Details
केएचएल न्यूज ब्युरो
hegdekiran17@gmail.com
“यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सर्वसामान्यांना आर्थिक स्वातंत्र्य देण्याच्या उद्देशाने पेनीअरबाय, या भारताच्या सर्वात मोठ्या ‘हायपरलोकल फिनटेक स्टार्टअप’ कंपनीने बँकिंग क्षेत्रातील योजना तळागाळातील जनतेपर्यंत नेण्यासाठी एक मॉड्यूल सादर केले आहे. निवेश (बचत), उधार (कर्ज), सुरक्षा (विमा) आणि पेमेंट या सेवा देणारे हे मॉड्यूल ‘पेनीअरबाय’शी संलग्न दुकानांमध्ये उपलब्ध असेल. यामधून ग्राहकांना हव्या त्या योजना मिळू शकतील. सामान्यजनांना आर्थिक व्यवस्थेत समाविष्ट होण्याची खऱ्या अर्थाने संधी मिळावी, असा यामागे उद्देश आहे. आपल्या या नव्या सर्वसमावेशक मंचाद्वारे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत बॅंकिंगमधील आधुनिक सुविधा नेण्याचे व त्याकरीता आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचे ‘पेनीअरबाय’चे उद्दिष्ट आहे.”
“भारतातील 80 टक्के लोकसंख्येकडे बॅंकांची खाती असायला हवीत, या हेतूने सरकारने जनधन योजना (पीएमजेडीवाय) राबवली, तथापि त्यातील 48 टक्क्यांहून अधिक खाती कोणतेही व्यवहार न झाल्याने गेल्या वर्षभरासून निष्क्रीय आहेत, असे दिसून आले आहे. तसेच, केवळ 13 टक्के भारतीय नागरिक कर्ज काढण्यासाठी औपचारिक बॅंकिंग व्यवस्था वापरतात, असा ‘भारतीय नाणेनिधी’चा अहवाल आहे. उर्वरीत नागरिक त्यांच्या स्थानिक सावकारांसारख्या पर्यायी पद्धतींवर अवलंबून असतात. हे सावकार भरमसाठ व्याज आकारतात आणि त्यामुळे हे नागरिक अपरिहार्यपणे दारिद्र्याच्या चक्रात अडकतात. याशिवाय, अनियमित कमाई आणि विम्याचे जास्त रकमेचे प्रीमियम यांमुळे केवळ 3 टक्के भारतीय नागरिक विमा खरेदी करतात. इतरांना विम्याचे संरक्षण मिळत नाही, असेही दिसून आले आहे.”
“‘पेनीअरबाय’ने यासंदर्भात यंदा एक स्वतंत्र अभ्यास केला. या ‘इंडिया सेव्हिंग रिपोर्ट’नुसार, कमी उत्पन्न गटातील 60 टक्के जनतेला औपचारिक बचत क्षेत्रात प्रवेशच मिळत नाही, त्यामुळे ती ‘चिट फंडा’द्वारे बचत करू पाहते किंवा मग घरातच गादीखाली पैसे साठवत राहते. भारतासारख्या विविधांगी देशात आज्ञथिक व्यवस्थेमध्ये नागरिकांचा संपूर्ण समावेश व्हावा, यासाठी लोकसंख्येच्या वेगवेगळ्या घटकांना त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार वैविध्यपूर्ण सेवा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. आर्थिक साक्षरतेचा अभाव असल्यामुळे अनेक नागरिक अर्ज भरण्यास, कागदपत्रे तयार करण्यास कचरतात. तसेच काही वित्तीय स्वरूपाची कामे करायची असली, तर त्यांना लांबचा प्रवास करावा लागतो व त्यामुळे त्यांना दिवसभराच्या मजुरीवर पाणी सोडावे लागते. अशाप्रकारे, या जनतेला जुन्यापुराण्या, अनौपचारिक यंत्रणांवर अवलंबून राहण्यास भाग पाडले जाते. ही यंत्रणा बहुतांशी अपुरी, अविश्वसनीय आणि महाग असते. यातच जेव्हा अज्ञान आणि खर्चिक व्यवहार यांची भर पडते, तेव्हा तारण ठेवण्यासाठी कोणतीही मालमत्ता नसलेले व पतपुरवठ्याचा इतिहास नसलेले गरीब लोक आर्थिक दुष्टचक्रात अडकतात व त्यातून त्यांची सुटका होत नाही.”
