Friday, October 18, 2024
HomeArchive‘जम्पस्टार्ट’: घरपोच वाहन...

‘जम्पस्टार्ट’: घरपोच वाहन दुरूस्ती सेवा सुरू

Details

 
केएचएल न्युज ब्युरो
hegdekiran17@gmail.com
 
“लॉकडाऊनमुळे बराच काळ वाहने एकाच जागेवर उभी आहेत. अशात डेड बॅटरी, इंधन पंप गळती, इग्निशन इश्यू, फअलॅट टायर्स आदी समस्या उद्भवू शकतात. लॉकडाऊन संपल्यावर आपले वाहन सुरू करताना अनेकांना अशा आव्हानांचा सामना कारवाया लागू शकतो. ही समस्या सोडवण्यासाठी भारतातील सर्वात मोठा आणि अग्रेसर ऑनलाइन ऑटोमोबाइल ट्रान्सपोर्ट मार्केटप्लेस असलेल्या ड्रूमने संपूर्ण भारतातील ग्राहकांसाठी जम्पस्टार्ट-ऑटोकेअर नावाची एक अनोखी घरपोच सेवा सुरू केली आहे.”
 
“या सेवेत टायर्सची देखभाल, महत्त्वाच्या भागांची तपासणी, ऑइल व लुब्रिकंट टॉप अपसह वाहनांच्या जम्पस्टार्टचा समावेश आहे. मुख्य जम्पस्टार्ट डिव्हाइस पॅकेजसह यूझर टोइंग, गॅस फिल, फ्लॅट टायरची दुरूस्ती, प्रेशर वॉटर क्लीनिंग आणि ऑइल, ल्यूब्रिकंट, कूलंट इत्यादीसाठी टॉप अप सेवांचा लाभ घेता येईल.”

 
“यूझर्सना वाहन, लोकेशन, मेन सर्व्हिस आणि या प्रक्रियेत कोणत्याही अॅड ऑन सेवांची निवड करता येऊ शकते. ते आपल्या सोयीनुसार, टाइम स्लॉट निवडू शकतात आणि पेमेंटची हमी देऊन नंतरही पेमेंट करू शकतात. त्यानंतर ड्रूम हे काम करण्यासाठी एक ‘इको-निंजा’ किंवा तंत्रज्ञ नियुक्त करते. हा तंत्रज्ञ सर्व्हिसिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित ग्राहकाला इको जम्प स्टार्ट रिपोर्ट देतो. ग्राहक ऐनवेळी तंत्रज्ञाला निश्चित केलेल्या पॅकेजमध्ये आणखी अतिरिक्त सेवा देण्यासही सांगू शकतो.”
 
“ड्रूमचे संस्थापक आणि सीईओ संदीप अग्रवाल म्हणाले की, ‘लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याच्या पार्श्वभूमीवर एका अंदाजानुसार, भारतात सुमारे ५ ते २५ दशलक्ष वाहने सुरू होण्यास किंवा जागेवरून हलण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. या सुविधेचा फायदा ग्राहकांना आपली वाहने सुरू करताना होऊ शकतो. आमच्या ग्राहकांची अधिक चांगल्याप्रकारे सेवा करण्यासाठी मार्च महिन्यात आम्ही जर्म शील्ड लाँच केले. तसेच येत्या काळात अशाचप्रकारे अनोखी सेवा देणार आहोत.”
 
 

Continue reading

यंदाची विधानसभा निवडणूक बिनचेहऱ्याची!

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि सर्वच राजकीय पक्षांमध्ये लगीनघाई सुरू झाली. राज्यातल्या सत्तारूढ महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. मंगळवारी होणारी ही पत्रकार परिषद देशाच्या मुख्य निवडणूक...

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे सत्र सुरूच!

उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली. त्यात सर्फराज आणि तालीब, हे दोन आरोपी जखमी झाल्याचे समजते. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशात...

प्रेम, नुकसान आणि उपचार म्हणजेच जिंदगीनामा!

जिंदगीनामा, सोनी लिव्हवरील सहा भागांचा काव्यसंग्रह, शक्तिशाली कथनातून मानसिक आरोग्याच्या गुंतागुंतीचा शोध घेतो, ज्यातील प्रत्येक अद्वितीय आव्हाने हाताळते. मालिका सहानुभूती वाढवण्याचा आणि अनेकदा न बोललेल्या विषयांबद्दल संभाषण वाढवण्याचा प्रयत्न करते. प्रिया बापटसाठी, हा प्रकल्प फक्त दुसऱ्या भूमिकेपेक्षा अधिक होता–...
Skip to content