HomeArchiveपायऱ्या..

पायऱ्या..

Details
पायऱ्या..

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यावर एक्झिट पोलवर विश्लेषणासाठी टिव्ही 9 चॅनेलवर पत्रकारांना बोलाविले होते. ज्येष्ठ महिला पत्रकार आणि पुण्यनगरी दैनिकाच्या मुख्य संपादिका राही भिडे आल्या होत्या. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये एका हॉटेलच्या पायरीवरून घसरून त्या पडल्या आणि त्यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली. त्यांना त्यामुळे सहा महिने बेडरेस्ट घ्यावी लागली. त्यांना घरातल्या घरात न चालण्याची डॉक्टरांनी सक्त ताकीद दिली होती. राही भिडे ३० वर्षे पत्रकारितेत काम करत आहेत. बातमीसाठी सतत धावपळ करणाऱ्या राहींना आता पहिल्यासारखी धावपळ करता येत नाही.

पत्रकार हा एक असा प्राणी आहे, तो एकेठिकाणी शांतपणे बसू शकत नाही. सातत्याने भ्रमंती करणे हा त्याच्या रक्तात भिनलेला गुण आहे. मग राही भिडे कशा स्वस्थ बसणार? त्या लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर विश्लेषण करण्यासाठी टीव्ही ९ चॅनेलच्या कार्यालयात आल्या आणि नेमके त्यादिवशी लिफ्ट बंद होती. झाली ना पंचाईत भिडे बाईंची! आयुष्यभर पायऱ्या चढून आज एक यशस्वी पत्रकार म्हणून महाराष्ट्रात नावारूपाला त्या आल्या. लंडन, अमेरिका याठिकाणी त्यांच्या कार्याचा गौरवही करण्यात आला. परंतु त्यादिवशी टीव्ही चॅनेलच्या पायऱ्या चढताना त्यांना घरी परत जावेसे वाटले. तरीही त्या चॅनेलच्या पायऱ्यांना भिडल्या आणि ‘हम है राही..’ मनात म्हणतम्हणत कसेबसे पहिला मजला चढण्यात त्या यशस्वी झाल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर एव्हरेस्ट चढल्याचा आनंद दिसत होता. अशावेळी वेदनाही ओशाळतात!

प्रत्येकाच्या जीवनात पायऱ्या चढल्याशिवाय जीवन परिपूर्ण होत नाही. आता हेच बघा ना, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी महिनाभर देशात प्रचारासाठी फिरले. शेवटी मानसिक ताण कमी करण्यासाठी परदेशात विश्रांतीसाठी गेले नाहीत तर ते गेले केदारनाथ गुहेत! ध्यानसाधनेतूनही मनःशांती मिळते. केदारनाथला गेले तेही चार किलोमीटर चालत, कमाल आहे की नाही. माणूस ध्येयवादी असला की, त्याला शारीरिक यातना क्षुल्लक बाब वाटते. मध्यंतरी फेसबुकवर एक पोस्ट होती. उत्तर प्रदेशातील ती साधारण २२ वर्षांची मुलगी. रेल्वेत एका भुरट्या चोराला तिने चांगला चोप दिला. त्याने तिला रेल्वे डब्यातून खाली फेकून दिले. त्यात तिचे दोन पाय गेले. या मध्यमवर्गीय मुलीने दोन पाय गमविल्यानंतरही तिचं ध्येय होत एव्हरेस्टवर चढाई करण्याचं आणि तिचा आतला आवाज, आत्मविश्वास तिला स्वस्थ बसू देईना. तीने शेवटी एव्हरेस्ट सर केला. आत्मविश्वास हा माणसाला कोणत्या उंचीवर जाऊन ठेवतो याच हे उत्तम उदाहरण आहे.

