HomeArchiveगोरक्षकर जीवन गौरव...

गोरक्षकर जीवन गौरव पुरस्कार योजना जाहीर

Details
गोरक्षकर जीवन गौरव पुरस्कार योजना जाहीर

    21-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 
पद्मश्री सदाशिव गोरक्षकर यांनी भारतीय संग्रहालय क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीस अभिवादन म्हणून ‘पद्मश्री सदाशिव गोरक्षकर जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज दिली.
 
 
याबरोबरच ताम्रपाषाणयुगीन संस्कृतींच्या अभ्यासाबरोबर ऐतिहासिक पुरातत्वीय स्थळांच्या उत्खननांचे मूल्यमापन या क्षेत्रात पद्मश्री मधुकर केशव ढवळीकर यांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल ‘पद्मश्री मधुकर ढवळीकर शिष्यवृत्ती योजना’ जाहीर केल्याचेही तावडे यांनी सांगितले. सन २०२० पासून एक वर्ष ज्येष्ठ संशोधकास ¨पद्मश्री सदाशिव गोरक्षकर जीवनगौरव पुरस्कार तर पुढील वर्षी पुरातत्व, संग्रहालय शास्त्र, संवर्धन, मूर्तीविज्ञान आदी विषयांमध्ये डॉक्टरेट करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांस ¨पद्मश्री मधूकर ढवळीकर शिष्यवृत्ती याक्रमाने ही योजना राबविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
तावडे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीच्या शिफारसीनुसार संग्रहालय शास्त्र, पुरातत्व, वारसा संवर्धन, प्राचीन स्थापत्य व भारतीय मूर्तीविज्ञान शास्त्र या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ संशोधकास ¨पद्मश्री सदाशिव गोरक्षकर पुरस्कार प्रदान केला जाईल. या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम रू. ५ लक्ष असे आहे. तर संग्रहालय शास्त्र, पुरातत्व, वारसा संवर्धन, प्राचीन स्थापत्य व भारतीय मूर्तीविज्ञान शास्त्र या क्षेत्रात डॉक्टरेटसारखा प्रगत अभ्यासक्रम/संशोधन करणाऱ्या दोन गुणवंत विद्यार्थ्यांना पद्मश्री मधुकर ढवळीकर शिष्यवृत्ती दिली जाईल. सदर शिष्यवृत्तीची रक्कम प्रत्येकी रूपये २.५० लक्ष इतकी असेल, असेही तावडे यांनी सांगितले.
 
 
पद्मश्री सदाशिव गोरक्षकर यांचे वारसा जतन, पुरातत्त्व शास्त्र आणि वस्तुसंग्रहालय शास्त्र या क्षेत्रांमध्यील योगदान अतिशय मोलाचे आहे. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित गोरक्षकर यांनी पुर्वाश्रमीचे प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय आणि आताचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, औंध जि. सातारा येथे संचालक म्हणून काम पाहिले. ते संग्रहालय व्यवस्थापन, पुरातत्व, वारसा, संरक्षण, कला, वास्तुविद्या आणि प्राणीशास्त्र या विषयांचे तज्ज्ञ होते. त्यांना भारतातील संग्रहालय शास्त्राचे भीष्म पितामह असेही संबोधले जाते.
 
 
पद्मश्री सदाशिव गोरक्षकर यांनी लिहिलेल्या राजभवन्स इन महाराष्ट्र, अनिमल्स इन इंडियन आर्ट, कालिदास अँड द महायोगी ऑफ घारापुरी आणि द मेरीटाईम हेरिटेज ऑफ इंडिया, डॉन ऑफ सिव्हिलायझेशन इन महाराष्ट्र अशा अनेक पुस्तकांमधून त्यांच्या ज्ञानाची अफाट कक्षा दिसून येते.
 
 
पद्मश्री सदाशिव गोरक्षकर यांनी आपल्या कारकिर्दीत संग्रहालय व्यवस्थापन शास्त्राची नवी परिमाणे परिभाषित केली. तसेच विविध कार्यक्रम, उपक्रम आणि प्रदर्शने आयोजित करून छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांना संग्रहालय शास्त्र या विषयातील कामगिरीसाठी सन २००३ साली भारत सरकारचा मानाचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरातत्ववेत्ता, कलासमीक्षक आणि संग्रहालयशास्त्र तज्ज्ञ अशा विविध भूमिका गोरक्षकर यांनी पार पाडल्या. 
 
