HomeArchiveचार वर्षांचा मोहील...

चार वर्षांचा मोहील ठरला बुद्धिबळातला ‘यंगेस्ट किड’!

Details
चार वर्षांचा मोहील ठरला बुद्धिबळातला ‘यंगेस्ट किड’!

    04-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 
रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्ट आणि चेस फॉर ऑल यांच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ येथील रोटरी भवनच्या सभागृहात ‘पहिली बुद्धिबळ स्पर्धा’ अलीकडेच आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत ‘यंगेस्ट किड’ हा पुरस्कार चार वर्षांच्या मोहील अमेय चव्हाण याला देण्यात आला.
७, ९, ११, १४, १६ वर्षांखालील पाच गटांतील मुला-मुलींनी या स्पर्धेत भाग घेतला. सुमारे १२० स्पर्धक यात सहभागी झाले होते. चेस फॉर ऑल, या संस्थेचे प्रमुख बुद्धिबळ प्रशिक्षक आणि जागतिक बुद्धिबळ फेडरेशनचे (FIDE) मानांकन असणारे अमेय चव्हाण यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडलेल्या या स्पर्धेत कर्करोगावर मात करणाऱ्या आणि रशिया येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बदलापूर येथील बुद्धिबळपटू प्रीती नाग हिचा यात सहभागी झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
आरव गायकवाड, कौस्तुभ जरे, चिरायू नामदेव, शौर्य सोनकर, वेदांत पाटील, अथर्व सुंबेरे, इशांत सुर्वे, तपस्या सोनार, गौरव पवार, सुशांत रघुवंशी, सोहन रघुवंशी, सोहेल काद्री, सोहम वेर्णेकर हे विविध प्रकारच्या गटांमध्ये पारितोषिकांचे मानकरी ठरले. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट चीफ कोऑर्डिनेटर रो. सुरेश रूपचंदानी, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी ललित माणिक, चंदीबाई हिंमतमल मनसुखानी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक भगवान चक्रदेव यावेळी उपस्थित होते.”

 

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 
रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्ट आणि चेस फॉर ऑल यांच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ येथील रोटरी भवनच्या सभागृहात ‘पहिली बुद्धिबळ स्पर्धा’ अलीकडेच आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत ‘यंगेस्ट किड’ हा पुरस्कार चार वर्षांच्या मोहील अमेय चव्हाण याला देण्यात आला.

“७, ९, ११, १४, १६ वर्षांखालील पाच गटांतील मुला-मुलींनी या स्पर्धेत भाग घेतला. सुमारे १२० स्पर्धक यात सहभागी झाले होते. चेस फॉर ऑल, या संस्थेचे प्रमुख बुद्धिबळ प्रशिक्षक आणि जागतिक बुद्धिबळ फेडरेशनचे (FIDE) मानांकन असणारे अमेय चव्हाण यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडलेल्या या स्पर्धेत कर्करोगावर मात करणाऱ्या आणि रशिया येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बदलापूर येथील बुद्धिबळपटू प्रीती नाग हिचा यात सहभागी झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.”

“आरव गायकवाड, कौस्तुभ जरे, चिरायू नामदेव, शौर्य सोनकर, वेदांत पाटील, अथर्व सुंबेरे, इशांत सुर्वे, तपस्या सोनार, गौरव पवार, सुशांत रघुवंशी, सोहन रघुवंशी, सोहेल काद्री, सोहम वेर्णेकर हे विविध प्रकारच्या गटांमध्ये पारितोषिकांचे मानकरी ठरले. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट चीफ कोऑर्डिनेटर रो. सुरेश रूपचंदानी, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी ललित माणिक, चंदीबाई हिंमतमल मनसुखानी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक भगवान चक्रदेव यावेळी उपस्थित होते.”

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content