HomeArchiveचक दे इंडिया!

चक दे इंडिया!

Details
चक दे इंडिया!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
`चक दे इंडिया’ हे पंजाबी भाषेतील वाक्य आहे. या वाक्याचा स्वैर अनुवाद असा की `विजयासाठी लढा’. आज इंगल्डच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे भारत विरूद्ध न्यूझीलंड असा सध्याच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतला पहिला उपांत्य फेरीतील सामना होणार आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी सज्ज आहेत. 1976 साली विश्वचषकाचा पहिला सामना भारतीय संघ खेळला तो इंग्लंडविरूद्ध. त्यावेळी 60 षटकांचा डाव असायचा. भारताचा सलामीचा फलंदाज सुनील गावसकर हा पहिल्या सामन्यात सलामीला आला आणि 60 षटके होईपर्यंत तो नाबाद राहिला. पण त्याने धावा किती केल्या? नाबाद 36!

आज या गोष्टीवर कोणाचा विश्वास बसणार नाही. कारण गेल्या चार दशकांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. बचावात्मक खेळणारा, वेगवान गोलंदाजांपुढे कोसळणारा आणि फक्त फिरकीवर भिस्त असणारा भारतीय संघ पूर्णपणे बदलला आहे. तो जबरदस्त आक्रमक झाला आहे. आता रोहित शर्माचेच उदाहरण पाहा. रोहितने या स्पर्धेत पाच शतके ठोकीत आठ डावांत 647 धावा फटकावल्या आहेत. कर्णधार विराट कोहलीने पाच अर्धशतके ठोकली आहेत. मुळात आक्रमक असलेला विराट हा रोहितच्या खेळीने कमालीचा आनंदी दिसतो आहे. विराटवरील भार रोहितने हलका केला आहे. डावाच्या मध्यावर खेळावयास आल्यानंतर फलंदाजाची जबाबदारी अधिक वाढलेली असते. संघाची परिस्थिती काय आहे हे पाहून खेळावे लागते. भारतीय फलंदाज आपली जबाबदारी चांगली जाणतात.

आजच्या सामन्यात रोहित न्यूझीलंडच्या विरोधात मैदानात उतरेल तेव्हा त्याने लागोपाठ तीन शतके ठोकली असून त्याच्या गाठिशी के. एल. राहुल याच्यासह 180 हून अधिक धावांची भागीदारी केल्याचे दोन डाव जमा आहेत, हे न्यूझीलंडला विसरून चालणार नाही. रोहित शर्माची फलंदाजी सुसाट वेगात चालली आहे. त्याने आणखी दोन शतके ठोकून स्पर्धेत नवा विक्रम करावा ही प्रत्येक भारतीयाची सदिच्छा आहे. एकदिवसीय सामन्यातील तो जगातील आजचा टॉपचा फलंदाज आहे.

इंग्लंड ही क्रिकेटची पंढरी असल्यामुळे येथे क्रिकेट रसिकांचा सदैव जोरदार प्रतिसाद लाभतो. क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने सामन्यांना उपस्थित राहतात. विशेषत: भारताचा सामना असला की, तिरंगे फडकवीत भारतीय क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. आजदेखील तेच चित्र दिसेल यात शंका नाही. विश्वचषक म्हणजे विविध क्रिकेट संघांची मोठी परीक्षा असते. भारताने यापूर्वी 1983 आणि 2011 मध्ये विश्वचषक जिंकला आहे. त्या दोन संघांच्या तुलनेत यावेळचा भारतीय संघ फारच बलाढ्य आहे. पण इंग्रजीत एक म्हण आहे : ‘Cricket is the game of uncertainty’. मैदानात कधी काय होईल ते सांगता येत नाही. 1983 साली क्लाइव्ह लॉइडच्या बलाढ्य वेस्ट इंडीज संघाच्या तुलनेत कपिल देवचा भारतीय संघ कस्पटासमान होता. पण या संघाने वेस्ट इंडीजला धूळ चारली. ते सुवर्ण क्षण आजदेखील नजरेसमोरून हलता हलत नाहीत. आजच्या सामन्यातील भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही अनुभवी संघ आहेत. भारत सातवेळा तर न्यूझीलंड आठवेळा उपांत्य फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे आजचा सामना हा दोन्ही संघांसाठी `करो या मरो’ अशा प्रकारात मोडणारा आहे. क्रिकेटवर आणि भारतावर प्रेम करणारा एक भारतीय नागरीक म्हणून आजच्या सामन्यानिमित्त आम्ही म्हणतो, `चक दे इंडिया’!”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content