HomeArchiveडीपॉल युनिव्हर्सिटीचे भारतीय...

डीपॉल युनिव्हर्सिटीचे भारतीय विद्यार्थ्यांना आमंत्रण

Details

 
 
“केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
प्रतिष्ठीत आणि अभ्यासक्रमात काटेकोर तसेच ‘सर्वसमावेशकता, व्यक्तिमत्त्व आणि व्यावसायिकता’ यावर लक्ष केंद्रित असलेल्या डीपॉल युनिव्हर्सिटीने ऑटम क्वार्टर २०२०साठी व्हर्चुअल शैक्षणिक अभ्यासक्रमाची सुविधा उपलब्ध केली आहे. हे अभ्यासक्रम विशेषत्वाने भारतीय पदवीधर आणि पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहेत. स्टडी ग्रुप, या अग्रगण्य जागतिक शिक्षण प्रदात्याशी भागीदारी करत विद्यापीठाने हे व्हर्चुअल अभ्यासक्रम ऑटम क्वार्टर २०२०साठी तयार केले आहेत. ग्लोबल गेटवे प्रोग्राम (जीजीपी)करिता अर्ज भरण्याची पदवीधरांसाठी शेवटची तारीख ४ ऑगस्ट २०२० असून पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी १० ऑगस्ट ही आहे.
 
या सुविधेचा एक भाग म्हणून डीपॉल युनिव्हर्सिटी ग्लोबल गेटवे प्रोग्राममध्ये, जे विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या पात्र आहेत, मात्र इंग्रजीतील कौशल्य वाढवायचे आहे, त्यांच्यासाठी शैक्षणिक आणि इंग्लिश लर्निंग अभ्यासक्रम या दोन्हींचे संयोजन देण्यात आले आहे. पदवीपूर्व आणि पदवीधर विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे, संवादात्मक आणि आकर्षक अभ्यासक्रम डी पॉल विभागप्रमुखांकडून जे कँपस कोर्सेसमध्ये शिकवले जाते, तसेच शिकवले जाईल.
 
स्टडी ग्रुपच्या मुख्य कार्यकारी इमा लँकास्टर यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. त्या म्हणाल्या की, भारतातील बुद्धिवंत विद्यार्थ्यांना उच्च प्रतीच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण संधी देणाऱ्या डीपॉलसारख्या अग्रगण्य विद्यापीठासोबत काम करण्याचा आम्हाला अभिमान आहे. अनेक वर्षांपासून आम्ही पाहत आहोत की, त्यांच्या विद्यार्थ्यांची अभ्यासात भरभराट होते. विद्यापीठातील शिक्षक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तसेच त्यांना उत्तम करिअर मिळवून देण्यासाठी मदत करतात. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याचा आम्हाला जास्त अभिमान आहे. या प्रोग्रामद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्या विद्यार्थ्यांना स्वत:मध्ये तसेच समाजात सकारात्मक बदल घडवून आणायचा आहे, अशा विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या आमच्या निश्चयात अधिक भर टाकणार आहे. “

Continue reading

‘बीएमसी’त इतिहास घडविणाऱ्या ‘मेट्रो वुमन’!

बीएमसीच्या म्हणजेच मुंबई महापालिकेच्या १३८ वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात आजपर्यंत आयुक्तपदावर कधीही महिला बसली नव्हती. मात्र, ३१ मार्च २०२६ हा दिवस त्या इतिहासाला कलाटणी देणारा ठरला. महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बीएमसी आयुक्तपदी नियुक्ती जाहीर केली. या...

श्रद्धा और सबुरी! दिल्लीहून शिर्डीला निघालेल्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग!!

दिल्लीहून शिर्डीच्या दिशेने निघालेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला मंगळवारी खराब हवामानामुळे गुजरातमध्ये सूरत विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. विमानात १५०पेक्षा जास्त प्रवासी होते. शिर्डी विमानतळावर जोरदार वारे आणि अत्यंत कमी दृश्यमानता असल्याने लँडिंग अशक्य झाल्यावर पायलटने विमान सुमारे एक तास...

अश्विनी भिडे झाल्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त!

देशातील सर्वात मोठी आणि सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) आयुक्तपदी 'मेट्रो वुमन' म्हणून ओळख असलेल्या अश्विनी भिडे यांची नियुक्ती मंगळवारी जाहीर करण्यात आली. निवृत्त होत असलेले आयुक्त भूषण गागराणी यांच्याकडून भिडे यांनी पदभार स्वीकारला आहे....
Skip to content