Details
निवडणुकीत सैन्याच्या या मुद्द्यांचा झाला वापर!
01-Jul-2019
”
विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
देशाच्या १७ व्या लोकसभेसाठी नुकत्याच निवडणुका झाल्या. त्याचा निकाल हाती येऊन पंतप्रधानपदावर पुनःश्च नरेंद्र मोदी आरूढ होत आहेत. या निडणुकीच्या प्रचारात त्यांनी सैन्य दलासंबंधित मुद्द्यांचा प्रभावी वापर करून जनमत आपलेसे करून घेतले. मोदींना फैलावर घेण्याची तयारी विरोधकांनी चालवली असता घडलेल्या कालचक्राचा उपयोग करण्याची संधी त्यांना मिळाली.
वास्तविक निवडणुकीआधी विविध प्रश्नांवर घेरण्याची मोहीम महागठबंधन उभारून झाली होती. तशातच अत्यंत दुर्दैवी असा पुलवामा हल्ला काश्मीर भागात झाला. शेजारील शत्रूराष्ट्र पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटनेने आत्मघातकी कार सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यात घुसवून भयानक स्फोट घडवून आणला. त्यात ४५ हून अधिक जवान मारले गेले तर काही अपंग झाले. या घटनेने देश हादरून तर गेलाच, शिवाय पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्याची मागणी संतप्तपणे होऊ लागली. त्यावर काहीतरी करावेच लागणार इतका प्रचंड तो क्षोभ होता. अखेर, गुप्तता राखीत तयार झालेल्या आराखड्याप्रमाणे सीमेजवळील दहशतवादी तळ असलेल्या बालाकोट भागात भारतीय हवाई दलाची विमानं झेपावली नि पुढे काय झालं तो इतिहास सर्वांना माहीत आहे.
या पुलवामा हल्ल्यानंतर देशभावना जाणून घेत याची किंमत चुकवावी लागेल असा इशारा पंतप्रधानांनी दिला. इतरांना वाटला तसा हा नेहमीचा इशारा नव्हता. हे कळायला २६ फेब्रुवारीची सकाळ उजाडावी लागली. त्याचे पडसाद उमटून आनंद केला गेला. पण त्यावर विरजण पडलं ते वैमानिक अभिनंदन वर्थमान विमान कोसळून शत्रूराष्ट्राच्या तावडीत सापडल्याच्या बातमीने. तीनशे दहशतवादी मारल्याचा वृत्ताने लाडू-मिठाई वाटली गेली. पुढे आपल्या योध्याची सुटका आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबावाने करावी लागली. यावरून मोठं राजकारण केलं गेलं. पाकिस्तानच्या हवाल्याने विरोधी पक्षांनी खरोखरंच कोणी मारलं गेलं का, की नुसतीच बॉम्बफेक झाली अशी विचारणा करीत देशाच्या सैन्यावर अविश्वास दाखविला. त्यात भावी पंतप्रधान, आपल्या राज्यातून झालेले माजी संरक्षण मंत्री, यांच्यासह काही मोठे नेते होते. याचा फायदा उचलून सत्तारूढ पक्षानं वातावरण तयार केलं राष्ट्रवादाचं. त्याला लोकांनी प्रतिसाद दिल्यानं त्याचे परिणाम विरोधकांनी भोगले.
ही कारवाई करण्याचं श्रेय हवाई दलाला आहे, ते पंतप्रधान मोदी काय म्हणून घेतात असा बालिश वाटावा प्रश्नही विचारला गेला. पंतप्रधानांच्या इशाऱ्यावरून ही कारवाई झाली असली तरी हवाई दलाचे महत्त्व तसूभरही कमी होत नाही. आदेश देणारा नायक हा नायकच असतो, सेनापती असतो. त्याशिवाय सैन्य हल्ला करू शकत नाही ही मूलभूत बाब विसरली गेली. विरोधकांकडून हे लोकांनी हेरून राजकारण समजून घेतलं. नेहमीप्रमाणे पाकड्यानी कांगावा केलाच. भारतीय हवाई दलाने बॉम्ब जंगलात टाकले. यात एफ 15 या अमेरिकी विमानाला जुन्या मिराज बिस्नेनने लक्ष्य केल्यानं नि ते पाडल्याने चांगलाच गवगवा झाला. माजी उपराष्ट्रपती अन्सारी यांनीही नको ते बोलून घेतले. यामुळं झालं काय की बेताल बोलणाऱ्या विरोधकांची हवा फुस्स झाली. लोकांनी त्यांना झिडकारलं. बाकी सगळं विसरून जनता मोदींमागे उभी राहिल्याचे दिसून आली.
