोलापुरात येऊन गेले. तिथे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जगजीत सिंह राणा यांच्यासह अन्य दोन नेत्यांना समारंभपूर्वक पक्षात घेतले. जगजीत राणा यांच्या स्वतःविषयी काही प्रश्न नाही. त्यांच्यावर कोणतेच आरोप नाहीत. पण त्यांचे वडील शरद पवारांचे उजवे हात आणि अजित पवारांचे सख्खे मेहुणे असणारे डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यावर दुनियाभरातील गुन्हे दाखल आहेत. गोपीनाथ मुंडे यांनी पद्मसिंह पाटलांविरोधात आंदोलने केली होती. विख्यात समाजसेवक अण्णा हजारे यांनी अलिकडेच भरकोर्टात खळबळजनक आरोप केला होता की, पद्मसिंहांनी मला ठार मारण्याची सुपारी दिली होती. डॉ. पाटील यांच्याविरोधात सख्ख्या भावाला ठार मारल्याचा खुनाचा खटला अद्यापी सुरूच आहे. अशा घराण्यातील मुलाला विधानसभेची उमेदवारी देणे हे भाजपाच्या कोणत्या तत्त्वात बसते, हे भाजपावाल्यांनाच कळेनासे झाले आहे. त्यापाठोपाठ मोदींच्या उपस्थितीत आणखी काही दिग्गजांना भाजपात घेतले जाणार अशा बातम्या येत होत्या. पण तसे काही झाले नाही.
 

 
 
 
बीकेसीमध्ये झालेल्या सभेत पंतप्रधनांच्या मंचावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हजर होते. त्यांनी मोदींची स्तुती तर केलीच, पण पुढे येणाऱ्या निवडणुका युतीमध्येच लढणार असे जाहीर करून एका वादावर पूर्णविराम देऊन टाकला हे बरे झाले. फक्त तरीही काही प्रश्न शिल्लकच राहतात. विधानसभा निवडणुकीत जागावाटप नेमके कसे असावे यावरून शिवसेना-भाजपमध्ये सध्या कुरबुरी सुरू आहेत. अशावेळी युतीबाबत तर्कवितर्क केले जात असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा युतीचेच सरकार येणार असल्याचे सांगत युतीवर एकतर्फी शिक्कामोर्तब केले हे कसे? आणि ठाकरेंच्या त्या विधानावर किंवा हात पुढे करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही हे कशाचे लक्षण मानावे? मुंबईकरांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या अशा मेट्रो प्रकल्पांचे भूमीपूजन, प्रकल्पांचे उद्घाटन आदी करताना मोदींनी देशात पुढच्या पाच वर्षांत शंभर लाख करोड रूपयांचे पायाभूत प्रकल्प राबवले जाणार हे पुन्हा एकदा स्पष्ट केले. 
 
 
जुलैमध्ये संसदेत मंजूर झालेल्या भारत सरकारच्या अंदाजपत्रकातही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्याबाबतची घोषणा केलेलीच होती. मुंबई मेट्रो प्रकल्पांवर वीस हजार कोटींच्या खर्चाचीही घोषणा मोदींच्या कार्यक्रमात झाली. अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलर्सची करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी शहरांमध्ये २१व्या शतकातील पायाभूत सुविधांची गरज आहे. दळणवळण, संपर्क, उत्पादकता, शाश्वतता आणि सुरक्षितता यांच्या माध्यमातून ते साध्य होऊ शकेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाचे कौतुकही त्यांनी केले. राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली कामे, घेतलेले निर्णय ‘महाजनादेश’ यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही दिवसांत राज्य पिंजून काढले. याचाच पुढचा टप्पा म्हणून भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास योजनांच्या उद्घाटनांचा धडाका लावत प्रचाराचाही नारळ फोडून घेतला आहे. एकंदरीतच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा होण्यास काही दिवस शिल्लक असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी राज्यात विविध विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका लावीत निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला असे म्हणायला हरकत नाही.”

