HomeArchiveप्रगतशील समाजासाठी प्रत्येकाने...

प्रगतशील समाजासाठी प्रत्येकाने झटणे आवश्यक – डॉ. जगन्नाथ हेगडे

Details
प्रगतशील समाजासाठी प्रत्येकाने झटणे आवश्यक – डॉ. जगन्नाथ हेगडे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
प्रगतशील समाजासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने झटणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी बुद्धीजीवी व्यक्तीने आपण समाजासाठी व देशासाठी काय करू शकतो, याचा विचार करून कार्य केले पाहिजे, असे विचार मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथ हेगडे यांनी व्यक्त केले.
दंतवैद्यक क्षेत्रातील कामगिरीबद्दल डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून डॉ. जगन्नाथ हेगडे यांना डॉक्टरेट हा बहुमान प्रदान करण्यात आल्याबद्दल दादर क्लब येथे नुकताच शानदार सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास शहरातील नामवंत प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती. लायन्स क्लब ऑफ मिडटाऊन यांनी कार्यक्रमाचे यजमानपद स्वीकारले. पीएमजेएफ सीए लायन दिव्येश शाह, लायन कमलेश दलाल, लायन राजकुमार गुप्ता हेही याप्रसंगी उपस्थित होते.

डॉ. हेगडे यांचे कार्य हे सातत्याने समाजाभिमुख राहिले आहे. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य केले तरी त्यांचा केंद्रबिंदू सामान्य माणूस राहिला आहे. त्यांनी गेल्या पाच दशकांहून अधिक काळ दंतशल्यचिकित्सक म्हणून केलेली उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मुंबईचे 100 वर्षांतील सर्वोत्कृष्ट नगरपाल हा बहुमान त्यांना नगरपालपदावर असताना मिळाला आहे. ही त्यांच्या कार्याची पावती आहे, असे विचार दिव्येश शाह यांनी व्यक्त केले.

 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content