 

 
 
ताम्रपाषाणयुगीन संस्कृतींच्या अभ्यासाबरोबर ऐतिहासिक पुरातत्वीय स्थळांच्या उत्खननांचे मूल्यमापन या क्षेत्रात पद्मश्री मधुकर केशव ढवळीकर यांचे भरीव योगदान आहे. सुरूवातीला भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, भारत सरकारच्या सेवेत असणाऱ्या पद्मश्री ढवळीकर यांनी डेक्कन कॉलेज, अभिमत विद्यापीठ, पुणे या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम केले. आपल्या कार्यकाळात त्यांनी कयाथा, सोमनाथ, इनामगाव, पौनार, कंधार, आपेगाव येथे उत्खनन केले. महाराष्ट्रातील ताम्रप्राषण युगात शेतीबद्दल असलेली माहिती इनामगाव येथे केलेल्या उत्खननातून ढवळीकर यांनी प्रकाशात आणली.
 
 
हिस्टॉरिकल ऑर्किओलॉजी ऑफ इंडिया, इंडियन प्रोटोहिस्ट्ररी, एक्सवेशन ॲट कयाथा, हिनयान केव्हज ऑफ वेस्टर्न इंडिया, फर्स्ट फार्मर ऑफ डेक्कन, इंडस सिव्हिलायझेशन इन वेस्टर्न इंडिया या पद्मश्री ढवळीकर यांच्या प्रकाशित झालेल्या पुस्तकांमधून त्यांच्या ज्ञानाची प्रगल्भता लक्षात येते. उत्खनन-गवेषन पुरातत्त्वशास्त्र, नाणकशास्त्र, मूर्तीशास्त्र या क्षेत्रांमध्ये त्यांनी भरीव योगदान देऊन अपरिचित इतिहास प्रकाशात आणला. पद्मश्री ढवळीकर यांना रॉयल एशियाटिक सोसायटीच्या बॉम्बे शाखेची फेलोशिप (२०१०) आणि त्याच वर्षी भारत सरकारच्या पहिल्या टागोर नॅशनल फेलोशिपने त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेत २०११ यावर्षी भारत सरकारने मानाचा असा पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.”

 

 

केएचएल न्यूज ब्युरो
 
 

पद्मश्री सदाशिव गोरक्षकर यांनी भारतीय संग्रहालय क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीस अभिवादन म्हणून ‘पद्मश्री सदाशिव गोरक्षकर जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज दिली.
 
 
“याबरोबरच ताम्रपाषाणयुगीन संस्कृतींच्या अभ्यासाबरोबर ऐतिहासिक पुरातत्वीय स्थळांच्या उत्खननांचे मूल्यमापन या क्षेत्रात पद्मश्री मधुकर केशव ढवळीकर यांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल ‘पद्मश्री मधुकर ढवळीकर शिष्यवृत्ती योजना’ जाहीर केल्याचेही तावडे यांनी सांगितले. सन २०२० पासून एक वर्ष ज्येष्ठ संशोधकास ¨पद्मश्री सदाशिव गोरक्षकर जीवनगौरव पुरस्कार तर पुढील वर्षी पुरातत्व, संग्रहालय शास्त्र, संवर्धन, मूर्तीविज्ञान आदी विषयांमध्ये डॉक्टरेट करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांस ¨पद्मश्री मधूकर ढवळीकर शिष्यवृत्ती याक्रमाने ही योजना राबविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.”
 
 

“तावडे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीच्या शिफारसीनुसार संग्रहालय शास्त्र, पुरातत्व, वारसा संवर्धन, प्राचीन स्थापत्य व भारतीय मूर्तीविज्ञान शास्त्र या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ संशोधकास ¨पद्मश्री सदाशिव गोरक्षकर पुरस्कार प्रदान केला जाईल. या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम रू. ५ लक्ष असे आहे. तर संग्रहालय शास्त्र, पुरातत्व, वारसा संवर्धन, प्राचीन स्थापत्य व भारतीय मूर्तीविज्ञान शास्त्र या क्षेत्रात डॉक्टरेटसारखा प्रगत अभ्यासक्रम/संशोधन करणाऱ्या दोन गुणवंत विद्यार्थ्यांना पद्मश्री मधुकर ढवळीकर शिष्यवृत्ती दिली जाईल. सदर शिष्यवृत्तीची रक्कम प्रत्येकी रूपये २.५० लक्ष इतकी असेल, असेही तावडे यांनी सांगितले.”
 