 

 
 
अनिकेत जोशी..
” संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com ”
” संपादक, बित्तंबातमी”
aniketsjoshi@hotmail.com 
 
 
“रशियाचा धावपळीचा दोन दिवसांचा दौरा आटोपून रात्रभर प्रवास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी पहाटे थेट बेंगलुरूला गेले. तिथे त्यांनी दिवसभराचे कार्यक्रम आटोपले आणि रात्री इस्रोच्या शास्त्रज्ञांसमवेत ते चांद्रयान -२चा अंतिम प्रवास पाहण्यासाठी बसले. इस्त्रोच्या मिशन कमांड सेंटरमध्ये कायकाय झाले याचे तपशील आपण पाहिलेच आहेत. तिथे अक्षरशः रात्र जागवून पुन्हा सकाळीच पंतप्रधान तिथे पुन्हा गेले. शास्त्रज्ञांच्या ढासळत्या मनोधैर्याला त्यांनी भक्कम आधार दिला आणि नंतर ते थेट मुंबईत दाखल झाले. म्हणजे दोन रात्री न झोपता मोदी मुंबईत व पुढे औरंगाबादेत कार्यक्रम करत होते हे महत्त्वाचे. प्रचंड पावासाने महाराष्ट्राच्या विविध भागात कहर चालवलेला आहे. अरे बाबा पावसा.. आता बस कर, अशी विनवणी जनता करू लागलेली आहे. मुंबई शहरही पावसाला अपवाद नव्हते. इथले दोन-तीन तासांचे सर्व कार्यक्रम पार पाडून पंतप्रधान दुपारी औरंगाबादेत गेले. तिथून पुढे ते नागपूरला जाणार होते. पण नागपुरात शुक्रवारीच तुफानी पाऊस पडला होता आणि शनिवारीही मोठ्या पावसाचे अंदाज आले होते. त्यामुळे तो दौरा पंतप्रधानांनी रद्द केला. मुंबई औरंगाबाद आणि नागपूर असे तीन तीन कार्यक्रम मोदींनी घेतले होते.”
 
 
“अर्थातच महाराष्ट्राच्या निवडणुका समोर येत आहेत हेच इतक्या भरगच्च दौऱ्याचे कारण होते हे उघड आहे. निवडणुका लक्षात घेऊनच अनेक प्रकल्पांची धडाधड उद्घाटने त्यांनी केली. अनेक प्रकल्पांची पायाभरणीही केली. ज्या मेट्रोचे काम पूर्ण झालेले नाही आणि जे मेट्रोचे डबे प्रत्यक्षात आलेले नाहीत अशा डब्यांचे उद्घाटन, मेट्रोच्या स्टेशनाचे उद्घाटनही त्यांनी उरकून घेतले. हे सारे निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकण्यासाठीच होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे नगारे वाजू लागलेले आहेत. पुढच्या सप्ताहात कधीही निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील. सरत्या सप्ताहात केंद्रीय निवडणूक आयोगाचे अतिवरिष्ठ अधिकारी मुंबईत थडकले होते. त्यांनी सर्व तयारीचा आढावा घेतला. निवडणुका कशा व्हाव्यात कायकाय गोष्टींवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी, संबंधित जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष ठेवले पाहिजे याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या. प्रशासकीय यंत्रणेची अशी सज्जता होत असताना राजकीय आघाडीवरही रणशिंग फुंकणे, तुतारीभेरी वाजवणे, नगारे धडधडू लागणे हे होणार हे अपेक्षितच होते.”
 
 
“पंतप्रधान नरेंद्र मोदी हा भाजपाला सापडलेला सर्वात हुकमी एक्का आहे, यात शंकाच नाही. तसाही भजापाचा आलेख देशभरात जसा चढता आहे तसाच तो महाराष्ट्रातही चांगलाच चढता राहिलेला आहे. गेल्या पाच वर्षांत ग्राम पंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगर पालिका, महानगरपालिका अशा सर्व स्तरावरील निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष हाच राज्यातील क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंची प्रतिमा अतिशय झगझगित आहे. त्यामुळेच अन्य राजकीय पक्षांमधील बड्या, छोट्या, मध्यम सर्वच स्तरातील नेत्यांचा ओघ भाजपाकडे काही दिवसांत चांगलाच वाढला आहे. कृष्णा पंचगंगेला जसे पूर आले तसेच भाजपात बाहेरून येणाऱ्यांचा पूर लोटलेला आहे. पण हा पूर म्हणजे नुसताच सुजवटा ठरू नये, अशी इच्छा पक्षाचे जुनेजाणते कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. निवडणुका जिंकण्याची क्षमता हा एकमेव निकष सध्या भाजपाच्या नेत्यांना दिसत आहे. येणारा नेता किती धुतल्या तांदळासारखा आहे, कुणाच्या पूर्वचरित्रात काही काळेबेरे दडले आहे का, याची फारशी फिकीर भाजपाला सध्या दिसतच नाही. त्यामुळे त्यांनी धडाक्यात प्रवेश देणे सुरूच ठेवले आहे.”
 