मंत्रालयात राज्याच्या मुख्यमंत्र्याना भेटण्यासाठी हजारो लोक, लोकप्रतिनिधी, व्हीआयपी येतात. मंत्रालयाला भीषण आग लागल्यानंतर नूतनीकरण करताना सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्र्याचं कार्यालय पाहिल्या मजल्यावर आणण्यात आले. त्यासाठी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एशियाटिक लायब्ररीसारख्या उंच पायऱ्या असलेले बांधकाम केले होते. राज्यातील जनता कोसो मील पायपीट करत मंत्रालयात येणार, त्या पायऱ्या चढणार आणि काम होणार की नाही याची खात्रीही नाही. त्या पायऱ्या चढताना लोकांची दमछाक होणारच! त्याठिकाणी आत्मविश्वास नाही, सरकारी काम, सहा महिने थांब, हा समज मनात कायम भिनल्याने मंत्रालयातील त्या पायऱ्या अखेर जमीनदोस्त करण्यात ल्या. लोकांच्या सारकारविषयीच्या भावना त्या पायऱ्यांवर कोरल्या जाऊ नये म्हणून सरकारने त्या उखडल्या. कदाचित या पायऱ्या सरकारविषयीचे मत बदलू शकते, हे लक्षात घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत मंत्रालयातील पायऱ्यांवरून सरकारची संभाव्य घसरण थांबावी यासाठी घेतलेली दक्षता, असे म्हणावे लागेल.

राज्यात सप्तश्रृंगी देवीसाठी लाखो भक्त पायऱ्या चढून देवीचं दर्शन घेतात. भक्तांना सप्तश्रृंगी देवीबद्दल असलेली श्रद्धा येथे महत्त्वाची आहे. ही श्रद्धा भक्तांना ताकद देत असते. आजही अनेक भक्त केवळ श्रद्धेपोटी देवीच्या पायऱ्या चढतात. त्यात रक्तदाब, हृदयविकार, मधुमेही रूग्णही असतात. पण सप्तश्रृंगी देवीच्या पायऱ्या त्यांना हे आजार विसरायला लावते.

गिरगावात पूर्वीच्या इमारतीत उंचावर पायऱ्या असायच्या.. त्या पायऱ्या चढताना वडीलधाऱ्यांची दमछाक होत नव्हती. त्यावेळी त्यांना घरची ओढ असल्याने पायऱ्यांचं त्यांना विशेष काहीच वाटत नव्हते. आता मात्र घरची ओढ असलीतरी ब्लड प्रेशर, हृदयविकार, मधुमेह या पायऱ्या त्यांच्यासाठी नरकयातना झाल्या आहेत. नुकतंच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल कोसळून सहा माणसे बळी पडले म्हणून नेहमी प्रवास करणारे प्रवासी पायऱ्या चढण्याचे टाळत नाहीत. ‘पापी पेट का सवाल है?’ हा प्रश्न उराशी ठेवून त्यांना पायऱ्या चढाव्या लागतातच.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे रायगडावरील किल्ले पाहण्यासाठी युवक रोप वेपेक्षा प्रत्यक्ष पायऱ्या चढून जाण्यास प्राधान्य देतात. कारण त्यात शिवाबाच्या कर्तृत्त्वाचं दर्शन घडतं आणि तरूण, वयस्कर यांना रायगडच्या पायऱ्या चढण्यात अभिमान वाटतो. त्या पायऱ्या चढताना शिवाबाचं कर्तृत्त्व त्यांच्यासमोर येतंच शिवाय जिवंत इतिहास त्यांच्या समोर उभा राहतो, तो कायम. काही पायऱ्या नकोशा वाटतात तर काही पायऱ्या मनाला उभारी देतात. हीच उभारी आयुष्याच्या शेवटपर्यंत जगण्याची इच्छा दुपटीने वाढविते. पायरी जीवनाला उभारी देणारी आहे, पण एक पायरी चुकल्यास संपूर्ण जीवन उद्धस्त होतं. म्हणून म्हणतात, ‘जपून टाक पाऊल जरा..”
 
“जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

आशाताईंवर आज संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भारतीय संगीतसृष्टीतील एका युगाचा रविवारी अंत झाला. दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण सन्मानाने गौरवलेल्या, जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे मुंबईत निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, बहुअवयव निकामी (मल्टी-ऑर्गन फेल्युअर) होऊन त्यांचे...

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...
Skip to content