HomeArchiveगांधीद्वेष्ट्यांची सटकली..

गांधीद्वेष्ट्यांची सटकली..

Details
गांधीद्वेष्ट्यांची सटकली..

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
महात्मा गांधीजींच्या पुण्यतीथीच्या आधी काही दिवसांपूर्वी चर्चा सुरू होती. राष्ट्रपुरुष, लोकोत्तर व्यक्तिमत्त्वांच्या पुतळ्यांची विटंबना आणि उमटणारी हिंसक प्रतिक्रिया याविषयी हिरिरीने मते मांडली जात असताना अचानक महात्मा गांधीजींचे नाव पुढे आले आणि एकमत झाले की गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना झाली तरी फारशी भडक प्रतिक्रिया उमटणार नाही. कारण गांधीजींच्या मागे कुणीही नाही. त्यांचे विचार मानणारे खूप आहेत पण, ते पडले अहिंसावादी. भडक, हिंसक प्रतिक्रिया, जाळपोळ, दगडफेक, मुंबई बंद, भारत बंद, भावना फारच दुखावल्या गेल्या तर दोन-चार बळी, शंभरेक जखमी, पोलिसांचा लाठीमार, गोळीबार यातले काहीही गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना झाली तरी घडून येणार नाही. कारण या महात्म्याचा पंथच वेगळा होता.

त्यांच्या मार्गावर चालायला असीम धैर्य लागते. गांधी विचारांना आजही घाबरणाऱ्या डरपोकांच्या ठायी ते धैर्य नाही. म्हणूनच गांधीजींच्या पुतळ्याचा चष्मा काढून फेकणे वगैरे करण्यापेक्षा बुधवारी या भयभीतांकडून कहर केला गेला. गांधीजींच्या प्रतिमेवर थेट गोळ्याच झाडल्या गेल्या, त्या प्रतिकात्मक पुतळ्यातून रक्त सांडवले गेले. नंतर ही प्रतिमा पेटवून देण्यात आली. महात्म्याच्या पुण्यतिथीनिमित्त देशभर त्यांना आदरांजली वाहिली जात असताना उत्तर प्रदेशातील अलिगड येथे हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव शकून पांडे या डोके ठिकाणावर नसलेल्या महिलेने हे डरपोकांचे शौर्य दाखवून दिले. गांधीजींच्या स्मृतीदिनी हिंदू महासभा शौर्य दिवसाचे दरवर्षी आयोजन करत असते. शकून पांडेने असा उन्माद दाखवला. आमचे कवीमित्र किरण येले यांनी याबद्दल फेसबुकवर एक पोस्ट टाकली – गांधीजींच्या चित्रावर तुम्ही गोळ्या झाडल्यावर त्यातनं रक्त सांडलं, म्हणजे.. गांधीजी अजून जिवंत आहेत आणि तुम्ही अजून घाबरलेले आहात. ते खरेच आहे.

ज्येष्ठ पत्रकार, कवी विजय चोरमारे म्हणतात, गोळ्या झाडणाऱ्यांचे हिशेब चुकले.. गांधी मेले नाहीतच. शंभराने, हजाराने पुन्हा जन्माला आले.. यामुळेच बहुदा गांधींना घाबरणाऱ्यांमध्ये घबराट उडाली असावी. त्यामुळेच कलबुर्गी मारले जातात, पानसरेंची हत्त्या होते, दाभोलकरांना संपवले जाते.. पण गांधी काही संपत नाहीत. ते निर्माण होतच राहातात. ही तगमग शकून पांडेने तिच्या माथेफिरू कृत्यातून व्यक्त केली असावी. मानवी मूल्यांच्या प्रतिष्ठेसाठी, मानवतेसाठी पुढे सरसावलेल्या जगातील बहुतेक महनीय व्यक्तींच्या हत्या झाल्या आहेत. पण हत्त्येने विचार संपले नाहीत, संपणारही नाहीत. या विचारांचे भय ज्या दिवाभीतांना वाटत असते ते असे उदात्त विचार मांडणाऱ्यांना संपवून विचार नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. गांधीजींसाठी कुणीही रस्त्यावर उतरत नाही पण तो लाखोंसाठी रस्त्यावर उतरलेला महात्मा होता. त्यांना मारण्यात आले, पण त्यांचे विचार कायम आहेत. जगभरातील सहाशेहून अधिक विद्यापीठांमध्ये ‘गांधी अध्ययन केंद्रे’ चालविली जातात. दिडशेव्या जयंतीदिनी जगातील १८४ देशांमध्ये या महात्म्याचे स्मरण केले गेले होते. आजही त्यांचे विचार जगभरातील मानवतावाद्यांना प्रेरणा देत असतात. गांधीद्वेष्ट्यांची सटकली असावी ती बहुदा यामुळेच.

मीरतमध्ये हिंदू कोर्ट स्थापन करणारी हीच ती शकून पांडे. भाजपाच्या नेत्यांसमवेत तिचे फोटो नेहमी प्रसिद्ध होत. पण कालच्या प्रकारानंतर तिच्या फेसबुक अकाऊंटवरून ते हटवले गेले आहेत. याविषयी गुरुवारी आम्ही एक प्रतिक्रिया छापली होती. त्यात म्हटले होते, भाजपाला मतांसाठी गांधी हवा, तर कुणाला ब्रँड म्हणून गांधी हवा. कुणाला गांधीचे विचार हवेत, तर कुणाला टीका करण्यासाठी गांधी हवा. कारण काहीही असो, गांधी लागतोच. भाजपमधील नेत्यांनाही अगदी मोदींसकट सर्वांना गांधीजींना राजघाटावर जाऊन नमन करावं लागतं. म्हणजे काय, तर गांधी मरत नाही. स्वच्छतेचे दूत म्हणून मोदींना गांधीजींना स्थान द्यावेच लागले. खरे तर या महात्म्याच्या एकूण कार्याचे ते अवमूलन होते. पण भाजपाला आणि मोदींना गांधी आठवले खरे. शकून पांडेने शकुनीपणा दाखवल्यावर मात्र गांधीजींच्या नावाने एरव्ही गळे काढणाऱ्या एकाही राष्ट्रपुरुषाच्या मुखातून निषेधाचा शब्द उमटलेला नाही. कारण तेच आहे जे वर म्हटले ते.

गांधी सर्वांना वेगवेगळ्या कारणांसाठी हवे आहेत. पण त्यांच्या पाठीशी कुणीच नाही. त्यांच्यावर कुणी कविता करतात, कुणी लेख लिहितात, कुणी त्यांची निर्भत्सना करतात, कुणी चित्रपटातून चारित्र्यहनन करतात, कुणी दिशाभूल कऱणारे संदेश समाजमाध्यमांवरून वेगे वेगे व्हायरल करतात. काय वाट्टेल ते सुरू असतं. तरीही गांधी विचार काही संपत नाही. एखाद्या जुनाट वटवृक्षासारखी त्याची मुळे भारताच्या समाजमनाला घट्ट धरून आहेत. या वटवृक्षाच्या पारंब्या तितक्याच ताकदीने विचार जिवंत ठेवत आहेत. यामुळेच गांधीद्वेष्ट्यांची सटकली असताना हा वटवृक्ष आपल्याला आश्वस्त करतो आहे हे आपले सुदैवच म्हणावे लागेल!”
 
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान

Continue reading

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...
Skip to content