Details
चौकीदार पुढे काय करणार आहे?
01-Jul-2019
”
अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
“चौकीदार चोर है!” या घोषणेला उत्तर म्हणून भारतीय जनता पक्षाने, “मै भी चौकीदार हूं!” या नव्या हॅशटॅग मोहिमेची सुरूवात केली आहे. रविशंकर प्रसाद केंद्र सरकारच्या आयटी विभागाचे मंत्री आहेत आणि सर्वोच्च न्यायालयात वकीलही आहेत. त्यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांत म्हणजे या मोहिमेची सुरूवात झाल्यापासून वीस लाख लोकांनी मै भी चौकीदार, या टॅगलाईनचा वापर आपापल्या ट्विटर हँडलमध्ये केला आहे आणि सोळाशे कोटी वेळा या घोषणेचा वापरही केला गेला आहे. अर्थातच याची मोजादद करणे हे आयटी खाते असल्यामुळे कदाचित प्रसाद यांना शक्य झाले असेल पण ते बाकी कुणालाही शक्य नाही. पण तरीही मोठ्या प्रमाणात या घोषणेचा प्रसार व प्रचार होतो आहे हे खरेच आहे.
“चहावाला पंतप्रधान” या मागच्या लोकसभा निवडणुकीतील गाजलेल्या व यशस्वी ठरलेल्या मोहिमेचाच नवा अवतार या चौकीदारामुळे भाजपाला सापडाला आहे का, हा खरा मुद्दा आहे. पण चहावाला आणि चौकीदार या दोन घटकांमध्ये मुळात मोठाच फरक आहे. २०१४ च्या निवडणुकीच्या प्रचाराच्या सुरूवातीलाच काँग्रेसचे एक ‘विद्वान’ नेते मणिशंकर अय्यर यांनी मोदींना चहावाला म्हणून हिणवले व भाजपाच्या हाती मोठेच कोलीत दिले. “मोदी निवडणूक हरणार आहेत. त्यांना आम्ही चहा विकण्याचेच काम नंतर देऊ!” अशा अर्थाचे लागट व कुजकट वक्तव्य तेव्हा अय्यरमहाशयांनी केले होते. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीवेळीच पत्रकारांशी बोलताना असले टोमणे अय्यर यांनी मारले. त्यामुळे ते मत काँग्रेसचे अधिकृत मत ठरले होते. तेच काँग्रेसचे प्रातिनिधिक मत आहे असे सांगणे त्यामुळेच भाजपाला सोपे गेले.
मोदींनी कोणे एकेकाळी, बालपणात, काकांच्या चहाच्या ठेल्यावर काही काळ काम केले होते. एका रेल्वेस्थानकावर प्रवाशांना ते चहा पोहोचवत होते असे सांगितले जाते. मुळात ते जेव्हा लहान होते तेव्हा, ते सांगतात त्या नावाचे रेल्वेस्टेशनच गुजरातमध्ये नव्हते, अशीही टीका नंतर काँग्रेसने केली होती. पण ती गैरलागू ठरली. कारण लोकांच्या मनात चहावाला मुलगा पुढे मोठा होऊन देशाचा पंतप्रधान बनतो ही गोष्ट छान रुजली होती. लोकांना ती संकल्पनाही आवडली होती. चहावाल्या पोऱ्यासाठी साधारणतः लोकांच्या मनात एक आपुलकी, एक सहानुभूती असते. धडपड करून स्वतःची प्रगती साधू पाहणरा एक मुलगा अशी प्रतिमा चहावाल्याची असते. त्या साऱ्याचा उपयोग भाजपाने छानप्रकारे २०१४ मध्ये करून घेतला. त्यांनी गावागावात आणि चौका-चौकात, चाय पे चर्चा, अशा कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यातून मोदींच्या प्रतिमेला मोठेच वलयही लाभले असेही म्हणता येईल. पण चौकीदार हा प्राणी तसा व तितका जनतेची सहानुभूती मिळवणारा नाही, हेही आपण लक्षात घेतले पाहिजे.
चौकीदार सध्या सोसायटीच्या गेटवर, मॉलच्या बाहेर, सिनेमा थिएटरच्या बाहेर मोठ्या हॉटेलांच्या दरवाजात उभे असलेले दिसतात. हा चौकीदार नेमका काय करतो? जेव्हा सोसायटीत चोरी होते, प्रसंग घडतो तेव्हा हा चौकीदार असतो कुठे, असाच प्रश्न सामान्य माणसांना पडतो! पूर्वी क्वचित ठिकाणी नेपाळी गुरखे असायचे. काही बड्या इमारतींमध्ये, बंगल्यांमध्ये ते दिसायचे. एरवी सर्वसाधारण घरांमध्ये चौकीदार वा गुरखा ठेवण्याची वेळ आलेली नव्हती. तशी ऐपतही कदाचित समाजात नव्हती. सर्वसाधरण समृद्धी वाढल्यानंतर चौकीदारांचे दर्शन सर्रास घडू लागले. नेमके सांगयचे झाले तर एटीएम आणि मॉलचे पेव १९९५-२००० सालानंतर देशात सर्वत्र फुटले. तेव्हापसून निळे वा काळे कडक कपडे घातलेले चौकीदार दिसू लागले. सध्या चौकीदारांची संख्या प्रचंड आहे. नेमके सांगायचे झाले तर देशातील सर्व लष्करी जवान, सर्व निमलष्करी दले आणि पोलिसांच्या एकत्रित संख्येपेक्षाही चौकीदारांची संख्या देशात अधिक आहे. चाळीस लाखांच्या घरात सुरक्षादलांचे जवान आहेत तर सुरक्षारक्षकांची संख्या सत्तर लाखांच्या आसपास आहे. इतक्या मोठ्या संख्येने आपल्याला आपल्याच देशवासियांची भीती वाटते हाही यातील आणखी एक मुद्दा आहे. तोही अर्थातच दुर्लक्षित करण्यासारखा नाही.