 

“पद्मश्री सदाशिव गोरक्षकर यांचे वारसा जतन, पुरातत्त्व शास्त्र आणि वस्तुसंग्रहालय शास्त्र या क्षेत्रांमध्यील योगदान अतिशय मोलाचे आहे. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित गोरक्षकर यांनी पुर्वाश्रमीचे प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय आणि आताचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, औंध जि. सातारा येथे संचालक म्हणून काम पाहिले. ते संग्रहालय व्यवस्थापन, पुरातत्व, वारसा, संरक्षण, कला, वास्तुविद्या आणि प्राणीशास्त्र या विषयांचे तज्ज्ञ होते. त्यांना भारतातील संग्रहालय शास्त्राचे भीष्म पितामह असेही संबोधले जाते.”
 
 

“पद्मश्री सदाशिव गोरक्षकर यांनी लिहिलेल्या राजभवन्स इन महाराष्ट्र, अनिमल्स इन इंडियन आर्ट, कालिदास अँड द महायोगी ऑफ घारापुरी आणि द मेरीटाईम हेरिटेज ऑफ इंडिया, डॉन ऑफ सिव्हिलायझेशन इन महाराष्ट्र अशा अनेक पुस्तकांमधून त्यांच्या ज्ञानाची अफाट कक्षा दिसून येते.”
 
 

“पद्मश्री सदाशिव गोरक्षकर यांनी आपल्या कारकिर्दीत संग्रहालय व्यवस्थापन शास्त्राची नवी परिमाणे परिभाषित केली. तसेच विविध कार्यक्रम, उपक्रम आणि प्रदर्शने आयोजित करून छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांना संग्रहालय शास्त्र या विषयातील कामगिरीसाठी सन २००३ साली भारत सरकारचा मानाचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरातत्ववेत्ता, कलासमीक्षक आणि संग्रहालयशास्त्र तज्ज्ञ अशा विविध भूमिका गोरक्षकर यांनी पार पाडल्या. ”
 
 

 
 

“ताम्रपाषाणयुगीन संस्कृतींच्या अभ्यासाबरोबर ऐतिहासिक पुरातत्वीय स्थळांच्या उत्खननांचे मूल्यमापन या क्षेत्रात पद्मश्री मधुकर केशव ढवळीकर यांचे भरीव योगदान आहे. सुरूवातीला भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, भारत सरकारच्या सेवेत असणाऱ्या पद्मश्री ढवळीकर यांनी डेक्कन कॉलेज, अभिमत विद्यापीठ, पुणे या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम केले. आपल्या कार्यकाळात त्यांनी कयाथा, सोमनाथ, इनामगाव, पौनार, कंधार, आपेगाव येथे उत्खनन केले. महाराष्ट्रातील ताम्रप्राषण युगात शेतीबद्दल असलेली माहिती इनामगाव येथे केलेल्या उत्खननातून ढवळीकर यांनी प्रकाशात आणली.”
 
 

“हिस्टॉरिकल ऑर्किओलॉजी ऑफ इंडिया, इंडियन प्रोटोहिस्ट्ररी, एक्सवेशन ॲट कयाथा, हिनयान केव्हज ऑफ वेस्टर्न इंडिया, फर्स्ट फार्मर ऑफ डेक्कन, इंडस सिव्हिलायझेशन इन वेस्टर्न इंडिया या पद्मश्री ढवळीकर यांच्या प्रकाशित झालेल्या पुस्तकांमधून त्यांच्या ज्ञानाची प्रगल्भता लक्षात येते. उत्खनन-गवेषन पुरातत्त्वशास्त्र, नाणकशास्त्र, मूर्तीशास्त्र या क्षेत्रांमध्ये त्यांनी भरीव योगदान देऊन अपरिचित इतिहास प्रकाशात आणला. पद्मश्री ढवळीकर यांना रॉयल एशियाटिक सोसायटीच्या बॉम्बे शाखेची फेलोशिप (२०१०) आणि त्याच वर्षी भारत सरकारच्या पहिल्या टागोर नॅशनल फेलोशिपने त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेत २०११ यावर्षी भारत सरकारने मानाचा असा पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.”

Continue reading

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...
Skip to content