HomeArchiveदुष्काळात निवडणूक!

दुष्काळात निवडणूक!

Details
दुष्काळात निवडणूक!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनोद साळवी, मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
शेतकरी आत्महत्त्या, महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, चहूबाजूला पेटलेला दुष्काळाचा वणवा, गरिबी, दारिद्य्र, कुपोषण, दहशतवाद, नक्षलवाद, देशांतर्गत सनातनी कट्टरतावाद, शिक्षण, आरक्षण, आर्थिक धोरण हे सर्व प्रश्न आजी राज्यकर्ते व माजी सत्ताधार्यांोनी कधीच तडीस नेले आहेत. त्यामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या वेशीवर असलेल्या ठाणे, पालघर जिल्ह्यात भलेही पाणीटंचाई, दुष्काळाच्या झळा जाणवत असल्यातरी निवडणुकीच्या सोहळ्यात त्याला कुठेच स्थान नाही. उरा-पोटावर हांडी-भांडी घेऊन उन्हातान्हातून मैलोन्मैलाची पायपीट करत विहिरीतल्या, डबक्यातल्या पाण्यावर आपली तहान भागवायची वेळ त्यांच्यावर आली आहे. साहेबांना शुद्ध बाटलीबंद पाणी. मग तुमचा दुष्काळ आणि तुमचे तेच तेच प्रश्न जावो चुलखंडात.

राम मंदिर झालेच पाहिजे! गावात पाण्याच्या थेंबाची बोंबाबोंब असली तरी निवडणुकीनिमित्त दारूचा महापूर आणि नोटांचा पाऊस पडायलाच हवा. व्होट पे नाही तर नोट पे चर्चा करा! व्यक्तीकेंद्रीत भक्तीचा मळा बघावं तिकडं फुलला आहे. जो-तो एकमेकांवर कुत्र्या-मांजरासारखा डुख धरून आहे. विकासाच्या राजकारणाला नख देऊन जो-तो ठोकशाहीची भाषा बोलत आहे. विकासाच्या नावाने उर बडवणारे आपले लोकप्रतिनिधी सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्याने ‘पाण्याविना जनता मरो या जगो’, याच्याशी त्यांना फारसे देणेघेणे नाही. ठाणे जिल्ह्यातील वाडा, मोखाडा, जव्हार, शहापूर, मुरबाड तालुक्याला दुष्काळ व पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात तर दुष्काळाच्या झळांनी गावकरी मेटाकुटीला आले आहेत. या मतदारसंघातील खासदार व लोकसभा उमेदवार हंसराज अहिर मात्र प्रचारात व्यग्र आहेत.

वाडा तालुक्यातील अनेक गाव, पाड्यांतील जनसामान्यांच्या घशाला पाण्याविना कोरड पडली आहे. इथले लोक सरकार दरबारी आणि लोकप्रतिनिधींच्या दारावर हिंडत आहेत. मात्र अधिकारी निवडणुकीच्या कामांत अडकले आहेत तर लोकप्रतिनिधी प्रचारात गुंतल्याने मतदारांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. हेच विकासाचे स्वप्न आहे. यंदा ऑगस्टनंतर पाऊस गायब झाल्याने येथील नदी, नाले, विहिरींनी मार्चपासूनच तळ गाठला आहे. नद्याही आटून गेल्या आहेत. त्यामुळे नदीकाठच्या नाणे, सांगे, गोर्हेअ, देवळी, आपटी, शिलोत्तर, उमरोठे अशा अनेक गावच्या नळपाणी पुरवठा योजनाही बंद पडल्या आहेत. अधिकारीही निवडणुकीच्या कामात गुंतल्याने भेटू शकत नाहीत तर पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, आमदार शांताराम मोरे, आमदार पांडुरंग बरोरा, खासदार कपिल पाटील, खासदार राजेंद्र गावित हे लोकप्रतिनिधी निवडणूक प्रचारात गुंतले आहेत. त्यांनी सध्या निवडणुकीशिवाय इतर विषयांवर बोलणेच बंद केले आहे.

2014 ते 2019 या पाच वर्षांत डिजिटल इंडिया आणि डिजिटल गावे विकसित झाल्याने हे अच्छे दिन महाराष्ट्रात व देशात जागोजागी आले आहेत. हे विकासाचे चित्र 70 वर्षांच्या एकपक्षीय राजवटीत नव्हतेच. आता कुठं दगडाला पाझर फुटू लागला आहे. उन्हातान्हाचा कडाका सोसून, दुष्काळाचे दु:ख उराशी कवटाळून दादांचं, साहेबांचं दमदार भाषण ऐकण्यासाठी भक्तांची तोबा गर्दी लोटत आहे. एकीकडे कुटुंबच्या कुटुंबं प्रचारात व निवडणुकीच्या मैदानात उतरली आहेत तर दुसरीकडे देशातील व राज्यातील कुटुंबच्या कुटुंबं रणरणत्या उन्हात पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करत आहेत. नेते आणि विकाऊ कार्यकर्त्यांच्या भाऊगर्दीत अन् प्रचारफेर्यांितून विकास हरवला आहे. वॉटरमॅन ऑफ इंडिया तथा जलसंरक्षक राजेंद्र सिंह यांच्या माहितीनुसार देशातील 16 राज्यांतील 352 हून अधिक जिल्हे दुष्काळाचा सामना करत आहेत. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि महाराष्ट्राचा यात समावेश आहे. देशातील 90 टक्क्यांहून अधिक छोट्या नद्या आटल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. धरणांतील पाणी आटल्याने गावोगावी पाणीटंचाईचा तडाखा बसत आहे. राज्यातील 3111 गावे आणि 7159 पाडयांना 3970 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दुष्काळ, पाणीटंचाई हा मुद्दाच नाही. तेथे दुष्काळ या शब्दावरही आचारसंहितेचे सावट आहे. नव्हे दरसाल येणार्याप दुष्काळावर मुख्यमंत्री, पंतप्रधानांचा तोंडी उतारा आहे. आम्ही हे करू, आम्ही ते करू, हा बेमोसमी पाऊस आहे.. वगैरे..

दुष्काळाच्या झळांनी पोळून निघालेल्या लातूर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी रणरणत्या उन्हात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. 11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी ही सभा झाल्याने फडणवीस यांनी बेंबीच्या देठापासून कोकलून लातूरकरांचा दुष्काळ दूर करण्याचा प्रयत्न केला. मंचावर वातानुकूलित गारवा असतानाही भाषण करताना धापा टाकणार्या मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी उपायोजनांच्या जोरदार थापा मारल्या. पण, अनेक गावांत जलस्रोत आटल्याने पाण्याचा आणि चार्यााचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आजमितीस 9 हजार 660 गावपाड्यांत 3 हजार 700 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. अनेक जिल्ह्यांत जनावरांच्या चारापाण्याची समस्याही गंभीर आहे. तेथे 872 छावण्यांत तब्बल पाच लाख 24 हजार जनावरांनी आसरा घेतला आहे, यावर प्रचाराच्या रणधुमाळीत कुणीही अवाक्षर काढायला तयार नाही.”
 
“विनोद साळवी, मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content