HomeArchiveचळवळीतला झुंजार शिलेदार...

चळवळीतला झुंजार शिलेदार : हरिभाऊ राठोड!

Details
चळवळीतला झुंजार शिलेदार : हरिभाऊ राठोड!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

एकनाथ पवार, नागपूर
[email protected]
शाहू, फुले, आंबेडकर, नाईकांचे, तुकडोजी-गाडगेबाबाचे एक पुरोगामी राज्य. समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे भारतीय संविधानाचे मूल्ये प्रामुख्याने इतर राज्याच्या तुलनेत सक्षमपणे महाराष्ट्रात भक्कम रुजलीत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे राज्यात झालेली पुरोगामित्वाची भक्कम पायाभरणी होय. या पुरोगामित्वाच्या पावनभूमीत अनेक कर्तृत्त्वान महापुरुषं झालीत. त्यांच्या कर्तृत्त्वाच्या, विचाराच्या बळावरच सामाजिक परिवर्तनाची, मानवी उत्थानाची, वंचितांच्या न्यायहक्काची चळवळ जिवंत राहिली. हाच वारसा अबाधित राहवा, ओबीसी वंचित बहुजनांना खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय मिळावा म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून जीवाचे रान करीत असलेले चळवळीतील एक झुंजार शिलेदार म्हणजे हरिभाऊ राठोड होय.

बघता–बघता आयुष्याची ६५ वर्षं झालीत. ४ फेब्रुवारी १९५४ रोजी यवतमाळच्या वागदा (ता. केळापूर)सारख्या दुर्गम भागातील एका सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. संवेदनशील आणि तितकेच अभ्यासू, अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारा असे हे सामान्याभिमुख व्यक्तिमत्व. सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक संवेदना विद्यार्थी दशेतूनच त्यांच्या अंगी भिनलेली होती. जातीपातीचे, भेदभावाची विषारी लागण आजच्या काळापेक्षा त्यावेळी ग्रामीण भागात तीव्रतेने पाहयला मिळत होती. हरिभाऊ राठोड युवावस्थेत असताना त्यांनी दलितांसाठी सामुहिकपणे एक विहीर खोदून आपल्या सामाजिक संवेदनाचा जणू परिचय दिला होता. दुष्काळस्थिती, त्यात दलितांना इतर बांधव गावातील विहिरीवर पाणी भरण्यास मज्जाव करायचे, ही बाब पुरोगामी मनाला खटकणारी होती म्हणून त्यांनी युवकांना गोळा करून सामुहिकपणे एक विहीर खोदली होती. ही बाब तत्कालीन मंत्री व लोकनेते वसंतराव नाईक यांना माहित होताच त्यांनी हरिभाऊंचा सत्कारदेखील केला होता. पुरोगामित्वाची बीजे जणू त्यांच्या नसातच भिनलेली असे म्हणावे लागेल.

जातीपातीच्या सांप्रदायिकतेच्या विषवल्लीने बरबटलेल्या आणि विचार खुन्त्लेल्या मानवी पडीक जमिनीत मानवी उत्थानाची आणि लोकशाही संविधानिक मूल्याची पेरणी करणे हे वाटते तितके सोपे काम नाही. कारण त्यासाठी लागणारी सामाजिक समर्पणाची भूमिका, सचोटी, धोरणात्मक अभ्यास, ग्रामीण वंचित उपेक्षित विषयीची कणव आणि लोकशाही मूल्यांवरील निष्ठा या बाबीने मानवी मनाची आणि सामाजिक जाणीवाची मशागत होणे गरजेचे असते. हरिभाऊ राठोड ज्या समाजात जन्मास आले आणि ज्या चळवळीत आज ते खंबीरपणे सक्रीय आहेत तो समाज आहे वंचित आणि मागास. राज्यात सर्वाधिक लोकसंख्या ओबीसी समाजाची आहे. परंतु ओबीसीला खंबीर आणि दीर्घलक्ष्यी नेतृत्त्व मिळाले नाही. ओबीसीमधील आजही अनेक जातीसमूह सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. विकासापासून वंचित आहे. राज्यात ओबीसी आरक्षणावरून हरिभाऊ राठोड यांनी पुकारलेला ओबीसीचा एल्गार व संघटन अतिशय चर्चेचे व स्तुत्यदेखील ठरले. ओबीसीला राज्यात हरिभाऊंच्या रूपाने एक नवे नेतृत्त्व मिळाले. रखरखत्या उन्हात त्यांनी काढलेली संघर्ष यात्रा व ओबीसी एल्गार यात्रेतील त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका ही ओबीसी चळवळीला जीवंत व गतिशील करणारी ठरली हे मात्र तेवढेच वास्तव आहे.

राजकारणापेक्षा समाजकारण हाच हरिभाऊ राठोड यांचा मूळ पिंड. सन १९९५ मध्ये त्यांनी आपल्या नोकरीचा त्याग केला. तेव्हापासून आजवरची त्यांची सामाजिक बांधिलकी अबाधित आहे. सन २००४ मध्ये यवतमाळ लोकसभा मतदारसंघात मोठ्या संख्येने ते निवडून आले. आज राज्यात ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. शेतकरी वंचित घटकासाठी सातत्याने विधिमंडळात आवाज उठविताना पाहयला मिळतात. न्यायवंचितांना न्याय मिळावा, दबलेल्या घटकाचे आवाज शासनापर्यंत पोहोचावे, शिवाय सामाजिक आंदोलनाची धग तांडा-वाडी-वस्त्यांपर्यंत जावी यासाठी आझाद मैदान, मुंबई येथे ५ जानेवारी १९९५ पासून सुरू केलेला मोर्चा आजतागायत अखंडितपणे सुरू ठेवला आहे हे विशेष. सामाजिक कार्याच्या गौरवार्थ महाराष्ट्र शासनाने वसंतराव नाईक समाजभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे.

प्रमोशनातला आरक्षणाचा प्रश्न, ओबीसीची जातीनिहाय जनगणना, आजही प्रवाहाबाहेर असलेल्या न्यायवंचित विमुक्त आणि भटक्या समाजाचे प्रश्न असोत अथवा जेव्हा-जेव्हा वंचित मागासवर्गीय घटकावर अन्याय होत असल्याचे निदर्शनास आले की त्याविरोधात पहिले आवाज उठविणारे प्रखर आणि झुंजार शिलेदार म्हणून आजवर हरिभाऊ राठोड पाहयला मिळाले. वंचिताप्रती असणारी त्यांची आंतरिकता खूप काही सांगणारी आहे. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन काम करणारा, शाहू, फुले, बाबासाहेबांचे आणि नाईकांची सर्वसमावेशक विचारधारा अंगी बाळगून असलेली त्यांची वाटचालही तशी खडतर. सामाजिक न्यायाच्या ध्यासाने कार्यप्रवण असलेले ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांचा संघर्ष सामाजिक चळवळीला भक्कम करण्यासाठी पथदर्शी ठरणारा आहे. वयाच्या ६५ वर्षांच्या उंबरठ्यावर असतानाही चळवळीसाठी आपल्या प्रकृतीपेक्षा व कुटुंबापेक्षाही खर्च करीत असलेली त्यांची ऊर्जा प्रेरक ठरेल यात शंका नाही. ओबीसी, वंचित बहुजन चळवळीच्या या झुंजार शिलेदाराला दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!”
 
“एकनाथ पवार, नागपूर

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content