“आपले आरोग्य आणि आर्थिक पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, ही जाणीव लोकांमध्ये ‘कोविड’नंतरच्या जगात अधिक स्पष्ट झाली आहे. जीवनात अनपेक्षित घटना घडतात, त्यावेळी सुरक्षिततेच्या सुविधा हाताशी असाव्या लागतात. पैसे जमवणे, संरक्षणासाठी विम्याचे योग्य कवच घेणे आणि आवश्यकतेच्या क्षणी कर्जसुविधा मिळवणे या सुविधा आणि त्यांविषयीची जागरुकता यांचे भान सर्व स्तरांतील नागरिकांना असणे आवश्यक आहे. निवेश (बचत) उधार (कर्ज), सुरक्षा (विमा) आणि देय (पेमेंट) यांच्या ‘पेनीअरबाय’ने सादर केलेल्या सर्वसमावेशक मॉड्यूलमधून या सर्व गरजा उच्च तंत्रज्ञानाच्या मदतीने एकाच प्लॅटफॉर्ममध्ये पूर्ण होतात. त्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविल्या जाणार आहेत.”
“देशात सर्वदूर विम्याचा प्रसार व्हावा व किरकोळ विक्रेत्यांच्या मोठ्या नेटवर्कमधून वैयक्तिकृत स्वरूपाच्या विमा योजना प्रत्येकाला पुरविता याव्या, असा यातील विमा मॉड्यूलचा उद्देश आहे. या किरकोळ विक्रेत्यांना त्यांच्या आसपासच्या समुदायांकडून प्राप्त झालेल्या विश्वास व आत्मीयता यांच्या बळावर हे मॉड्यूल साध्य होऊ शकते. यापूर्वी कधीही विमा विकला नाही अशा किरकोळ विक्रेत्यांना प्रशिक्षण देऊन, ज्यांनी विमा कधीही घेतलेला नाही अशांना तो वितरीत करण्याचे शिक्षण दिले जाईल. यातून दोन्ही घटकांच्या सबलीकरणास प्रोत्साहन मिळेल. तसेच विम्याची खरी गरज असणाऱ्यांना त्या योजना मिळतील आणि कमी-उत्पन्न गटातील नागरिकांची असुरक्षितता कमी होईल. त्याचप्रमाणे कमी-उत्पन्न गटातील लोकांना बचतीची सवय लावण्याच्या उद्देशाने बचत मॉड्यूलची आखणी करण्यात आली आहे. बचत करण्यासाठी योग्य सोय नसणे, वित्तीय सुविधा उपलब्ध न होणे आणि तंत्रज्ञानातील जटीलता या कारणांमुळे हे नागरिक सहसा औपचारिक स्वरूपाची बचत करणे टाळतात. अनपेक्षितपणे आलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सुरक्षितता निर्माण करण्यास या नागरिकांना तयार करणे आणि बचतीच्या योजना सुलभ करून, त्या कोणालाही मिळू शकतील अशी यंत्रणा उभारून या नागरिकांचे जीवनातील लक्ष्य पूर्ण करण्यासाठी त्यांना बचतीची सवय लावणे, हे ‘पेनीअरबाय’चे उद्दिष्ट आहे.”
