HomeArchiveकाँग्रेसने माज दाखवू...

काँग्रेसने माज दाखवू नये..

Details
काँग्रेसने माज दाखवू नये..

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान

[email protected]

शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते की,‘ज्याने यशाचे श्रेय घेतले त्यालाच अपयशाचे श्रेयही घ्यावे लागेल.’ जरआता आपण राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड याराज्यांमधील निकालाचा कौल बघितला की सहज लक्षात येतं की आता पराभवाचे श्रेयही भाजपाला,चाणक्यांना आणि चंद्रगुप्त यांना घ्यावे लागणार आहे. आताच मेसेज व्हायरल होत आहेत की ‘चंद्रगुप्त  कुठे गेले, चाणक्य कुठे गेले?’  पप्पू कोण ठरले? अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसने राहुल गांधींच्या नेतृत्त्वाखाली यश खेचून आणले म्हणून हुरळून जाऊ नये. राजस्थानात, मध्य प्रदेशमध्ये दररोज प्रचारा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात घमासान रंगत होती, जे आरोप प्रत्यारोप सुरू होते, ते अवघ्या देशाने पाहिले आहेत, ऐकले आहेत, अनुभवले आहेत. मात्र, निकालाच्या वेळी प्रचारातील या मुद्द्यांपेक्षा सर्वात महत्त्वाचा ठरला तो जनतेमधील असंतोष. भाजपाच्या शासनाविषयीचा असंतोष, भाजपाच्या सत्ताकारणा विषयीचा असंतोष, भाजपाच्या उन्मादाविषयीचा असंतोष, शेतकर्‍यांचा असंतोष, मध्यमवर्गी यांचा असंतोष, सर्व सामान्यांचा असंतोषच भाजपाला या पराभवाच्या खाईत घेऊन गेला आहे. या निवडणुकांना लोकसभेची मिनी निवडणूक म्हटले जात होते. ही मिनी निवडणूक होती की नाही हे येणार्‍या काही महिन्यांतच ठरणार आहे. पण जेव्हाही मिनी निवडणूक म्हटली  जाते, तेव्हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय चित्र असू शकते, समोर काय वाढून ठेवले आहे? काय आव्हान आहे? याचा विचार आता काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाच्या धुरीणांनी करायला हवा.

राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारले, त्याला एक वर्षपूर्ण होत असतानाच त्यांनाही आगळीभेट मिळावी हा एक योगायोगच आहे. मात्र या योगायोगावर हुरळून न जाता काँग्रेसने कार्यकर्त्यांच्या सबलीकरणाकडे, कार्यकर्त्यांना पुढे आणण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. राहुल गांधी यांनी निदान आता तरी विचाराने तीच पावले उचलली आहेत असे दिसत आहे.

मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांत राजस्थानपेक्षाही मध्यप्रदेशच्या  झुंजीकडे फार लक्ष लागले होते. राजस्थानमध्ये एकहाती सत्तापालट होईल असा अंदाज विश्लेषक,इलेक्शन पंडित आधीच वर्तवत होते. मात्र मध्यप्रेदशमध्ये ही काँग्रेस यापद्धतीने बहुमताकडे झेपावेल असे वाटत नव्हते. शिवराज सिंग चौहान यांच्या विरोधात प्रत्यक्ष वैयक्तिक नाराजी नसल्यामुळे त्यांच्या प्रतिमेचा फायदा भाजपाला मिळू शकतो अशा प्रकारची चर्चा होती. मात्र ती चर्चाही आजच्या निवडणुकीत मतदारांनी फोल ठरवली. मतदार भाकरी फिरवू शकतात,  हेया निवडणुकीने दाखवून दिले आहे. ही निवडणूक एका वेगळ्या अर्थाने प्रत्येक पक्षाला काही तरी संदेश देणारी ठरली आहे. याआधी काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली भाजपाला सक्षम पर्याय देण्यासाठी एकत्र आघाडी करायला विरोधी पक्ष नाखुश होते. त्यांच्या बोलण्यातून, नेत्यांच्या देहबोलीतून हे जाणवत होते. मात्र राहुल गांधी यांनी नेतृत्त्व करून एकहाती प्रचार करून नव्या रक्ताला वाव देत जुन्यांनाही समवेत घेत जो विजय खेचून आणला ते पाहता काँग्रेसचे नेतृत्त्व विरोधी पक्षांना मान्य करावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकजूट केल्याशिवाय पर्याय नाही हे आता विरोधी पक्षांनीही स्वीकारले पाहिजे. याचवेळी भाजपालाही आपला नेहमीचा जितं मया हा मार्ग सोडून आत्मरपरिक्षण करण्याची वेळ आली आहे. हे घडून येईल आणि  देशातील जनतेला, शेतकर्‍यांना, मध्यमवर्गीयांना, सामान्यांना अच्छे दिन येतील अशी आशा या निवडणुकांमुळे वाटू लागली आहे.”
 
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content