नव्या समृद्धीच्या संकल्पनेबरोबरच बेकारांचे तांडेही वाढू लागेल आहेत. आपल्या चकचकित इमारतींमध्ये मॉलमध्ये आणि काचेच्या तावदानांनी सजलेल्या कार्यालयीन इमारतींमध्ये बाहेरचे, अनाहूत लोक मोठ्या प्रमाणात येऊ नयेत, घुसू नयेत यासाठी दरवाजावर उभा केलेला हा चौकीदार खरेखरीच त्याच गरीब वर्गाचाच प्रतिनिधी आहे! सत्तर लाख चौकीदारांवर विविध कंपन्या या किमान दोन हजार कोटी रूपये जरी खर्च करत असल्या तरी त्या चौकीदाराच्या पदरात मात्र अतिशय तुटपुंजेच उत्पन्न पडत असते. तो बड्या मॉलचा वा बडया कंपनीचा थेट नोकर असत नाही. कर्मचाऱ्यांना जे भत्ते व भरभक्कम वेतन मिळत असते, तितके चौकीदाराला नक्कीच मिळत नाही. चौकीदाराची नेमणूकच मुळी एखाद्या तिसऱ्या एजन्सीने परभारे केलेली असते. या सुरक्षा एजन्सींना कंपन्यांकडून वा करखान्यांकडून, मॉलकडून भल्या मोठ्या रकमेचे चेक भलेही मिळत असले तरी दरवाजावर उभ्या असणाऱ्या चौकीदाराच्या पदरात मात्र अगदीच तुटपुंजे वेतन पडत असते. तो कदाचित अर्धपोटीच असतो.
गुरखा आणि चौकीदारात मूलभूत फरकही असतो. गुरखा हा नेपाळचा रहिवासी ज्या सोसयाटीच्या गेटवर उभा असतो तिथले लोक त्याला अधिक प्रेमाने आपुलकीने वागवत असतात. पण सुरक्षा एजन्सीकडून येणारा चौकीदार हा त्यांच्यासाठी एखाद्या पुतळ्यासारखा असतो. कारण तो आज तिथे असेल, उद्या त्याची एजन्सी त्या चौकीदाराला आणखी तिसरीकडे पाठवू शकेल अथवा कदाचित नोकरीवरूनही हाकलूही शकेल. अतिशय असुरक्षित व असंघटित असे चौकीदाराचे जीणे असते. भारतीय जनत पक्षाने आणि पंतप्रधान नेरंद्र मोदींनी चौकीदाराचे खरे हॅशटॅग करायचे तर त्याला सुरक्षितता कशी लाभेल, आर्थिक स्थैर्य कसे लाभेल याचाही विचार करायला हवा.
दुसरे चौकीदारानेच चोर पकडणे सुरू केले आहे असे भाजपा सांगत आहे. ते एका अर्थाने खरे जरी असले तरी त्यातही पुष्कळ काम करण्याची आवश्यकता आहे. हजारो कोटी रूपये बँकांचे लुबाडून परदेशात पळून गेलेल्या नीरव मोदी वा मेहूल चौक्सी वा विजय माल्याला अद्यापी आपण भारतात आणू शकलेलो नाही. त्यातील माल्या व मोदीला परत आणण्याची प्रक्रिया बरीच पुढे गेलेली आहे. निरव मोदीला तर लंडनमध्ये अटक झालेली आहे. माल्याला भारतील सुरक्षा यंत्रणांच्या हवाली करण्याची संमती इंग्लंडच्या न्यायालयांनी दिली आहे. अद्यापी काही टप्पे बाकी आहेत, अजुनही काही अडथळे आहेत. पण हे दोघे व चोक्सी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच कार्यकाळात भारतातून पळून जाऊ शकले हेही खरेच आहे. अशा चोरांना मुळात अटकाव करणारे नवे व कडक कायदे मोदींनी अलिकडे केले आहेत हे खरे आहे. त्याबाबतचे श्रेय त्यांना नक्कीच घेता येईल. पण आपली न्यायव्यवस्था अधिक गतिमान होण्यासाठी मोदी काय करणार आहेत, भाजपाकडे त्याबाबतची काही योजना, नियोजन आहे का हेही त्यांनी देशाला सांगण्याची गरज आहे. देशस्तरावर खालच्या न्यायालयांमध्ये अडीच कोटी खटले प्रलंबित आहेत. उच्च न्यायालयांमध्ये अडकलेल्या खटल्यांची संख्याही लाखांमध्ये आहे. सर्वोच्च न्यायालयातही चोपन्न हजार खटले निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. संयुक्त राष्ट्रांचे सांगणे असे आहे की दर दहा लाख लोकसंख्येमागे पन्नास न्यायाधीश असले पाहिजेत. आपल्याकडे हे प्रमाण अतिशय व्यस्त आहे. पाचपट कमी संख्येने आपल्याकडे न्यायाधीश, न्याय अधिकारी आहेत. त्यात कधी सुधारणा करणार? हे सारे करता आले, तर चौकीदाराची प्रतिमा आणखी उजळून निघेल.”
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी