HomeArchiveगोंदियाला लवकरच मिळणार...

गोंदियाला लवकरच मिळणार विमानसेवा! पालकमंत्री राजकुमार बडोलेंच्या प्रयत्नांना यश

Details

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
अतिदूर्गम आणि नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्याला नागरी विमान सेवेने जोडण्याची प्रक्रिया लवकरच आकाराला येईल, असा विश्वास राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला.
बुधवारी बडोले यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे गोंदिया जिल्हा नागरी विमान सेवेने जोडण्याची त्यांनी मागणी केली. गोंदिया जिल्हा अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त असल्यामुळे तसा दुर्लक्षित राहिलेला आहे.

मात्र या जिल्ह्याला लाभलेली वनसंपदा, वन्यजीवसंपदा आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे ते पर्यटनाचे केंद्र बनल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. याशिवाय देशातील दुर्मिळ असलेल्या सारस पक्षाचे गोंदिया जिल्हा आश्रयस्थान असल्यामुळे या पक्षाच्या दर्शनासाठी देशविदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची मांदियाळी सुरू असते. गोंदिया जिल्ह्यात उद्योगधंदे कमी आहेत. त्यामुळे गोंदिया जिल्हा नागरी विमान सेवेने जोडल्यास पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळतील हे सुरेश प्रभू यांच्या निर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी लवकरच गोंदिया जिल्हा नागरी विमान सेवेने जाडण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिल्याचे बडोले यांनी सांगितले.

गोंदिया जिल्हा वनसंपत्तीने नटलेला जिल्हा आहे. येथील ऐतिहासिक मामा तलाव, प्रसिध्द अभियारण्ये, पाणसाठे, तलाव यामुळे आकर्षणाचे ठिकाण आहे. येथील हवामानामुळे धानातील रूचकर असलेला तांदूळ पिकतो. देशातील दुसरा आणि राज्यातील पहिला राईस पार्कसुध्दा येथे प्रस्तावित आहे. येथे वैमानिक प्रशिक्षण केंद्र आहे. भरतीपूर्व सैनिक प्रशिक्षण, दिव्यांगांसाठी विशेष प्रशिक्षण केंद्र लवकरच सुरू करणार आहोत. त्यामुळे गोंदिया जिल्हा नागरी विमान सेवेने जोडल्यास गोंदिया जिल्ह्याच्या शिरपेचात हा मानाचा तुरा असेल असेही बडोले यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...
Skip to content