 
“मोदींच्या मुंबई भेटीआधी चार दिवस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह सोलापुरात येऊन गेले. तिथे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जगजीत सिंह राणा यांच्यासह अन्य दोन नेत्यांना समारंभपूर्वक पक्षात घेतले. जगजीत राणा यांच्या स्वतःविषयी काही प्रश्न नाही. त्यांच्यावर कोणतेच आरोप नाहीत. पण त्यांचे वडील शरद पवारांचे उजवे हात आणि अजित पवारांचे सख्खे मेहुणे असणारे डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यावर दुनियाभरातील गुन्हे दाखल आहेत. गोपीनाथ मुंडे यांनी पद्मसिंह पाटलांविरोधात आंदोलने केली होती. विख्यात समाजसेवक अण्णा हजारे यांनी अलिकडेच भरकोर्टात खळबळजनक आरोप केला होता की, पद्मसिंहांनी मला ठार मारण्याची सुपारी दिली होती. डॉ. पाटील यांच्याविरोधात सख्ख्या भावाला ठार मारल्याचा खुनाचा खटला अद्यापी सुरूच आहे. अशा घराण्यातील मुलाला विधानसभेची उमेदवारी देणे हे भाजपाच्या कोणत्या तत्त्वात बसते, हे भाजपावाल्यांनाच कळेनासे झाले आहे. त्यापाठोपाठ मोदींच्या उपस्थितीत आणखी काही दिग्गजांना भाजपात घेतले जाणार अशा बातम्या येत होत्या. पण तसे काही झाले नाही.”
 

 
 
 
“बीकेसीमध्ये झालेल्या सभेत पंतप्रधनांच्या मंचावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हजर होते. त्यांनी मोदींची स्तुती तर केलीच, पण पुढे येणाऱ्या निवडणुका युतीमध्येच लढणार असे जाहीर करून एका वादावर पूर्णविराम देऊन टाकला हे बरे झाले. फक्त तरीही काही प्रश्न शिल्लकच राहतात. विधानसभा निवडणुकीत जागावाटप नेमके कसे असावे यावरून शिवसेना-भाजपमध्ये सध्या कुरबुरी सुरू आहेत. अशावेळी युतीबाबत तर्कवितर्क केले जात असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा युतीचेच सरकार येणार असल्याचे सांगत युतीवर एकतर्फी शिक्कामोर्तब केले हे कसे? आणि ठाकरेंच्या त्या विधानावर किंवा हात पुढे करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही हे कशाचे लक्षण मानावे? मुंबईकरांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या अशा मेट्रो प्रकल्पांचे भूमीपूजन, प्रकल्पांचे उद्घाटन आदी करताना मोदींनी देशात पुढच्या पाच वर्षांत शंभर लाख करोड रूपयांचे पायाभूत प्रकल्प राबवले जाणार हे पुन्हा एकदा स्पष्ट केले. ”
 
 
“जुलैमध्ये संसदेत मंजूर झालेल्या भारत सरकारच्या अंदाजपत्रकातही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्याबाबतची घोषणा केलेलीच होती. मुंबई मेट्रो प्रकल्पांवर वीस हजार कोटींच्या खर्चाचीही घोषणा मोदींच्या कार्यक्रमात झाली. अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलर्सची करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी शहरांमध्ये २१व्या शतकातील पायाभूत सुविधांची गरज आहे. दळणवळण, संपर्क, उत्पादकता, शाश्वतता आणि सुरक्षितता यांच्या माध्यमातून ते साध्य होऊ शकेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाचे कौतुकही त्यांनी केले. राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली कामे, घेतलेले निर्णय ‘महाजनादेश’ यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही दिवसांत राज्य पिंजून काढले. याचाच पुढचा टप्पा म्हणून भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास योजनांच्या उद्घाटनांचा धडाका लावत प्रचाराचाही नारळ फोडून घेतला आहे. एकंदरीतच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा होण्यास काही दिवस शिल्लक असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी राज्यात विविध विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका लावीत निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला असे म्हणायला हरकत नाही.”

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content