HomeArchiveनिर्मात्यांची शाळा!

निर्मात्यांची शाळा!

Details
निर्मात्यांची शाळा!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

देवेंद्र भुजबळ, माध्यमकर्मी
[email protected]
“निर्मात्यांची शाळा” हे शीर्षक वाचून गम्मत वाटली ना? पण खरंच.. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि ऐसपैस निर्मिती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात मराठी चित्रपट निर्मात्यांसाठी नुकतीच एका दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. चित्रपट म्हटला की आपल्या डोळ्यासमोर पटकन चित्रपटगृह, चित्रपटाचे रीळ, चित्रिकरण, नट, नटी, आवडलेला एखादा चित्रपट, काही प्रसंग, गाणी, असं सर्व काही येतं. पण तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे. त्याचे परिणाम साहजिकच चित्रपट निर्मितीवर होत आहेत. नवे तंत्र येत आहे. नवे कायदे, नियम लागू होत आहेत. नव्या शब्दावल्या तयार होत आहेत. नव्या बाजारपेठा निर्माण होत आहेत. हे सर्व आपल्या निर्मात्यांना विशेषतः नवोदितांना कळावं म्हणून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असे महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सांगितलं.

या कार्यशाळेत दिवसभर चाललेल्या विविध सत्रात काय झालं, हे आता आपण पाहूया. पहिल्याच पोस्ट प्रॉडक्शन सत्रात “व्हिज्युअल पोस्ट प्रॉडक्शन” विषयी संकेत कुळकर्णी, “व्हिएफएक्स” विषयी अनुज देशपांडे, “ऑडिओ पोस्ट प्रॉडक्शन” विषयी अनमोल भावे यांनी अनमोल मार्गदर्शन केलं. त्यानंतर मनमोकळं शंका समाधान झालं. “चित्रपट महोत्सव, पुरस्कार आणि फंड्स” याविषयी कधी मुंबईत तर कधी जर्मनीत राहणारे एम. एन. गुजर यांनी स्लाइड्सद्वारे नेमकी, उपयुक्त माहिती दिली.

हक्क सत्रात, सॅटेलाईट हक्क याबाबत शाम मयेकर तर डिजिटल हक्क याविषयी अजय वाडकर यांनी सूत्रबद्ध विवेचन केलं. स्नेहभोजन छान झालं. यानंतरच्या सत्रात “चित्रपट वितरण आणि प्रदर्शन प्रेझेंटर पार्टनर” या सर्व निर्मात्यांच्या अत्यन्त जिव्हाळ्याच्या विषयावर सविस्तर चर्चा झाली. सादिक चितळीकर, ओंकार रानडे, समीर दीक्षित, समीर सक्सेना यांनी त्यात भाग घेतला. अजय फुटाणे यांनी नेटकं सूत्रसंचालन केलं. सादिक चितळीकर यांचं ऐसपैस मनोगत सर्वांना भावून गेलं.
चहाशिवाय चित्रपट आणि त्याविषयीच्या कार्यशाळेला काय मजा? एक कप चाय तो बनती है ना? तर मस्त चहापान झालं. यानंतरच्या सत्रात “चित्रपट जाहिरात धोरण” यामध्ये “ऑनलाइन प्रमोशन” वर विक्रम सुळे तर “ऑफलाईन प्रमोशन” वर अनुजा कर्णिक यांनी स्वानुभव कथन केले. “महाराष्ट्र शासनाकडून मराठी चित्रपटांना मिळणारं अनुदान” या विषयावर ज्येष्ठ चित्रपट पत्रकार दिलीप ठाकूर यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं.

५२ वर्षे झालेल्या ४५ हजार सदस्य असलेल्या मराठी चित्रपट महामंडळानं काळाची पावलं ओळखून ही कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल महामंडळ, विशेषतः अध्यक्ष मेघराज राजेभोसले निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. कार्यशाळेतील एकेक विषय एकेका वर्षाच्या अभ्यासक्रमाचे आहेत. त्यामुळे एका दिवसात सर्व काही शिकलं गेलं असेलच असं नाही. पण तरीही सर्व तज्ञांनी वेळेचं भान ठेवत केलेलं मार्गदर्शन उपस्थितांना नवी दृष्टी देऊन गेलं. ऐसपैस निर्मिती संस्थेने छानच आयोजन केलं. महामंडळाच्या पुढील उपक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा!”
 
“देवेंद्र भुजबळ, माध्यमकर्मी

Continue reading

आशाताईंवर आज संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भारतीय संगीतसृष्टीतील एका युगाचा रविवारी अंत झाला. दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण सन्मानाने गौरवलेल्या, जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे मुंबईत निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, बहुअवयव निकामी (मल्टी-ऑर्गन फेल्युअर) होऊन त्यांचे...

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...
Skip to content