HomeArchiveजोगेश्वरीच्या मेघवाडीत धारावीसारखा...

जोगेश्वरीच्या मेघवाडीत धारावीसारखा प्रकल्प राबवा – बाळा नर

Details
जोगेश्वरीच्या मेघवाडीत धारावीसारखा प्रकल्प राबवा – बाळा नर

    12-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 
मुंबईतील जोगेश्वरी पूर्व येथील मेघवाडीत गेल्या ४ सप्टेंबर रोजी पडलेल्या मुसळधार पावसात येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरून त्यांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाला सदर परिस्थिती वारंवार निदर्शनास आणून अजूनही याबाबत कारवाई होत नाही. जर येथे मोठी जीवित व वित्तीय हानी झाल्यास त्याची जबाबदारी शासन व पालिका घेणार का, शासनाच्या झोपडपट्टी निर्मूलनाचा उद्देश कसा साध्य होणार, असा सवाल शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अनंत (बाळा) नर यांनी केला आहे.
 
 
मौजे मजास येथे न.भू. क्रमांक ८१ ते १३२ या विभागात समाविष्ट भूभागांचे मापन करून येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्याची येथील नागरिकांची आग्रही मागणी असून गेली अनेक वर्षे आपण यासाठी पाठपुरावा व पत्रव्यवहार केला आहे. मात्र शासन व पालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप त्यांनी केला.
 
 
सदर भाग हा संपूर्ण आरक्षित व भारग्रस्त असून येथे झोपडपट्टी पुनर्विकास योजनेची नियमाप्रमाणे कार्यान्वित करणे अशक्य आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून सदर योजना राबवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जोगेश्वरीच्या मेघवाडीचा भूखंड संपादीत करून येथे धारावीसारखा महत्त्वाकांक्षी पायलट झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवावा अशी आग्रही मागणी एसआरएचे सीईओ दीपक कपूर यांच्याकडे केली आहे. त्यामुळे येथील आरक्षित भूखंडाचा विकास होऊन नागरिकांना सार्वजनिक सुविधादेखील मिळतील आणि येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना हक्काची घरे मिळतील असा विश्वास नर यांनी व्यक्त केला.”

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 
“मुंबईतील जोगेश्वरी पूर्व येथील मेघवाडीत गेल्या ४ सप्टेंबर रोजी पडलेल्या मुसळधार पावसात येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरून त्यांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाला सदर परिस्थिती वारंवार निदर्शनास आणून अजूनही याबाबत कारवाई होत नाही. जर येथे मोठी जीवित व वित्तीय हानी झाल्यास त्याची जबाबदारी शासन व पालिका घेणार का, शासनाच्या झोपडपट्टी निर्मूलनाचा उद्देश कसा साध्य होणार, असा सवाल शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अनंत (बाळा) नर यांनी केला आहे.”
 
 
“मौजे मजास येथे न.भू. क्रमांक ८१ ते १३२ या विभागात समाविष्ट भूभागांचे मापन करून येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्याची येथील नागरिकांची आग्रही मागणी असून गेली अनेक वर्षे आपण यासाठी पाठपुरावा व पत्रव्यवहार केला आहे. मात्र शासन व पालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप त्यांनी केला.”
 
 
सदर भाग हा संपूर्ण आरक्षित व भारग्रस्त असून येथे झोपडपट्टी पुनर्विकास योजनेची नियमाप्रमाणे कार्यान्वित करणे अशक्य आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून सदर योजना राबवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जोगेश्वरीच्या मेघवाडीचा भूखंड संपादीत करून येथे धारावीसारखा महत्त्वाकांक्षी पायलट झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवावा अशी आग्रही मागणी एसआरएचे सीईओ दीपक कपूर यांच्याकडे केली आहे. त्यामुळे येथील आरक्षित भूखंडाचा विकास होऊन नागरिकांना सार्वजनिक सुविधादेखील मिळतील आणि येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना हक्काची घरे मिळतील असा विश्वास नर यांनी व्यक्त केला.

Continue reading

आशाताईंवर आज संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भारतीय संगीतसृष्टीतील एका युगाचा रविवारी अंत झाला. दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण सन्मानाने गौरवलेल्या, जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे मुंबईत निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, बहुअवयव निकामी (मल्टी-ऑर्गन फेल्युअर) होऊन त्यांचे...

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...
Skip to content