या हल्ल्याने देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, लोक तयारीला लागले. बैठका झडल्या. महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्प अधिवेशनात केंद्राच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडून भक्कमपणे उभं राहण्याची ग्वाही दिली गेली, अधिवेशन गुंडाळले गेले. कित्येक दिवस देशात युद्धाचा माहोल कायम राहिला. पंतप्रधान मोदींसहित इतर देशांच्या दबावाने ताब्यातील वैमानिकाला सोडावं लागलं. हरएक याला पंतप्रधानांची मोठी कामगिरी म्हणू लागला. जाहीर सभांमधून अभिनंदन यांच्या फोटोसह जनता येऊ लागली. आम्हीही एअरस्ट्राईक केले, पण त्याचा प्रसिद्धीसाठी वापर केला नाही असं सांगणाऱ्या काँग्रेसने तारखा देऊन पाहिल्या, लोकांनी ते दावे उडवून लावले.
सीमेलगतच्या उरी लष्करी तळावर १८ सप्टेंबर २०१६च्या पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला चढवून देश हादरवला. सीमेवर काश्मिरात नेहमीच कुरापती काढणारा पाकिस्तान इतका मोठा हल्ला दहशतवाद्यांना पुढे करून करेल ही शक्यता वाटत नव्हती. पण ते घडले. आपण त्याला प्रत्युत्तर दिलं हा भाग वेगळा. त्याची किंमत आपल्याला चुकवावी लागली ती आपल्या जवानांच्या प्राणाची बाजी लावून. यावरही लोक प्रक्षुब्ध झाले काही पक्षांनी तर थेट सैन्य घुसवण्याची मागणी करीत सत्ताधारी आपणच आहोत याचं भान सोडलं. २८ सप्टेंबरच्या पहाटे सर्जिकल स्ट्राईकच करून पाकव्याप्त काश्मिरातील ते तळ नेस्तनाबूत केले. याचे पुरावे मागणाऱ्या विरोधकांनी पंतप्रधान मोदींना स्वतःची ‘प्रतिमा’ (इमेज) बनवायला मदतच केली. याचाही फायदा होऊन पाकड्याना धडा हाच माणूस शिकवेल हे ठसवण्यात मोदी यशस्वी झाले. पुढे कालंतराने ते व्हिडिओ लष्कराने सादर केले, संसदीय समितीसमोर साक्षीपुरावे झाले. देशाची गोपनीयता बाजूला ठेवून केलेली कार्यवाहीची चिरफाड करून देशाच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली. याचंच वर्णन करणारा चित्रपट ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ आला नि लोकांनी चक्क उचलून घेतला. त्यातील ‘हौज द जोश’ हा संवाद चांगलाच गाजला. मुंबईतील फिल्म्स डिव्हिजनच्या इमारत उदघाटनावेळी हा प्रश्न विचारण्याचा मोह खुद्द पंतप्रधानांना आवरला नाही. त्यांनी तो करताच ‘येस सर’ असे जोरदार प्रत्युत्तर त्यांना मिळालं.
एक दर्जाश्रेणी – एक निवृत्तीवेतन (वन रँक वन पेंशन) यावरून देशात रान माजवले गेले. जिथे सामान्यांना नेहमीच्या पगाराची भ्रांत, निवृत्तीनंतर काय याची चिंता, तिथे सरकारी बाबूंना आपल्या म्हातारपणाची चिंता सर्व सोयी भोगून याचं वैषम्य लोकांना वाटतं. लष्कर अपवाद असले तरी भावना येतेच असं काहींनी बोलून दाखवलं. त्यावरून मोर्चे झाले. अखेर अर्थसंकल्पात ३५ हजार कोटी रूपयांची तरतूद करीत या योजनेला संमती देण्यात आली. यामुळे सुरक्षा दलं मोदींच्या बाजूने उभी राहिली असं म्हटलं जातं.
ऐन निवडणुकीत इस्रोने अवकाशातच उपग्रह पाडण्याची क्षमता असल्याचं दाखवून दिलं. असॅट या अँटीसॅटेलाईटमुळे शत्रूपक्षाच्या उपग्रह हालचालीवर लक्ष ठेऊन तो पाडता येईल हा देशाची मान ताठ करणारा क्षण असून गौरवान्वीत वाटत असल्याचं भाष्य प्रचारकाळात केलं. त्याचं भांडवल विरोधी पक्षांनी केलं. मिशन शक्ती अवघ्या तीन मिनिटांत पूर्ण झाल्याचं सांगत ही कमाल करणाऱ्या अमेरिका, चीन, रशियाच्या पंक्तीत आपण बसल्याचे मोदींनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात स्पष्ट केलं. अवकाश संरक्षणसिद्धता असल्याचं पाहून देशानंही स्वागत केलं. थोडक्यात काय तर जिथे संधी मिळेल तशी भाषा करीत लोकांच्या राष्ट्रभावनेला मोदी आणि चमूने साद घातली नि लोकांनीही प्रखरपणे ओ देत त्यांच्या बाजूने पर्यायाने देशाच्या एकतेच्या सैन्याच्या मागे भक्कमपणे उभे असल्याची ग्वाही दिलीय. तेव्हा जय हिंद!”
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार