Details
उज्ज्वल भवितव्यासाठी!
01-Jul-2019
”
विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
“भारतीय प्रमाण वेळ” यावरून बरेच किस्से दैनंदिन जीवनात घडत असतात. एखाद्याला वेळ पाळण्यावरून टोलेबाजी करायची असेल, लक्ष्य करायचे असेल तर हमखास ‘इंडियन स्टॅंडर्ड टाइम’ ची आठवण येते. इतकेच कशाला वेळेच्या बाबतीत हमखास दगा देणाऱ्या रेल्वेलाही कमी दूषणे का मिळतात? पण काही व्यक्ती, समाजघटक काहीही बोलले तरी ढिम्मच! राजकारणी तर विचारायलाच नको! ‘वेळ चुकवणे जमत नाही तो राजकारणी नव्हेच’, एखाद-दुसरा अपवाद त्यात. माजी लोकसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री मनोहर जोशी! नि त्याउलट भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे!
आता युतीचं सरकार (म्हणावे का) आहे म्हणून आठवले, ही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री जोडगोळी याबाबत नेहमीच परस्परविरोधी पाहायला, अनुभवायला मिळाली. एक बाराच्या वेळेला पाच मिनिटं आधी पोहोचणार तर दुसरा बारातील दोन वाजता पोहोचणार. यामुळे सर्वांची तारांबळ मुख्यमंत्री म्हणून जोशींच भाषण शेवटी, पण मुंडे येऊन त्यांचं भाषण झाल्याशिवाय त्यांना बोलता येत नसे. त्यावरून टोलेबाजी होऊन बातमीचा विषय हमखास बने!
असो. या देशातील प्रमाणित वेळ एकच ठेवण्याऐवजी दोन ठेवाव्यात असा अभ्यास अहवाल पुढे आला आहे. एकीकडे एक विधान, एक प्रधान, एक कायदा अशी मागणी सध्याच्या राजवटीकडून होत असता हा अहवाल आल्याने दोन वेळा करण्याची मागणी पूर्ण होईल का? पण, यात व्यवहार्यता पाहवीच लागेल. कारण देशाची वेळ, पैसा, कामाचे तास, त्यातून होणारी बचत यातून आंतरराष्ट्रीय पातळीवर संबंध यावरही तातडीनं मंथन होणे गरजेचं आहे. सकृतदर्शनी तरी यात निकड वाटते. किंबहुना ब्रिटिशांनी नसेल विचार केला तर आपण का करू नये?
देशाच्या पूर्व-पश्चिम भागाचा विचार करता वेळेचं ‘गणित’ नव्यानं बसवण्याची ‘वेळ’ आलीच आहे असे वाटते. देशाच्या पूर्वोत्तर भागात नेहमीच्या कामाच्या वेळेआधीच सूर्य उगवतो नि मावळतो. विशेषतः हिवाळ्यात दिवस उजेडचे तास कमी असतात. याचा उत्पादकतेवर आणि वीज वापरावर प्रतिकूल परिणाम होतो. भारतीय प्रमाणवेळेला दोन भागात विभागल्यास या स्थितीत फरक पडू शकतो असे नवे वैज्ञानिक निष्कर्षाप्रत आले आहेत.
इंडियन स्टँडर्ड टाइम अंमलात आणणाऱ्या राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा (एनपीएल) ने केलेल्या विश्लेषणानुसार आसाम, मेघालय, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिजोरम, त्रिपुरा, अंदमान, निकोबार द्विपसमूह या क्षेत्राला वेगळा नि देशाच्या इतर भागाला वेगळा ‘टाइम झोन’ देण्याची मागणी – प्रस्ताव अभ्यासकांनी दिला आहे. पूर्वोत्तर भागातील राज्याचे लोकप्रतिनिधी नि इतर समाजसमूह यांची बऱ्याच दिवसापासून वेगळ्या वेळेची मागणी आहेच. आसामच्या चहा बागेत तर वेगळी वेळ लागू आहे, जी देशाच्या वेळेच्या एक तास पुढे आहे.
शोधपत्रिका ‘करंट सायन्स’मध्ये प्रकाशित संशोधनानुसार तांत्रिकदृष्ट्या भारतात दोन प्रमाणित वेळांची अंमलबजावणी शक्य आहे. ‘भारतीय मानक समय’ दोन वेगळ्या पद्धतीने लागू करता येऊ शकतो. देशाच्या विस्तृत भागासाठी आयएसटी एक नि पूर्वोत्तर भागासाठी एसआयटी दोन अशी विभागणी करता येऊ शकते. सध्या भारतात ८२ डिग्री ३३ मिनिटं पूर्व अशी जाणारी देशांतर रेखा एकाच वेळेशी निगडित आहे. नवीन सूचनेनुसार हे क्षेत्र आयएसटी एक होऊ शकते ज्यात ६८ डिग्री ७ मिनिटं पूर्व आणि ८९ डिग्री ५२ मिनिटं पुर्वेकडील मध्य क्षेत्र सामील होऊ शकते. याचप्रमाणे ८९ डिग्री ५२ मिनिटं पूर्व आणि ९७ डिग्री २५ मिनिटांमधील क्षेत्राला आयएसटी दोन, व्यापून टाकेल, व्याप्त करेल. यात सर्व पूर्वोत्तर राज्याबरोबरच अंदमान निकोबार द्विपसमूहही सामील असतील.
पूर्वोत्तरसाठी अलग वेळ सुचविण्यामागे अनेक कारणं आहेत. लोकांच्या जैविक कार्यक्रमावर सूर्योदय-सुर्यस्ताच्या वेळांचा पडणारा प्रभाव नि कार्यालयांच्या वेळा त्याच्याशी सुसंगत करणे हे प्रामुख्यानं आहे. शरीरातील अंतर्गत घड्याळ यांच्याशीही ही वेळ सुसंगत ठरेल. डोंग, पोर्ट ब्लेयर, अलीपूर द्वार, गंगटोक, कोलकाता, मिर्जापूर, कन्याकुमारी, गिलगिटम, कोवृत्ती, घुआरमोटासहित देशातील दहा भागातील सूर्योदय-सुर्यस्ताच्या वेळेचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. दोन समय सीमांकन लागू करण्यात अडचणी काहीच नाहीत. कारण, पूर्वेच्या एका भागात लागू होणारं क्षेत्र फारच लहान असेल.
प. बंगाल नि आसामच्या सीमेवर ते लागू केले जाईल. रेल्वेच्या दोन स्टेशनवर न्यू कूच बिहार-अलीपूरद्वार येथे वेळेचं समायोजन करावं लागेल. सिग्नलिंग सिस्टीम पूर्णतः स्वयंचलित नसल्यानं त्यात बाधा येणार नाही. त्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम होणार नाही, असे एनपीएल संचालक डॉ. डी. के. ओसवाल यांनी सांगितलं. विद्यमान वेळ ‘शरीर वेळे’नुसार योग्य असली तरी डाँग, पोर्ट ब्लेयर भागात बिलकुल उपयोगाची नाही. कोलकाता, गंगटोक आदी भागात काम चालून जातं. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर)अंतर्गत कार्यरत नवी दिल्लीस्थित प्रयोगशाळा एनपीएल, आयएस्टीच्या निर्मिती आणि प्रसारासाठी जबाबदार आहे. इथे फ्रांसच्या इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर्स (बीआयटीएम)मधील युनिव्हर्सल टाइम को ओरडीनेटेड (युटीसी)शी बांधील, वेळा जुळवलेल्या घड्याळांचा समूह आहे.
दुसऱ्या भागात नवे वेळापत्रक लागू करण्यासाठी एनपीएलला पूर्वोत्तर भागात एक आणखी प्रयोगशाळा स्थापित करावी लागेल. नि तिला युटीसीशी जोडावी लागेल. आपल्या देशाजवळ दोन भारतीय प्रमाणवेळा देण्याची क्षमता आहे. यामुळे दोन तासांचा फरक. या संशोधन अभ्यासात लखी शर्मा, एस. डे. पी. कांडपाल, एम. पी. अलोनिया, एस. यादव, टी. भारद्वाज, पी. थोरात, एस. पंजा, पी. अरोरा, एन. शर्मा, ए. अग्रवाल, टी. डी. सेंगुत्तवान, व्ही. एन. ओझा आदी सहभागी झाले होते.
मुंबईसारख्या शहराचा विचार करता, जी सकाळी उत्तरेकडून दक्षिणेकडे तर रात्री पुन्हा उत्तरेकडे धावत असते तिथे कार्यालयाच्या दोन वेगवेगळ्या वेळा लागू ‘कराव्याच’ लागतील. पुढील काळाचं नियोजन म्हणून मेट्रो सुविधा येत असली तरी ९ ते ६ या वेळेमुळे गर्दी कमी होत नाही. यातून आरोग्याचे, दैनंदिन सणवाराचे, व्यवहाराचे प्रश्न बिकट होत असून त्याचा वैयक्तिक आयुष्य, मनोवृत्तीवरही परिणाम होत आहे. आजारी, जखमींना इलाजासाठी जे. जे, के. इ. एम., टाटा रूग्णालयात नेणं-आणणं दुरापास्त होत आहे. सरकारने यात गांभीर्याने लक्ष घातलं पाहिजे. सर्व कार्यालयीन वेळा दोन शिफ्टमध्ये करून त्यात सुसूत्रता राहील हे पाहवं, ज्या कंपनी, आस्थापना हे करू इच्छितात त्यांना तशी मुभा तत्काळ द्यावी, आयटीसारख्या क्षेत्रात प्राधान्य द्यावे ज्यात घरुनही काम करता येते. त्यांना विशेष धोरण ठरवून सवलती द्याव्यात, तातडीनं अभ्यासगट करून उपाय शोधावेत. गर्दी कमी करण्यासाठी वेगवान पावलं टाकण्याची गरज आहे. नाहीतर एल्फिन्स्टन, अलीकडची हिमालया पूल दुर्घटना होतच राहणार हे सांगायला भविष्यवेत्त्याची गरज नाही. मेट्रोमुळे गर्दी वाढून घाटकोपर रेल्वेच्या मधल्या पुलावर ताण वाढू लागला आहे. पुढील काळातील धोके ओळखून तातडी करायला हवी. नाहीतर आभाळात गेलेल्यांना पाच वरून दहा लाख, जखमींना ५० हजाराचे एक लाख रूपये असं धोरण आखावं लागेल, याची वाट यंत्रणा बघतेय का? पाहा, विचार करा नाहीतर केवळ, ‘मुंबईकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ या पाट्या लावून काय उपयोग?”
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार