Details
करवंद निर्मिती घेऊन आलीये ‘माल’
01-Jul-2019
”
तरूणांनी तरूणांसाठी बनवलेला तरूण लघुचित्रपट
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
सेवन करायला कायद्याने बंदी असूनही पुण्यासारख्या शहरात सर्रास चालणाऱ्या गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे ‘गांजा’. आता ही समस्या फक्त पुण्यातच आहे का? तर नाही. पण अभियांत्रिकी महाविद्यालये जास्त असल्याने हे ‘हिप्पी कल्चर’ आज पुण्यात आपली पाळेमुळे घट्ट करत आहे. गांजा, सिगारेट, दारू अशा व्यसनांनी ग्रासलेल्या तीन तरूणांची ही भयावह कथा ‘करवंद निर्मिती’ने ‘माल’ या एका वेगळ्या ‘मॉक्युमेंटरी’ शैलीतील लघुचित्रपटाद्वारे समोर आणली आहे. हा लघुपट युट्युबवर bit.ly/MAALfilm या लिंकवर पाहता येईल. शिवाय सोबतचा क्युआर कोड स्कॅन करूनही तो पाहता येईल. युवा पिढीला एका दरीत लोटणारा आणि पूर्णत: दुर्लक्षित असा हा विषय लेखक दिग्दर्शक शुभेन्दू लळीत याने धाडसाने मांडला आहे.
आयुष्याच्या खूप महत्त्वाच्या टप्प्यावर असताना तरूणांना आयुष्यात धुंदी सोडून काहीच नको असणे, शैक्षणिक, मानसिक व कार्यालयीन जीवन नको असणे, ‘निर्वाणा’, ‘विरक्ती’ याच्या फोफावलेल्या कल्पना आणि या व्यसनाबद्दलचा असलेला प्रचंड आदर दिग्दर्शकाने या लघुपटात व्यवच्छेदक लक्षण म्हणून वापरलेला दिसतो. विषय अतिशय गंभीर आहे. पण विषयाची मांडणी ज्याप्रकारे झाली आहे, त्यातून लघुचित्रपटावर दिग्दर्शकाने पकड ठेवली आहे. लघुपट ५१ मिनिटांचा असूनही कुठेच रेंगाळलेला किंवा रटाळ वाटत नाही. या लघुपटात ‘.. आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेला सुवेद कुलकर्णी प्रमुख भूमिकेत आहे. तसेच वामन वशिष्ठ आणि अक्षय काळे हेसुद्धा अत्यंत वेगळ्या भूमिकांमधून भेटीला आले आहेत. या लघुचित्रपटाला सौरभ पटवर्धन याने संगीत दिले आहे तर छायाचित्रण शुभम गहुदळे याने केले आहे. या सगळ्यांची एकत्रित मोट बांधण्याचे काम लेखक, दिग्दर्शक शुभेन्दू लळीत याने केले आहे. त्यामुळे सिनेमामाध्यमावर प्रेम करणाऱ्या, काही वेगळ्या प्रयोगावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने हा लघुचित्रपट पाहवा, असे आवाहन ‘करंवद निर्मिती’ने कले आहे.
”
“तरूणांनी तरूणांसाठी बनवलेला तरूण लघुचित्रपट