HomeArchiveउद्धवजी, बाळासाहेबांना हे...

उद्धवजी, बाळासाहेबांना हे पटलं असतं का?

Details
“उद्धवजी, बाळासाहेबांना हे पटलं असतं का?”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
मा. उद्धवजी ठाकरे,
शिवसेना पक्षप्रमुख
जय महाराष्ट्र!
कालच आपल्या साहेबांची जयंती झाली. खरं तर कालच हे खुलं पत्र मी लिहीणार होतो. पण, साहेबांच्या स्मारकाच्या तसंच इतर कामात आपण गुंतला असाल म्हणून मी स्वतःला आवरलं. मी अनेकवेळा विविध लेखांच्या माध्यमातून महत्त्वाच्या विषयावर आपलं लक्ष वेधलं आहे. त्यात अनेक विषयांना वाचा फोडण्याचंही काम केलं. परंतु न्याय मिळाला नाही, हे मला कळविण्यास वाईट वाटतं, असो.

प्रत्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून माझ्या स्वतःच्या आणि लोकांच्या प्रश्नांना न्याय मिळण्याचे भाग्य मला लाभलं आहे. `मातोश्री’वर मी पाहिलं पाऊल ठेवलं तेव्हा माझं वय होतं २१. गिरगावात राहणारा मी, बाळासाहेबांचा आजही एकनिष्ठ शिवसैनिक आहे.. उद्धवजी गिरगावातल्या ११ क्रमांकाची शाखा उभी करण्यात माझाही सिंहाचा वाटा होता. पोलिसांच्या ससेमिऱ्याला कसं तोंड दिलं त्याची आठवण झाली की, मला आज ६९ व्या वयातही ते दृश्य समोर दिसतं. मी शिवसैनिक असल्याचे कधीच मिरविलं नाही. पण, माझ्या रक्तात शिवसेनाप्रमुखांच्या विचारांची रग नसानसात भिनलेली आहे. मी अधिक बोलण्यापेक्षा आपले नेतेमंडळी अधिक बोलतील, माझ्याविषयी..

मा. उद्धवजी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं उचित स्मारक महापौरांच्या प्रशस्त जागेत होत आहे आणि राज्य सरकारने त्यासाठी शंभर कोटीही मंजूर केले, याचा सर्वांना पराकोटीचा अक्षय आनंद आहे. मराठी माणसाला ताठ मानेने जगायला शिकवणारे, त्याच्या स्वाभिमान आणि मराठी अस्मितेसाठी बाळासाहेबांनी दिलेल्या योगदानाबद्दल सर्वांना आदर आहेच. परप्रांतीयांच्या जाचाला आम्ही कसे कंटाळलो होतो ते आमचं आम्हालाच ठाऊक आहे. ‘वाचा आणि गप्प बसा’ या ‘मार्मिक’ सवालाने मुंबईकर त्यावेळी खाडकन जागा झाला. त्यामुळे मराठीचा दरारा आजही मुंबईत आहे. मोठ्या साहेबांचे स्मारक होतंय याचा सार्थ अभिमान तमाम मराठी जनतेला असणारच. बाळासाहेबांचे महापौर बंगल्यावर स्मारक होतंय. मराठी माणसाचं एक मोठं स्वप्न पूर्ण होत आहे.

मराठी माणसाचं हे भव्य स्वप्न पूर्ण होत असतानाच शिवसेनाप्रमुखांचं एक स्वप्न मात्र कायम अपुरं राहिलं आहे. ते म्हणजे मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांचं स्मारक. मुंबईत स्मारकाच्या रूपानं त्यांचं काहीतरी असावं असं त्यांना मनोमन नेहमीच वाटत होतं. त्यासाठी मुंबईच्या राणी व्हिक्टोरिया रेल्वे स्टेशनला ‘जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट रेल्वे टर्मिनस’ असं नाव द्यावं म्हणून त्यांचे प्रयत्न होते. परंतु राष्ट्रकुल घोटाळा फेम तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ नाव जाहीर करून ते कोलमडले.

बरं.. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचे दैवत. त्यामुळं त्या नावाला विरोध करणं शक्यच नव्हतं. त्यानंतर, मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला ‘मुंबई सेंट्रल जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट स्टेशन’ नाव देण्यासाठी शंकरशेट वंशाचे सुरेंद्र शंकरशेट यांनी आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक मनमोहन चोणकर यांनी गेली २५ वर्षे अथक प्रयत्न केले. त्यासाठी दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत हे लोकसभेत अधूनमधून संधी मिळेल तेव्हा हा नामांतरांचा प्रश्न उपस्थित करतात. त्यांच्याही पदरात अपयशच आले आहे. इच्छा असूनही नाना शंकरशेट यांच्या नामाकरणाचे काम होत नसल्याने अरविंद सावंतही निराश झालेत. नाना शंकरशेट यांचं नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला केव्हातरी मिळेल ही शक्यता आता कमीच आहे. त्याचं कारण म्हणजे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यात सुरेश कलमाडीच भूत संचारलं आहे. मतांच्या बेगमीसाठी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा आग्रह धरला आहे.

सगळ्या ठिकाणी वोटबँकचे राजकारण. त्यामुळे दैवज्ञ ब्राह्मण या तुटपुंज्या समाजाला काय किंमत? परंतु दैवज्ञ ब्राह्मण अर्थात सुवर्णकार समाजाने गिरगावात शिवसेनेचं रोपटं लावलं. त्याचं महावृक्षात रूपांतर झालं. पण हे सुवर्णकार सोने नियंत्रण कायद्याखाली कायमचे खचले आणि हाती सोन्याच्या दागिन्यांऐवजी हाती कथळाच्या वाळा आल्या. असा पिंजलेला हा समाज ओबीसी आहे. नाना शंकरशेट यांच्या स्मारकासाठी ते काहीच करू शकत नाहीत. गिरगाव हा सेनेचा बालेकिल्ला. सेना नेते दिवंगत प्रमोद नवलकर हे तर नानांवर सातत्याने लिखाण करत होते. पण त्यांनीही हात टेकले.

मा. उद्धवजी ठाकरे, नानांनी १८४८ मध्ये गिरगावात मुलींची पहिली शाळा त्यांच्या वाड्यात स्थापन केली. ती शाळा आजही अस्तित्त्वात आहे, परंतु उद्ध्वस्त धर्मशाळेसारखी.. ती मुलींची शाळा मुंबई महापालिकेच्या ताब्यात आहे. साहेब, नानांनी शाळेशेजारी मुलींसाठी बांधलेल्या क्रीडांगणावर कोणा बिल्डरचे लक्ष गेले आहे. त्या बिल्डरच्या समाधानासाठी पालिकेचे अधिकारी बिल्डर्सला साथ देत आहेत. सध्या या सुशोभित केलेल्या क्रीडांगणाचा आजूबाजूच्या टॉवर्समध्ये राहणारे उच्चभ्रू रहिवासी वापर करत आहेत. विशेष म्हणजे या उच्चभ्रू राहिवाशांनी नाना शंकरशेट यांची धोकादायक शाळा क्रीडांगणावर पडू नये म्हणून १५ फुटांची भिंत उभी केली आहे. क्रीडांगणाच्या बाजूला लोखंडी कुंपण लावले जाते आणि तसा नियम आहे. पण याठिकाणी ऑर्थर रोड जेलसारखी उंच भिंत बांधली गेली आहे. शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या शाळेला भेट दिली आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याबरोबर त्यांनी बैठकही लावली होती. त्या बैठकीत महापौरांच्या दालनात संबंधित प्रभाग आधिकाऱ्यांनी नानांच्या शाळेची वीज व पाणी कनेक्शन सात दिवसात जोडून देण्यात येईल आणि क्रीडांगणाच्या बाजूला उभारलेली भिंत पाडण्यात येईल, असे सांगितलं. उपस्थित महापौर व आमदार गोऱ्हे, माजी आमदार रवींद्र मिर्लेकर सर्वांनी माना डोलावून समाधान व्यक्त केलं. त्यानंतर १५ दिवसांनी महापौराने दिलेल्या आदेशाचे काय झाले असे ८५ वर्षांच्या सुरेंद्र शंकरशेट यांनी पालिका अधिकाऱ्यांना विचारलं. तेव्हा पालिका आधिकाऱ्याने नाना शंकरशेट यांच्या शाळेची व खेळाच्या मैदानाची जागा पालिकेच्या ताब्यात आहे. त्याचे काय कारायचे तो सर्वस्वी पालिकेचा अधिकार आहे, असं सांगितलं. हे ऐकून नानांचे वंशज सुरेंद्र शंकरशेट यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धाराच वाहू लागल्या. वयाच्या ८५ वर्षी मला हे ऐकावे लागत आहे, माझा जन्म फुकट गेला, असे उद्गार त्यांनी उदगार काढले.

मा. उद्धवजी शेवटचा मुद्दा तुमच्या लक्षात आणून देतो. मुंबईचे आद्यशिल्पकार नाना शंकरशेट यांचं स्मारक व्हावं म्हणून शिवसेनेचे माजी नगरसेवक मनमोहन चोणकर यांनी व त्यांच्या स्मारक समितीच्या सदस्यांनी अथक प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नाला यश आले. नाना शंकरशेट स्मारक समितीला वडाळा येथे १५०० स्क्वे. मीटर जमीन महापालिकेने दिली. परंतु नानांचा सुवर्णकार समाज आर्थिकदृष्ट्या दुबळा असल्याने ते स्मारकासाठी १२ कोटी रूपये जमा करू शकत नाहीत. या स्मारकाच्या कामास तीन वर्षांत सुरूवात केली नाही तर मुंबई महापालिकेकडे तो भूखंड परत करावा लागणार आहे. मा. उद्धवजी, आपण या स्मारकासाठी सरकारकडून निधी उपलब्ध केल्यास नाना शंकरशेट यांचं वडाळ्यात भव्य स्मारक उभं राहील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे कुटूंबातील प्रत्येक सदस्यांना नाना शंकरशेट यांच्याबद्दल आदर आहे. मा. उद्धवजी आपण या स्मारकाबद्दलची ही बाब मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून दिल्यास नानांचं मुंबईत स्मारक होईल. मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होत आहे. निदान मुंबईच्या आद्यशिल्पकाराचे स्मारक तरी मुंबईत राहवे, असे वाटते म्हणून हा पत्र प्रपंच.. मुंबईतील मराठी अस्मिता बाळासाहेबांनी कायम जपली म्हणून त्यांचे स्मारक महापौर बंगल्याच्या प्रशस्त जागेत होत आहे. परंतु मुंबईचे आद्यशिल्पकार नाना शंकरशेट यांच्या स्मारकाकडे दुर्लक्ष होत आहे. वोटबँकच्या तत्त्वप्रणालीत नानांचे अफाट कार्य लोकांसमोर येऊ शकत नाही. यासाठी आपण पुढाकार घ्यावा. आज बाळासाहेब असते तर म्हणाले असते “उद्धव, माझे स्मारक बाजूला ठेव.. नाना आपल्या मुंबईचे आद्यशिल्पकार आहेत. त्यांच्यामुळे मुंबईत मराठी माणसासाठी शिक्षण, सांस्कृतिक, महाविद्यालयं सुरू झालीत आणि मराठी माणसाच्या हुशारीची इंग्रजांना दखल घ्यावी लागली. म्हणून नानांच्या स्मारकाला प्राधान्य दे.. १२ कोटी रक्कम मामुली आहे. तुझं मुख्यमंत्र्यांबरोबर चांगल जमतंय. तर.. करून टाक नानांचं काम. मी करू शकलो नाही. तू केलंस तर मला नक्कीच समाधान मिळेल..’ बाळासाहेबांसाठी तरी एवढे करा, ही विनंती.
                                                                                                      आपला नम्र
                                                                                                  जयंत करंजवकर”
 
“जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content