“बॅंकिंग सुविधांचा लाभ कधीही न घेतलेल्या आणि मुख्य आर्थिक व्यवस्थेतून दूर गेलेल्या लाखो भारतीयांना फायदा करून देण्याच्या उद्देशाने, ‘पेनीअरबाय’च्या कर्जपुरवठ्याच्या मॉड्यूलमध्ये ‘बिग डेटा’चे विश्लेषण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ‘प्रेडिक्टिव्ह टूल्स’ यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. ‘पेनीअरबाय’ने आतापर्यंत केलेल्या लाखो व्यवहारांमुळे तिच्याकडे प्रचंड डेटा उपलब्ध आहे. हा डेटा, कंपनीने केलेली भागीदारी आणि कंपनीचे वितरकांचे मोठे जाळे यांच्या माध्यमातून वंचित घटकांची प्रगती व गरजा यांसाठी कर्जपुरवठ्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे ‘पेनीअरबाय’चे ध्येय आहे. कोरोनाच्या साथीमुळे स्पर्शरहीत पेमेंट करण्यास महत्त्व आले असल्याने या पद्धतीनेच पेमेंट करण्याच्या प्रचाराचे उद्दिष्ट ठेवून, ‘पेनीअरबाय’ने ‘पेमेंट मॉड्यूल’ तयार केले आहे. प्रत्यक्षपणे, हाताने पैशाची देवघेव करणे हे असुरक्षित, अकार्यक्षम व वेळखाऊ असले, तरी 78 टक्के लोकसंख्या अजूनही रोख व्यवहारांवरच अवलंबून राहत आहे. कंपनीची स्थानिक व्यवहारांची यंत्रणा आणि ‘डिजिटल प्रधान’ यांच्यामार्फत डिजिटल पेमेंटचे अत्याधुनिक तंत्रज्ञान सामान्य जनतेला समजेल अशा स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे ‘पेनीअरबाय’चे प्रयत्न आहेत.”
“आपली अर्थव्यवस्था विकसनशील स्वरूपाची आहे, परंतु जेव्हा आपण धोरणात्मकदृष्ट्या 5 लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करीत असतो, तेव्हा विमा, बचत, कर्जपुरवठा आणि डिजिटल पेमेंट या मूलभूत वित्तीय सेवांना अन्न, कपडे आणि निवारा यांसारखेच महत्त्व यायला हवे. या स्वातंत्र्यदिनी, आम्ही आपल्या देशातील जनतेला खऱ्या अर्थाने आर्थिक मुक्ती प्रदान करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. अर्थव्यवस्था पुनरूज्जीवित करण्यासाठी तिच्यात मागणी जोरकसपणे वाढायला हवी. अर्थात हे कर्जपुरवठा आणि बचत यांच्यावर अवलंबून असेल. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या ‘आर्थिक जीवनावश्यक बाबी’ आपल्या समाजरचनेच्या तळाशी असलेल्या जनतेपर्यंत घेऊन जाण्यानेच अर्थव्यवस्थेला उभारी येऊ शकेल. म्हणूनच, बॅंकिंगची सुविधा अजिबात न वापरणाऱ्या आणि अगदी कमी प्रमाणात वापरणाऱ्या लोकांना डिजिटल पटामध्ये समाविष्ट करून घेऊन एक मूर्त आर्थिक परिणाम घडविणे आवश्यक आहे. आमच्या नवीन एकत्रित मंचाच्या माध्यमातून आर्थिक जीवनावश्यक बाबी सर्वव्यापी बनविण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे. त्यायोगे जनतेला योग्य मार्गाने मदत करता येईल व आर्थिक यंत्रणेमध्ये तिचा समावेश करून घेता येईल. आपण शाखाविहीन बँकिंगमध्ये क्रांती घडवू शकतो आणि तळागाळातील माणसांचे आर्थिक सशक्तीकरण करू शकतो, याबाबत आम्हाला आत्मविश्वास आहे,’ असे ‘पेनीअरबाय’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आनंदकुमार बजाज यांनी म्हटले आहे.”

